झिंबाब्वे नेपाळ आयसीसीचे सदस्य

झिंबाब्वे नेपाळ आयसीसीचे सदस्य
झिंबाब्वे नेपाळ आयसीसीचे सदस्य

गेल्या जुलैमध्ये आयसीसीने झिंबाब्वे आणि नेपाळ यांचे सदस्यत्व रद्द केले होते

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) झिंबाब्वे आणि नेपाळ यांना आपले सदस्य करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. येथे सोमवारी आयसीसीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.
 • त्यामुळे आता यापुढे झिंबाब्वे आणि नेपाळ हे आयसीसीचे सदस्य म्हणून राहतील.
 • झिंबाब्वे आणि नेपाळ क्रिकेट संघटनांच्या निवडणुकीवेळी संबंधित देशांच्या सत्ताधारी शासनाचा हस्तक्षेप होत असल्याचे दिसून आल्याने गेल्या जुलैमध्ये आयसीसीने झिंबाब्वे आणि नेपाळ यांचे सदस्यत्व रद्द केले होते.
 • झिंबाब्वे क्रिकेटला आयसीसीकडून यापुढे पूर्ण पाठिंबा राहील अशी ग्वाही आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी दिली आहे.
 • येत्या जानेवारीत होणा-या आयसीसीच्या पुरूषांच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झिंबाब्वेचा संघ सहभागी होईल.
 • त्याचप्रमाणे महिलांच्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती:-

 • ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश संस्थापक असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती १५ जून १९०९ रोजी लॉर्ड्स येथे इंपेरियल क्रिकेट परिषद म्हणून स्थापन झाली.
 • ह्या परिषदेमध्ये सुरवातीला फक्त राष्ट्रकुलमधील देशांनाच सामिल होता येत होते. ह्या सदस्यांनंतर १९२६ मध्ये भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज, आणि त्यानंतर १९५३ मध्ये पाकिस्तान सामील झाला.
 • १९६१ मध्ये, राष्ट्रकुलामधून बाहेर पडल्याने दक्षिण आफ्रिकेने सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
 • १९६५ मध्ये इंपेरियल क्रिकेट परिषदेचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे करण्यात आले त्याचबरोबर पहिल्यांदाच नियमन मंडळात राष्ट्रकुलाच्या बाहेरील देशांच्या निवडीला मंजूरी देण्याबाबत नवीन नियम केले गेले.
 • नियमन मंडळामध्ये नव्याने निवड झालेला कोणताही सदस्य फक्त सहयोगी (असोसिएट) सदस्य म्हणून निवड केला जातो ज्याला पुर्ण सदस्य होण्याची संधी असते.
 • फिजी आणि अमेरिका हे सर्वात पहिले सहयोगी सदस्य होते. १९८९ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नाव पुन्हा एकदा बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती असे केले गेले.
 • १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा पुर्ण सदस्य म्हणून निवडला गेला आणि १९९२ मध्ये झिम्बाब्वेची निवड.
 • सर्वात अलिकडील पुर्ण सदस्य अफगाणिस्तान आणि आयर्लंड, २०१७ साली नियुक्त केला गेला.

समितीच्या सदस्यत्वाचे तीन प्रकार आहेत:-

 • पुर्ण सदस्य, सहयोगी (असोसिएट) सदस्य, आणि संलग्न सदस्य.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीमध्ये एकूण किती सदस्य आहेत??

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »