भारताला ‘एनएसजी’ सदस्यत्व देण्यास चीनचा विरोध कायम

भारताला ‘एनएसजी’ सदस्यत्व देण्यास चीनचा विरोध कायम

चीनने नेहमीच भारताचा एनएसजीमधील प्रवेश रोखण्याचा प्रयत्न

#भारताला ‘एनएसजी’ सदस्यत्व देण्यास चीनचा विरोध कायम:-
आण्विक साहित्य पुरवठादार गटाच्या (एनएसजी) अस्ताना येथे होणाऱ्या बैठकीत भारताला सदस्यत्वाचा मुद्दा विषयसूचीवर नाही, असे चीनने सूचित केले आहे.
अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या भारतासारख्या देशांना या गटात प्रवेश देण्याबाबत सहमती होणे आवश्यक आहे, अशी भूमिका चीनने घेतली आहे. चीनने नेहमीच भारताचा एनएसजीमधील प्रवेश रोखण्याचा प्रयत्न केला आहे. आण्विक साहित्य पुरवठादार गट ही ४८ देशांची संघटना असून ती जागतिक अणुसाहित्य व्यापाराचे नियंत्रण करते. भारताने एनएसजी सदस्यत्वासाठी मे २०१६ मध्ये अर्ज केला असून चीनने भारताला हे सदस्यत्व देण्यास विरोध केला आहे. ज्या देशांनी अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली आहे, त्यांनाच या संघटनेचे सदस्यत्व मिळावे, असे चीनचे म्हणणे आहे.
भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी अण्वस्त्रप्रसार बंदी करार म्हणजे एनपीटीवर स्वाक्षरी केलेली नाही. भारताला एनएसजीमध्ये प्रवेश देण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले, की चीनची आधीचीच भूमिका कायम आहे.
कझाकस्थानातील अस्ताना येथे संघटनेची बैठक होत असून त्यात भारताला सदस्यत्व देण्याचा कुठलाही मुद्दा विचारार्थ नाही. इतर सदस्य देशांत याबाबत मतैक्य झाल्याशिवाय भारताला हे सदस्यत्व देण्यात येऊ नये. भारताला सदस्यत्व नाकारण्याचे आम्ही प्रयत्न केलेले नाहीत. केवळ एनएसजीचे नियम व प्रक्रिया यांचे पालन करण्याचा आग्रह धरला आहे, असा खुलासाही त्यांनी केला.
राज्यसेवा 2019 मध्ये एनएसजी वर आयोगाने प्रश्न विचारला होता.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »