पंतप्रधान योग पुरस्कार 2019

पंतप्रधान योग पुरस्कार 2019

योगाचा प्रसार आणि विकास करण्यासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पंतप्रधान पुरस्कार

#भारताचा ‘पंतप्रधान योग पुरस्कार 2019’:-
दिनांक 21 जून 2019 रोजी रांची येथे (झारखंड) आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, भारत सरकारच्या AYUSH मंत्रालयाने 2019 या सालासाठी ‘'योगाचा प्रसार आणि विकास करण्यासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पंतप्रधान पुरस्कार’'  विजेत्यांची नावे जाहीर केली.
वैयक्तिक (राष्ट्रीय) श्रेणी :- लाइफ मिशन या संस्थेचे स्वामी राजर्षी मुनी (गुजरात)
वैयक्तिक (आंतरराष्ट्रीय) श्रेणी :- इटलीच्या अँटोनिटा रोझी
संघटना (राष्ट्रीय) श्रेणी :- बिहार स्कूल ऑफ योग, मुंगेर
संघटना (आंतरराष्ट्रीय) श्रेणी :- जपान योग निकेतन, जपान
पुरस्काराविषयी:-
दिनांक 21 जून 2016 रोजी द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने चंदीगड येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार’ जाहीर केला होता.
हा पुरस्कार भारत सरकारच्या आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (AYUSH) मंत्रालयाच्यावतीने दिला जातो. 
विजेत्यांची निवड मंत्रालय एका समितीद्वारे करतो. 
पुरस्कार स्वरुप:- एक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 25 लक्ष रुपये रोख रक्कम दिली जाते.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »