मोहम्मद शमी वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक

मोहम्मद शमी वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक

हॅट्रिक घेणारा दुसरा भारतीय

ऊथम्पटन : अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा निसटता विजय झाला. मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये घेतलेल्या हॅट्रिकमुळे टीम इंडियाने हा सामना ११ रननी जिंकला. वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा शमी हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी १९८७ सालच्या वर्ल्ड कपमध्ये चेतन चौहान यांनी नागपुरात न्यूझीलंडविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. मोहम्मद शमीची आतापर्यंत झालेल्या सगळ्या क्रिकेट वर्ल्ड कपमधली ही दहावी हॅट्रिक होती.
भुवनेश्वर कुमारच्या मांडीच्या मांसपेशींना दुखापत झाल्यामुळे मोहम्मद शमीला खेळण्याची संधी मिळाली आहे. 
क्रिकेट वर्ल्ड कपमधल्या हॅट्रिक:-
१९८७ सालच्या वर्ल्ड कपमध्ये चेतन शर्मा यांनी केन रुदरफर्ड, इयन स्मिथ आणि इवन चॅटफिल्ड यांना माघारी पाठवलं होतं.
१९९९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकने झिम्बाब्वेविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. मुश्ताकने हेन्री ओलोंगा, एडम हकल आणि पॉमी एमबानग्वा यांची विकेट घेतली होती.
२००३ वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या चामिंडा वासने बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. चामिंडा वासने मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्येच हनन सरकार, मोहम्मद अशरफूल आणि एहसानुल हक यांची विकेट घेतली.
२००३ वर्ल्ड कपमध्येच ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने केनियाविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. ब्रेट लीने केनडी ओटिनो, ब्रिजल पटेल आणि डेव्हिड ओबुया यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
२००७ वर्ल्ड कपमध्ये लसिथ मलिंगाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लागोपाठ ४ बॉलला ४ विकेट घेतल्या होत्या. मलिंगाने शेन पोलॉक, आंद्रे हॉल, जॅक कॅलिस आणि मखाया एनटिनीची विकेट घेतली.
२०११ वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजच्या केमार रोचने नेदरर्लंड्सविरुद्ध हॅट्रिक घेतली. पिटर सीलर, बरनार्ड लूट्स, बेरेंड वेस्चडिज्क यांची विकेट घेतली.
२०११ वर्ल्ड कपमध्ये लसिथ मलिंगाने केनियाविरुद्ध पुन्हा एकदा हॅट्रिक घेतली. तन्मय मिश्रा, पीटर ओनगोंडो आणि शेम एनगोचे यांना माघारी धाडलं. वर्ल्ड कपमध्ये दोन हॅट्रिक घेणारा मलिंगा हा एकमेव बॉलर आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »