11 August Current Affairs

11 August Current Affairs
11 August Current Affairs

पाक समुद्री जिहाद चा कट रचतोय

नौदलाच्या सर्व तळांना हायअॅलर्ट जारी करण्यात आलाय
पाकिस्तान समुद्री जिहादसाठी दहशतवाद्यांना चिथावतोय
पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत, भारतीय गुप्तचर यंत्रणांचा इशारा
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. यामुळे पाक दहशतवाद्यांना भारतावर हल्ला करण्यासाठी चिथावतोय. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनीही पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यांचा इशारा दिला होता. आता पाकमधील दहशतवादी संघटना 'समुद्री जिहाद'चा कट रचत असल्याची माहिती भारताच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाला हायअॅलर्ट देण्यात आलाय. तसंच कुठल्याही हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचं नौदलानं म्हटलंय.
समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचा हल्ला परतवून लावण्यासाठी समुद्रात बारकाईने देखरेख ठेवली जात आहे. नौदलाला आम्ही हायअलर्ट दिला आहे. 
दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आम्ही तयार आहोत. कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला संपूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल, असं भारतीय नौदलाचे व्हाइस अॅडमिरल मुरलीधर पवार यांनी सांगितलं. 
दिल्लीतील एका कार्यक्रमात पवार बोलत होते. पाकमधील दहशतवादी संघटना आपल्या हस्तकांना 'समुद्री जिहाद' मध्ये समुद्र मार्गाने हल्ला करण्याचे प्रशिक्षण देत आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली. 
गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर भारतीय नौदलाच्या सर्व तळांना हायअॅलर्ट देण्यात आला आहे. यासह भारतीय लष्कर आणि हवाई दलही अॅलर्टवर आहे. 

पहिली अंडरवॉटर ट्रेन

कोलकात्यात हुगळी नदीखालून धावणार देशातली पहिली अंडरवॉटर ट्रेन
भारतात पहिली अंडरवॉटर ट्रेन म्हणजेच पाण्याखालून जाणारी रेलगाडी लवकरच धावणार आहे. 
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. रल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.
दशातली पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्‍टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार झाली आहे. 
तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातला पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार. 
या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे.
नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे.
या प्रकल्पासाठी हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखाली दुहेरी बोगद्याचे बांधकाम केले गेले. 
दशातला हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरला. 
कोलकातामधील रेल्वेच्या 16.6 किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत 520 मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.
टरेनची वैशिष्ट्ये:-
पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच लावले
नदीमधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब व 30 मीटर खोल
टरेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार


 

11 August Current Affairs
11 August Current Affairs

केजरीवाल सरकार प्रत्येक वापरकर्त्यास दर महिन्याला १५ जीबी डाटा मोफत देणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी पुन्हा एक मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीत तब्बल 11 हजार ठिकाणी हॉटस्पॉट लावले  जाणार आहेत. 
एवढेच नाहीतर मोफत वायफाय सुविधा देखील लवकरच सुरू केली जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक वापरकर्त्यास 15 जीबी डाटा  प्रत्येक महिन्याला मोफत दिला जाईल आणि हा यासाठीचा पहिला टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुका 2020 मध्ये होणार असल्याने, केजरीवाल सरकारकडून दिल्लीकरांना खुश करण्यासाठी एकापाठोपाठ एक घोषणा केल्या जात आहेत.
तर या अगोदर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांना 200 युनिटपर्यंतची वीज मोफत व 201 ते 400 युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांना वीज बिलावर 50 टक्के अनुदान  देण्याचा निर्णय घेतला होता. सलग पाचव्या वर्षी वीज बिल दरात कोणतीही वाढ केलेली नाही.

शिधापत्रिकांच्या आंतरराज्य जोडणीस प्रारंभ

‘एक देश-एक शिधापत्रिका’ योजना १ जून २०२० पर्यंत देशभरात पूर्णपणे लागू होईल, असे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पास्वान यांनी सांगितले. तेलंगण-आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमध्ये शिधापत्रिकांच्या आंतरराज्य जोडणीची  सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. याचा अर्थ तेलंगण व आंध्र प्रदेश येथे राहणारे शिधापत्रिकाधारक लोक दोन्ही राज्यात स्वस्त धान्य दुकानात खरेदी करू शकतील. तसेच महाराष्ट्र व गुजरात या राज्यातील लोक दोन्हीकडे स्वस्त धान्य दुकानातून खरेदी करू शकतील.
रामविलास पास्वान यांनी सांगितले की, आंतरराज्य शिधापत्रिका सेवा आम्ही सुरू केली आहे. हरयाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, पंजाब, राजस्थान, त्रिपुरा या राज्यांमध्ये या योजनेचे काम सुरू आहे.
अन्न खात्याचे सचिव रवीकांत यांनी सांगितले की, शिधापत्रिकांची आंतरराज्य व्यवस्था जानेवारी २०२० पर्यंतपूर्ण होईल अकरा राज्यात एकच संजाल असेल त्यात ११ राज्यातील लोक कुठूनही शिधा खरेदी करू शकतील. एक देश एक शिधापत्रिका योजना १ जून २०२० पर्यंत देशात लागू करण्याचा विचार आहे.
अन्नधान्याचा साठा कसा करणार असे विचारले असता पास्वान यांनी सांगितले की, भारतीय अन्नधान्य महामंडळाकडे भरपूर साठा आहे. त्यांना तीन महिन्यांचा साठा ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. ही गोदामे आता ऑनलाइन असून अन्नधान्याच्या वाहतुकीवर लक्ष ठेवलेले असते. आंतरराज्य शिधापत्रिका योजनेच्या अंमलबजावणीची अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे.
व्यक्तीमागे पाच किलो धान्य:-
सध्या सरकार माणसी पाच किलो अन्नधान्य अनुदानित दरात ८१ कोटी लोकांना देत आहे. देशात एकूण पाच लाख स्वस्तधान्य दुकाने असून त्यामुळे देशाच्या तिजोरीवर वार्षिक १.४ लाख कोटींचा भार पडत आहे. तांदूळ ३ रु. किलो, गहू २ रु. किलो, कडधान्ये १ रु. किलो दराने स्वस्त धान्य दुकानातून दिली जातात.

11 August Current Affairs
11 August Current Affairs

नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ

राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
नसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर पाण्यात बुडाले असल्यास, घर पूर्णतः वाहून गेले असल्यास किंवा घराचे पूर्णतः नुकसान झाले असल्यास कपडे, भांडी, घरगुती वस्तूंसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य दिले जाते.  अशा प्रकारच्या नुकसानीसाठी शासनाकडून प्रतिकुटुंब ५ हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येते.
अर्थसाहाय्याच्या रकमेत २०१९ या वर्षासाठी सरकारकडून वाढ केली आहे.
याअंतर्गत ग्रामीण भागासाठी १० हजार रुपये प्रतिकुटुंब व शहरी भागासाठी १५ हजार रुपये प्रतिकुटुंब मदत म्हणून देण्यात येणार आहे. या वर्षी २६ जुलै २०१९ नंतर ज्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन घरांमध्ये पाणी शिरले व ज्यांचे नुकसान झाले आहे, केवळ त्यांनाच ही मदत दिली जाणार आहे.

बजरंगने पटकावले सुवर्ण

भारताच्या बजरंग पुनिया याने त्बिलिसी ग्रांप्रि कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर भारताच्या विनेश फोगट हिने मेदवेद कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. जॉर्जियाची राजधानी त्बिलिसी येथे झालेल्या स्पर्धेत बजरंगने गेल्या वर्षीही सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे या वर्षी बजरंग सुवर्णयश राखणार का, याबाबत उत्सुकता होती. त्याने पुरुषांच्या फ्रीस्टाइलमधील ६५ किलोच्या अंतिम लढतीत इराणच्या पेइमन बिबायनीवर २-०ने मात केली. बजरंगचे हे या मोसमातील चौथे सुवर्णपदक ठरले आहे. 

एशियाडमधील सुवर्णपदक विजेता बजरंगने या मोसमात डॅन कोलोव, एशियन चॅम्पियनशिप आणि अली अलिएव्ह स्पर्धेत सुवर्णयश मिळवले होते. दुसरीकडे, बेलारुसची राजधानी मिन्स्क येथे झालेल्या स्पर्धेत विनेशने ५३ किलो गटाच्या उपांत्य फेरीत स्थानिक कुस्तीपटू याफ्रेमेन्साकवर ११-०ने दणदणीत विजय मिळवला. विनेशने प्रतिस्पर्ध्यावर डाव्या बाजूने हल्ला चढविला. तिने तिच्या उजव्या पायाची पकड घेण्याचा प्रयत्न केला खरा; पण तिचा हा डाव काही यशस्वी ठरला नाही. मात्र, याफ्रेमेन्साकने नकारात्मक खेळ केल्याने विनेशला गुण मिळाला. दुसऱ्या सत्रात विनेशने आक्रमक खेळ केला. तिला या वेळी याफ्रेमेन्साकच्या डाव्या पायाची पकड करण्यात यश आले. यात तिने दोन गुण वसूल केले. यानंतर पुढच्या काही सेकंदांत विनेशने आणखी चार गुण मिळवले. बघता बघता विनेशने ९-० अशी आघाडी घेतली होती. यानंतर तांत्रिक गुणांच्या जोरावर विनेशने ११-० अशी बाजी मारली. विनेशची आता सुवर्णपदकासाठी रशियाच्या एन. मालिशेवाविरुद्ध लढत होईल. दुसऱ्या उपांत्य लढतीत मालिशेवाने स्थानिक खेळाडू पिकोयूस्कीवर ६-० अशी मात केली. विनेशला आता सलग चौथे सुवर्णपदक मिळवण्याची संधी आहे.
 

11 August Current Affairs
11 August Current Affairs

मराठी अनिवार्य साठी तज्ज्ञांची समिती

राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शालेय अभ्यासक्रमात मराठी हा विषय अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केल्या आहेत. मराठी अनिवार्य करण्यासाठी आवश्यक बाबींचा अभ्यास करून सरकारला सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी सरकारकडून मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. मराठी भाषेचे अभ्यासक, मराठी साहित्यिक आणि मराठी भाषा चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे कार्यकर्त्यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या या समितीमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आशिष शेलार, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासह रंगनाथ पठारे, डॉ. रेणू दांडेकर, डॉ. रमेश पानसे, डॉ. दादा गोरे, रमेश कीर, विभावरी दामले, सुधीर देसाई या सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे; याशिवाय या समितीवर प्रशासनातर्फे शालेय शिक्षण विभागाच्या वंदना कृष्णा आणि मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी काम पाहणार आहेत.

मराठी भाषा संपूर्ण राज्यात अनिवार्य करण्यासाठी अन्य राज्यांतील भाषाविषयक अभ्यासक्रमाचा तुलनात्मक अभ्यास करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. अनेक राज्यांतील भाषेच्या अभ्यासक्रमांचा अभ्यास केल्यानंतर या समिती शासनाला सविस्तर अहवाल व त्या संदर्भातील शिफारसी सादर करणार आहेत. यासाठी समितीने लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करून, सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचनाही सरकारद्वारे करण्यात आल्या आहेत. समितीने शासनाला अहवाल सादर केल्यानंतर त्याला अंतिम स्वरुप देऊन मराठी भाषा शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

सरकारने या संदर्भात समितीची स्थापना केल्याने मराठीप्रेमी संस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मराठी भाषा अनिवार्य करावी, या आग्रही मागणीसाठी सर्व मराठीसाठी काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन २४ जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन केले होते. त्याला आता यश येत असलेले दिसते आहे. सरकारने मराठीप्रेमींची आग्रही भूमिका लक्षात घेऊन भाषेच्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करण्याची जबाबदारी नवनियुक्त समितीवर सोपवली आहे.

शासनाला यापूर्वीच मराठी भाषेसंदर्भात असलेल्या कायद्याचे प्रारूप देण्यात आले आहे. यावर सखोल चर्चा पहिल्या बैठकीत करणार आहोत. या कायद्यातच मराठी भाषा अनिवार्य करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्या प्रमाणे पुढील आठ दिवसांत होणाऱ्या बैठकीत त्यावर सखोल चर्चा करून त्यातील सूचना, कल्पनांचा विचार केला जाईल. अशाच स्वरूपांच्या काही बैठकांनंतर सरकारला विस्तृत अहवाल सादर केला जाईल.
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »