Earn & Learn

कमवा व शिका योजना

ध्येय महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून, महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचं स्वप्न उराशी बाळगून, सातत्याच्या प्रयत्नातून सुरु केलेली योजना म्हणजे "कमवा व शिका"

मुख्य उद्देश काय ?

महाराष्ट्रातील लाखो पदवीधर हे शिक्षण घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची पूर्णवेळ देऊन तयारी करत आहेत. मोठ्या संख्येने परीक्षार्थींकडे उत्पन्नाचे साधन नाही हि एक गंभीर समस्या बनत चाललीय. दैनंदिन खर्च कसा भागवायचा ? हा दुर्दैवी प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसलाय.

कधीकधी हाच प्रश्न विद्याथ्यांच्या अभ्यासातील मुख्य अडथळा बनतो.

VISION STUDY च्या मदतीने आम्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील हाच मुख्य अडथळा दूर करण्याचे ठरवले व सुरुवात केली "कमवा व शिका" योजनेची.

योजना काय आहे ?

कमवा व शिका अंतर्गत, VISION STUDY वर प्रवेश घेतलेल्या सर्व विदयार्थ्यांना काही प्रवेश सवलतीचे कुपन दिले जातील. विद्यार्थ्यांनी हे कुपन VISION STUDY वर प्रवेश घेताऱ्या इतर विद्यार्थीमित्रांना वाटल्यास, कुपनचे वाटप करणारे व वापरणारे अशा दोन्ही विद्यार्थ्यांना यातून फायदा होईल. जे कुपन वापरतात त्यांना प्रवेश घेताना प्रवेशशुल्का मध्ये ५% किंवा १०% सवलत मिळते व जे विद्यार्थी कुपन वाटप करतात अश्याना त्या कुपन वर असणारी रक्कम Paytm मार्फत दिली जाते.   

योजनेची अंमलबजावणी कशी होते ?

सवलत कुपन वाटप करणाऱ्या विद्यार्थांच्या कुपनचा वापर प्रवेश घेण्यासाठी झाल्यानंतर, लगेच VISION STUDY च्या My Account मध्ये नोटिफिकेशन येते, त्यात वाटप करणाऱ्या विद्यार्थ्याने Paytm मोबाईल क्रमांक नोंदवावा. ४८ तासांच्या आत रक्कम विद्यार्थांच्या Paytm मध्ये जमा होते.

आधीचे सवलत कुपन वापरल्यानंतर पुढील कुपन My Account उपलब्ध होते.

योजनेमध्ये कोणाला सहभागी होता येईल ?

जे VISION STUDY वर प्रवेश करतात अश्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेतून स्वतःचा दैनंदिन खर्च पूर्ण करता येईल.   

पैसे कधी जमा होतील ?

प्रत्येक दोन सवलत कुपन वापरले गेल्यानंतर जास्तीत जास्त ४८ तासांमध्ये Paytm मध्ये पैसे जमा होतात. त्यासाठी स्वतःचा अचूक Paytm क्रमांक नोंदवावा.

विद्यार्थ्यांसाठीचे फायदे:

  • *सवलत कुपनावरील रक्कम रोजच्या गरजा भागवणारी आहे, म्हणजे परगावी राहताना घरून पैसे मागायची गरज नाही. *अभ्यासाच्या वेळेत कोणतीही तडजोड न करता व इतर कसलेहि शाररिक वा मानसिक श्रम न घेता, घरबसल्या चांगले पैसे कमवता येतात.
  • *व्हाट्स आप ग्रुप, फेसबुक, मेसेज अश्या कोणत्याही तंत्राचा वापर करून, २-३ सेकंदामध्ये सवलत कुपन वाटप करता येते, व ते कुपन कुणीही व कोठूनही वापरले कि लगेच तुम्हाला नोटिफिकेशन च्या माध्यमातून माहिती दिली जाते.
  • *सवलत कुपन वाटपासाठी कोणतीही मर्यादा नाही.
  • *पहिल्या ५ कूपनांपर्यंत प्रत्येक २ कुपन वापरले गेल्यानंतर कूपनची रक्कम वाढवली जाते. कुपन क्रमांक ६ पासून पुढे जी रक्कम ५ व्या क्रमांकाच्या कुपनसाठी होती तीच दिली जाईल. उदा. कुपन १ व २ हे प्रत्येकी १०० रुपये रक्कमेचे तर कुपन ३ व ४ हे प्रत्येकी १५० रुपये तर कुपन ५ हे २५० रुपय किमतीचे. कुपन ६ पासून पुढे २५० रुपये प्रति कुपन.

महिना किती पैसे कमवले जाऊ शकतात ?

याचे उत्तर तुम्हा स्वतःला ठाऊक असेल, तुमचे जितके संपर्क-मित्र- नातेवाईक-भाऊबहीण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करतात त्या सर्वाना तुम्ही सवलत कुपन वाटून, घरातून एकही रुपय खर्च मागावा लागणार नाही एवढे पैसे कमवू शकाल.

उदाहरणार्थ:

जर तुमच्याकडे वरील उदाहरणात दिल्या प्रमाणे सवलत कुपन असतील व तुम्ही एका दिवसात ५ कुपन वाटप केली व ती प्रवेश घेण्यासाठी वापरली तर त्या दिवशी तुम्ही ७५० रुपय कमवले तेही स्वतःच्या अभ्यासातील मौल्यवान वेळ खर्च न करता.

दुसऱ्या दिवशी नवीन ४ कुपन वापरली गेल्यास, प्रति कुपन २५० रुपये प्रमाणे १००० रुपये मिळतील. म्हणजे अंदाजे महिना २५ ते ३० हजार रुपये तुम्ही कमवू शकाल...!

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Click Here for Earn and Learn

सर्व विद्यार्थ्यांना आवाहन 

महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याच्या या आपल्या स्वप्नासाठी "कमवा व शिका" योजनेला तुम्ही सुद्धा आर्थिक साहाय्य देऊ शकता. 
जर तुमची आर्थिक परिस्थिती व मानसिकता सकारात्मक असेल तर नक्कीच या प्रकल्पाला साथ द्या. तुमच्या क्षमतेनुसार योगदान करा.  

Donate

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »