13 July Current Affairs

13 July Current Affairs
13 July Current Affairs

मराठमोळ्या दीपक कोनाळेसह दहा भारतीयांनी सर केला युरोपमधील सर्वात उंच माऊंट एलब्रुस

युरोपमधील सर्वात उंच पर्वतावर तिरंगा फडकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचं काम भारतातील दहा जणांच्या पथकाने केलं आहे. या दहा जणांच्या पथकाने माऊंट एलब्रुस हा युरोपमधील सर्वात उंच पर्वत सर केला आहे. माऊंट एलब्रुसवर पहिल्यांदाच तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीत गाण्याचा मान या दहा जणांना मिळाला आहे.
युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत माउंट एलब्रुस आहे. निद्रिस्त ज्वालामुखी असलेल्या हा पर्वत सर करण्यात भारतातील दहा गिर्यारोहकांना यश आले आहे. यात महाराष्ट्रातील दीपक कोनाळेचा समावेश आहे. दीपक कोनाळे हा लातूरचा रहिवासी आहे. माउंट एलब्रुस हे युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत मानला जातो.
या पर्वताची उंची पाच हजार 642 मीटर आहे. सतत बदलणारं वातावरण, उणे 25 अंश तापमान, वारे या सर्वांचा सामना करत भारतातील हे पथक सहा तारखेला शिखरावर पोहोचलं होते. ही मोहीम एक तारखेपासून सुरु झाली होती. मोहिमेत सहभागी झालेल्या पथकात महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, उत्तरप्रदेश,आंध्रप्रदेश या राज्यातील गिर्यारोहकांचाही समावेश होता, ज्यात दोन मुलीही सहभागी होत्या.

६ नव्या पाणबुडया बांधणीसाठी ६.६ अब्ज डॉलरचा प्रकल्प

सहा नव्या पाणबुडयांच्या बांधणीसाठी मोदी सरकारने जागतिक युद्धनौका बनवणाऱ्या कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. भारतातील जहाज बांधणींची क्षमता वाढवण्याबरोबरच नौदलाचा पाणबुडी ताफा बळकट करण्याचे सरकारचे उद्दिष्टय आहे.
तंत्रज्ञान हस्तांतरणातंर्गत डिझेल इलेक्ट्रीक पावरवर चालणाऱ्या पाणबुडया भारतात बनवण्याची अट आहे. त्यासाठी इच्छा असल्यास एस.एस, जर्मन थायसेनकर्प मरीन सिस्टम्स जीएमबीएच, स्वीडिश साब कोकम्स, स्पॅनिश नॅवानिया एसए आणि रशियन रोसोबोरोनेक्सपोर्ट ओजेएससी या कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
६.६ अब्ज डॉलरचा हा कार्यक्रम असून आधीच तीन वर्ष विलंब झाला आहे. पाणबुडी बांधणीसाठी ज्या परदेशी कंपनीची निवड करण्यात येईल त्यांच्याबरोबर भारतीय कंपनी सुद्धा काम करेल. नव्या पाणबुडी प्रकल्पात ५० टक्के स्वदेशी तंत्रज्ञान असावे असा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.
मेक इन इंडिया धोरणाला चालना देण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण यामध्ये महत्वाचे असेल. चीनच्या तुलनेत पाण्याखालच्या लढाईत भारताची क्षमता कमी आहे. भारताकडे १३ पाणबुडयांचा ताफा आहे. या सर्व पाणबुडया २० वर्ष जुन्या आहेत. २०३० पर्यंत २४ पाणबुडया बाळगण्याचे भारताचे लक्ष्य आहे.
 

13 July Current Affairs
13 July Current Affairs

ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2019

राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक म. रा. जोशी यांना घोषित करण्यात आला. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप असून, आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. 

मधुकर जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत. या विषयावर ते लेखन करीत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याचा ज्ञानकोषचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संत वाड्मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. 

पीएच. डी आणि एम. फिलचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उजैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. जोशी संत साहित्य विषयाचे पीएच.डी चे मार्गदर्शक आहेत. त्यांचे २०० हून अधिक लेख एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजमकडून प्रकाशित करण्यात आले आहेत. सार्थ तुकाराम गाथेची ४०० हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध केली आहेत. नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील ३,५०० मराठी हस्तिलिखितांचे संशोधन करत आहेत. मधुकर रामदास जोशी यांना हा पुरस्कार लवकरच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ. उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते आणि डॉ.किसन महाराज साखरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधील डॉ. प्रशांत सुरु, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, भास्करराव आव्हाड या सदस्यांनी सदर निवड केली. 

फोर्ब्सने २०१९ मधील जगातील सर्वात महागड्या १०० सेलिब्रिटीजची यादी जाहीर

‘फोर्ब्स’ मासिकाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील कलाकारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे.

फोर्ब्सच्या यादीत बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार:-

या यादीत फक्त एकमेव भारतीय अभिनेता आहे. तो म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार. अक्षय या यादीत ३३व्या क्रमांकावर आहे. 

गेल्या वर्षभरात अक्षयने ६५ मिलियन डॉलर (सुमारे ४४४ कोटी रुपये) इतकी कमाई केली आहे. इतर २० वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीसुद्धा तो करतोय.कमाईच्या बाबतीत अक्षयने रिहाना, जॅकी चैन, ब्रॅडली कूपर, स्कारलेट जॉनसन यांसारख्या कलाकारांनाही मागे टाकलं आहे.

फोर्ब्सच्या जगातील १०० महागड्या सेलिब्रिटीजच्या यादीत:- 

अमेरिकेची टेलर स्विफ्ट अव्वल स्थानी
कायली जेनर दुसऱ्या क्रमांकावर
कानये वेस्ट तिसऱ्या क्रमांकावर
लिओनेल मेस्सी चौथ्या क्रमांकावर
इडी शीरन पाचव्या क्रमांकावर
क्रिस्तियानो रोनाल्डो सहाव्या क्रमांकावर
नेयमार सातव्या क्रमांकावर
राँजर फेडरर ११ व्या क्रमांकावर
नोव्हाक जोकोव्हीच ५५ व्या क्रमांकावर

 

13 July Current Affairs
13 July Current Affairs

मध्यस्थांना अहवाल सादर करण्यासाठी १८ जुलैपर्यंतची मुदत

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी मण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने आपला अहवाल एका आठवडय़ात सादर करावा, यावर स्वीकारार्ह तोडगा काढण्यात आला नाही तर २५ जुलैपासून या प्रकरणाची दररोज सुनावणी घेण्यात येईल, असे गुरुवारी र्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश (निवृत्त) आणि मध्यस्थ समितीचे अध्यक्ष एफएमआय खलिफुल्ला यांना १८ जुलैपर्यंत आपला अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे.
यांच्या'त्या'सल्ल्याची प्रश्नावर मध्यस्थांमार्फत स्वीकारार्ह तोडगा काढता येणे शक्य नाही असे सादर करण्यात आलेला अहवाल तपासून पाहिल्यानंतर आढळले तर सर्वोच्च न्यायालय २५ जुलैपासून या प्रकरणावर दररोज सुनावणी घेईल, असे घटनापीठाने स्पष्ट केले.
मध्यस्थीच्या आजमितीपर्यंतच्या प्रक्रियेच्या प्रगतीची आम्हाला माहिती देण्याची आणि ही प्रक्रिया सध्या कोणत्या टप्प्यावर आहे त्याची माहिती देण्याची विनंती विनंती न्या. खलिफुल्ला यांना करावी असे आम्हाला योग्य वाटले, असे पीठाने म्हटले आहे. या घटनापीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. ए. नझीर यांचाही समावेश आहे. न्या. खलिफुल्ला पुढील गुरुवापर्यंत अहवाल सादर करतील व त्या दिवशी पुढील आदेश देण्यात येतील, असे पीठाने म्हटले आहे. या प्रकरणातील मूळ पक्षकारांचे वारस गोपाळसिंह विशारद यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.
 

EXIM बँकेचा पापुआ न्यू गिनी आणि सेनेगल या देशांसोबत करार

देशांमधील पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवाविषयक प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी कर्जस्वरुपात एकूण 124 दशलक्ष डॉलर (जवळपास 850 कोटी रुपये) एवढा निधी देण्याच्या हेतूने भारतीय आयात-निर्यात बँक (EXIM बँक) याचा पापुआ न्यू गिनी आणि सेनेगल या देशांसोबत करार झाला.
EXIM बॅंकेनी पापुआ न्यू गिनी या देशासाठी देशातले रस्ते आणि पूल यासारख्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 100 दशलक्ष अमेरिकन डॉलरची कर्जमर्यादा निश्चित केली आहे. तर आरोग्य सेवा-सुविधासंबंधी प्रकल्पांसाठी 24.5 दशलक्ष अमेरिकन डॉलरची कर्जमर्यादा निश्चित केली आहे.
पापुआ न्यू गिनी:- हा इंडोनेशियाच्या शेजारी असलेल्या प्रशांत महासागर क्षेत्रातला एक स्वतंत्र द्विपसमूह आहे आणि हा ओशनिया खंडातला एक देश आहे. पोर्ट मोरेस्बी हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि पापुआ न्यू गिनीयन किना हे राष्ट्रीय चलन आहे.
सेनेगल हा पश्चिम आफ्रिका उपखंडातला एक देश आहे. डकर हे देशाचे आर्थिक आणि राजकीय राजधानी शहर आहे. पश्चिम अफ्रिकन CFC फ्रॅंक हे राष्ट्रीय चलन आहे.
EXIM बँक:-भारतीय निर्यात-आयात बँक (EXIM बँक) ही भारतातली निर्यात-आयात या कार्यांच्या संदर्भातली प्रमुख वित्त संस्था आहे, ज्याची 1982 साली ‘EXIM बँक अधिनियम-1981’ अंतर्गत स्थापना झाली. ही भारताचा आंतर्देशीय व्यवहार आणि गुंतवणूक यांना प्रोत्साहन देण्यामध्ये मुख्य भूमिका वठवते. त्याचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र, भारत) येथे आहे.
 

13 July Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »