17 July Current Affairs

17 July Current Affairs
17 July Current Affairs

कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती भारताचा मोठा विजय

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे.
जाधव यांच्या फाशीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिवाय त्यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची परवानगीही देण्यात आली आहे. भारताच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे.
भारताच्या बाजूने १५ विरुद्ध १ अशा मतांनी हा निकाल देण्यात आला. हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी साडेसहा वाजता सुनावणी सुरू झाली. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ निकाल वाचन केले. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
 

श्रीमंतांच्या यादीतला बिल गेट्सचा क्रमांक घसरला

गेल्या सात वर्षांत जे घडलं नव्हतं ते यावर्षी घडलं आहे. जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकावरून घसरून तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे.
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स मध्ये बर्नार्ड अर्नाल्ट यांनी या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे यादीतले सर्वोच्च स्थान कायम आहे.
बर्नार्ड अर्नाल्ट यांची एलव्हीएमएच ही लक्झरी गुड्सची कंपनी आहे. ते कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ असून फ्रान्समध्ये राहतात.
अर्नाल्ट यांचे वार्षिक उत्पन्न १०७.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. ही संपत्ती मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या संपत्तीहून २०० दशलक्ष डॉर्लर्सने जास्त आहे. २०१९ या एका वर्षांत अर्नाल्टने आपल्या संपत्तीत ३९ अब्ज डॉलर्सची भर घातली आहे.
जगातील 5 सर्वात श्रीमंत व्यक्ती -
-व्यक्ती संपत्ती  (रूपये)
1)जेफ बेझॉस (अमझोन) - 8.62 लाख करोड
2)बर्नार्ड अरनॉल्ट (एलवीएमएम) - 7.45 लाख करोड
3)बिल गेट्स ( मायक्रोसॉफ्ट ) - 7.38 लाख करोड
4)वॉरेन बफे (बर्कशायर हॅथवे) - 5.79 लाख करोड
5)मार्क झकरबर्क (फेसबूक) - 5.48 लाख करोड
 

17 July Current Affairs
17 July Current Affairs

शहीदांच्या कुटुंबियांना मिळणार १ कोटींची मदत

युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीसह देशातील सुरक्षेसंबंधी मोहिमांमध्ये  झालेल्या महाराष्ट्रातील अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या एकरकमी आर्थिक मदतीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शहीद जवानाच्या कुटुंबीयांना २५ लाखांऐवजी एक कोटींची मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमी जवानांनाही २० ते ६० लाखांपर्यंत मदत केली जाणार आहे.
युद्ध व युद्धजन्य परिस्थितीत तसेच देशांतर्गत सुरक्षेसंबंधी मोहिमेदरम्यान प्राण गमावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या तसेच सीमा सुरक्षा बल व इतर निमलष्कर दलातील व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून एकरकमी अनुदान दिले जाते. देशाबाहेरील मोहिमेत शहीद अथवा अपंगत्व आलेल्या जवानांनाही ही मदत दिली जाते. वर्ष १९९९ मधील दोन लाख एवढ्या अनुदानात त्यानंतरच्या शासन निर्णयानुसार वेळोवेळी वाढ करण्यात आली होती. सध्या २७ मार्च २०१८ च्या शासन निर्णयानुसार शहिदांच्या कुटुंबीयांना २५ लाख इतकी आर्थिक मदत म्हणून एकरकमी अनुदान देण्यात येत होते. तसेच अपंगत्व आलेल्या जवानांना अपंगत्वाचे प्रमाण १ टक्का ते २५ टक्के असल्यास ५ लाख, २६ टक्के ते ५० टक्के असल्यास साडेआठ लाख तर ५१ टक्के ते १०० टक्के असल्यास १५ लाख रुपये देण्यात येत होते.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यानुसार १ जोनवारी २०१९ पासून शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या या एकरकमी अनुदानाची रक्कम एक कोटी रुपये करण्यात आली आहे. तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या राज्यातील जवानांना १ टक्के ते २५ टक्के अपंगत्व आल्यास २० लाख, २६ टक्के ते ५० टक्के अपंगत्व आल्यास ३४ लाख व अपंगत्वाचे प्रमाण ५१ टक्के ते १०० टक्के असल्यास ६० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 

नौदलाला लवकरच मिळणार 100 टॉरपॅडो मिसाईल

येत्या काळात नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे. 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 2 हजार रूपयांचे टेंडर जारी केले आहे. तसेच मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार करण्यात येत असलेल्या
स्कॉर्पिअन क्षेणीच्या सहा पाणबुड्यांमध्ये हे टॉरपॅडो मिसाईल तैनात करण्यात येणार आहेत.
100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी 10 दिवसांपूर्वीच एक टेंडर जारी करण्यात आले आहे. स्कॉर्पिअन क्षेणीच्या पाणबुड्यांची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकमध्ये सुरू असून त्यांना कलवरी क्लास हे नाव देण्यात आले आहे.
तसेच या क्षेणीमधील पहिली पाणबुडी यापूर्वीच नौदलात दाखल करण्यात आली आहे. तसेच सध्या ती पाणबुडी ऑपरेशनल मोडमध्ये आहे. सध्या परदेशी विक्रेत्यांकडून नौदलाची मागणी पूर्ण करण्यात येणार असली, तरी त्यानंतरची मागणी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे.
तर डीआरडीओ पाणबुड्यांसाठी तसेच लढाऊ युद्धनौकांसाठी हेवीवेट टॉरपॅडो मिसाईलचा वापर करण्याच्या तयारीत आहे. फ्रान्स, स्वीडन, रशिया आणि जर्मनीच्या जागतिक उत्पादकांना हेवीवॅट टॉरपॅडोसाठी टेंडर जारी करण्यात आले आहे.
यापूर्वी इटालियन फर्म ‘ब्लॅक शार्क टॉरपॅडो’ या कंपनीची यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु हेलिकॉप्टर घोटाळ्यातील नमेक्केनिका समुहाच्या गुंतवणुकीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता.
 

17 July Current Affairs
17 July Current Affairs

झाकीर हुसेनसह 4 जणांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर

जागतिक कीर्तीचे तबलावादक झाकिर हुसेन, नृत्यांगना सोनल मानसिंग, नर्तक व नृत्यदिग्दर्शक जतीन गोस्वामी, भरतनाट्यमचे प्रकाराचे नर्तक व शिक्षक के. कल्याणसुंदरम पिल्लई अश्या या चार प्रतिभावंतांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे.
अन्य सन्मान :-
तसेच अभिनेत्री सुहास जोशी, पार्श्वगायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक यांच्यासह 44 नामवंतांची ‘अकादमी रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
उपयोजित कलाक्षेत्रातील सर्वांगीण कामगिरीबाबत देण्यात येणारे पुरस्कार दिवानसिंह बजेली, पुरु दधिच यांना जाहीर झाला आहे.
ही फेलोशिप प्रत्येकी 3 लक्ष रुपये तर ‘अकादमी रत्न’ पुरस्कार प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचा आहे. विजेत्यांना ताम्रपत्र दिले जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात.
अकादमी रत्न पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :-
1.संगीत : मणिप्रसाद (हिंदुस्थानी शास्त्रीय गायन), मधुप मुद्गल (गायन), तरुण भट्टाचार्य (संतूरवादन), तजेंद्र नारायण मजुमदार (सरोदवादन), अलामेलू मणि, मल्लाडी सुरीबाबू (कर्नाटकी शैलीचे गायन), के. कासिम व एस. बाबू (नागस्वरम), गणेश व कुमारेश (व्हायोलिन वादन), सुरेश वाडकर, शांती हिरानंद (सुगम संगीत), एच. आशानग्बी देवी (नट संकीर्तन).
2.नृत्य : राधा श्रीधर (भरतनाट्यम), इशिरा व मौलिक शाह (कथ्थक - पुरस्कार विभागून), अखाम लक्ष्मी देवी (मणिपुरी), सुरुपा सेन (ओडिशी), गोपिका वर्मा (मोहिनीअट्टम), तानकेश्वर हजारिका (बोर्बायन सत्तरिया), दीपक मजुमदार (समकालीन नृत्य), पशुमूर्ती रामलिंग शास्त्री (कुचिपुडी), तपनकुमार पट्टनायक (छाऊ).
3.नाटक : राजीव नाईक (नाट्यलेखन), लाल्तलुअंग्लिआना खिआंग्ते (नाट्यलेखन), संजय उपाध्याय (दिग्दर्शन), एस. रघुनंदन (दिग्दर्शन), सुहास जोशी (अभिनय), टिकम जोशी (अभिनय), स्वपन नंदी (माईम), भागवत ए. एस. नांजप्पा (यक्षगान), ए. एम. परमेश्वरन (कुटियाट्टम).
4.लोककला, लोकसंगीत इ. : मालिनी अवस्थी (लोकसंगीत), गाझी खान (बरना लोकसंगीत), नरिंदरसिंह (नेगी लोकसंगीत), निरंजन राज्यगुरू (गुजरात लोकसंगीत), मोहम्मद सादिक भगत (लोकनाट्य), कोटा सचिगानंद शास्त्री (हरिकथा), अर्जुन सिंग धुर्वे (लोकनृत्य), सोमनाथ बट्टू (लोकसंगीत), अनुपमा होसकेरे (कळसुत्री बाहुल्या सादरीकरण), हेमचंद्र गोस्वामी (मुखवटे निर्मिती).
भारताची संगीत नाटक अकादमी :-
संगीत नाटक अकादमी ही भारत सरकारद्वारे स्थापन करण्यात कलाप्रदर्शनाच्या क्षेत्रात कार्य करणारी राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना दिनांक 31 मे 1952 रोजी झाली. संस्थेकडून अत्यंत प्रतिष्ठित मानले जाणारे फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रात कलेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सतत कार्यरत आहे.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. 1952 साली या पुरस्काराची स्थापना झाली. तसेच संगीत नाटक अकादमी फेलोशिप, रत्न सदस्य या सन्मानांसाठी 1954 सालापासून दरवर्षी निवड केली जात आहे.
संगीत नाटक अकादमीने आठ भारतीय नृत्य प्रकारांना शास्त्रीय दर्जा प्रदान केला आहेत, ते आहेत :-
1.भरतनाट्यम: मूळ तामिळनाडूमधील
2.ओडिसी: मूळ उडीसामधील
3.कुचीपुडी: मूळ आंध्रप्रदेशामधील
4.मोहिनिअट्टम: मूळ केरळमधील (महिलांकडून सादर केले जाते)
5.सत्रिया: मूळ आसाममधील
6.कथकली: मूळ केरळमधील (पुरुषांकडून सादर केले जाते)
7.कथ्थक: मूळ उत्तर भारतामधील
8.मणीपुरी: मूळ मणीपूरमधील
 

पीएनबी बँकेत पुन्हा घोटाळा

भुषण स्टील ऍण्ड स्टील लिमिटेड कंपनीने पीएनबी बँकेला 3,800 कोटींचा गंडा घातला.
काय आहे प्रकरण:- भूषण पॉवर ऍन्ड स्टील कंपनीने कर्ज देण्यार्‍या बँकांच्या समुहाकडून निधी गोळा करण्यासाठी दस्तएवज आणि खात्यामंध्ये हेराफेरी केली आहे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ही बाब समोर आली आहे.
कोटींचा घोटाळा : पंजाब नॅशनल बॅंकेच्या दुबई शाखेतून 345.74 कोटी, तर हॉंगकॉंग शाखेतून 267.90 कोटी रुपये भूषण पॉवर आणि स्टीलने काढले होते.
भारतातील अनेक शाखांमध्ये सुमारे 3,191.51 कोटी रुपयांची अफरातफर केली आहे. 
सीबीआयकडे तपास वर्ग : याप्रकरणी पीएनबीने रिर्झव्ह बॅंकेकडे तक्रार नोंद केली असून सीबीआयकडे तपास सोपविण्यात आला आहे. भूषण स्टीलही कंपनी आधीच कर्जबाजारी झालेली आहे.

17 July Current Affairs
17 July Current Affairs

रद्द केलेल्या तिकिटांच्या माध्यमातून रेल्वेने कमावले १५०० कोटी

रेल्वेने रद्द केलेल्या तिकिटांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा महसूल कमावला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात रेल्वेने रद्द केलेल्या तिकिटांच्या माध्यमातून 1,536.85 कोटी रूपयांची कमाई केली आहे. तिकिटे रद्द केल्यानंतर तिकिटातून कापल्या जाणाऱ्या रकमेत कपात करण्याचा रेल्वे विचार करत आहे का? असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. अद्याप रेल्वेकडून यावर उत्तर मिळाले नाही.
मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी यासंदर्भात माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाने निरनिराळ्या अर्जांअंतर्गत सदर माहिती दिल्याचे ते म्हणाले. अर्जामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरक्षित तिकिटे रद्द केल्यानंतर त्यातून रेल्वेला 1,518.62 कोटी रूपयांचा महसूल मिळाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर अनारक्षित तिकिट प्रणालीच्या (यूटीएस) माध्यमातून बुक करण्यात आलेल्या तिकिटांना रद्द केल्यामुळे रेल्वेला 18.23 कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, आरक्षित तिकिटे रद्द केल्यानंतर कापल्या जाणाऱ्या रकमेत काही कपात करणार आहे का? असा सवालही रेल्वेला केला असल्याचे गौड म्हणाले. तसेच आपल्याला अद्यापही यावर रेल्वेच्या उत्तराची प्रतिक्षा आहे. तसेच आरक्षित तिकिटे रद्द केल्यानंतर कापली जाणारी रक्कम कमी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
 

सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा

31 डिसेंबरपर्यंत होणार निर्णय लागू! : राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येईल आणि सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.
येत्या 31 डिसेंबरपर्यंत हा निर्णय लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाचा आठवडा पाच दिवसांचा केला जाईल. त्यासाठी डिसेंबर 2019 मध्ये निर्णय घेतला जाईल. यानंतर जानेवारी 2020 पासून हा निर्णय लागू केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महागाई भत्त्यात वाढ : 
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनंतर निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 
निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात येणार आहे. 
त्यामुळे मूळ वेतनावरील महागाई भत्ता 9 टक्क्यांवरून 12 टक्के इतका होईल. 
ऑगस्ट महिन्यात याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
 

17 July Current Affairs
17 July Current Affairs

मार्च 2020 मधील ISSF विश्वचषकाचा टप्पा भारतात होणार

आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) याने पुढच्या वर्षी खेळवले जाणारे ISSF विश्वचषकाचे टप्पे भारतात खेळवले जावेत यासाठीचा भारताचा अर्ज मंजूर केला आहे.
घेतलेल्या निर्णयानुसार ISSF विश्वचषक स्पर्धेचा भाग असलेल्या रायफल / पिस्तूल / शॉटगन प्रकारांसाठी भारतात विविध स्पर्धा आयोजित केल्या जातील. ही स्पर्धा 15 मार्च ते 26 मार्च 2020 या काळात खेळवली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF)
1907 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) याची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय म्यूनिच (जर्मनी) येथे आहे. दरवर्षी चार स्पर्धा खेळवल्या जातात. सर्वोत्तम नेमबाजांसाठी 1988 सालापासून ISSF विश्वचषक अंतिम ही स्पर्धा आयोजित करण्यात येते.
 

AIIB भारतातल्या अक्षय ऊर्जेसंबंधी पायाभूत प्रकल्पांसाठी L&T ला $100 दशलक्षचे कर्ज देणार

भारतातल्या पवन आणि सौर ऊर्जेसंबंधी पायाभूत प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने, आशियाई पायाभूत सुविधा विकास बँक (AIIB) एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीला 100 दशलक्ष डॉलरचे कर्ज देण्याचे मान्य केले आहे. AIIB ने एखाद्या बिगर-बँकिंग वित्त कंपनीला कर्ज देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
AIIBच्या या नव्या प्रकल्पामुळे खासगी भांडवल उभारण्यात मदत मिळून भारतात अक्षय ऊर्जेचा पुरवठा वाढेल.
2022 सालापर्यंत भारताने 175 गीगावॉट (GW) अक्षय ऊर्जा क्षमता प्रस्थापित करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे, ज्यापैकी मे 2019 पर्यंत देशात 80.04 GW क्षमता प्रस्थापित केली गेली आहे.
आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे आणि जानेवारी 2016 पासून ही सेवेत आहे. त्याचे मुख्यालय बिजींग (चीन) येथे आहे. जगभरात त्याचे 86 सदस्य आहेत. ही बँक आशियामधील पायाभूत सुविधांसंबंधी विकास प्रकल्पांसाठी आर्थिक मदत प्रदान करते.
 

17 July Current Affairs

AIIB भारतातल्या अक्षय ऊर्जेसंबंधी पायाभूत प्रकल्पांसाठी L&T ला कर्ज

भारतातल्या पवन आणि सौर ऊर्जेसंबंधी पायाभूत प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने, आशियाई पायाभूत सुविधा विकास बँक (AIIB) एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीला 100 दशलक्ष डॉलरचे कर्ज देण्याचे मान्य केले आहे. AIIB ने एखाद्या बिगर-बँकिंग वित्त कंपनीला कर्ज देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
AIIBच्या या नव्या प्रकल्पामुळे खासगी भांडवल उभारण्यात मदत मिळून भारतात अक्षय ऊर्जेचा पुरवठा वाढेल.
2022 सालापर्यंत भारताने 175 गीगावॉट (GW) अक्षय ऊर्जा क्षमता प्रस्थापित करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे, ज्यापैकी मे 2019 पर्यंत देशात 80.04 GW क्षमता प्रस्थापित केली गेली आहे.
आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे आणि जानेवारी 2016 पासून ही सेवेत आहे. त्याचे मुख्यालय बिजींग (चीन) येथे आहे. जगभरात त्याचे 86 सदस्य आहेत. ही बँक आशियामधील पायाभूत सुविधांसंबंधी विकास प्रकल्पांसाठी आर्थिक मदत प्रदान करते.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »