17 Sep Current Affairs

17 Sep Current Affairs
17 Sep Current Affairs

हल्ला सौदीत झळा भारताला

[पार्शवभूमीसाठी या आधीच्या न्यूज वाचा]

 • सौदी अरेबियातील सर्वांत मोठी तेल कंपनी असलेल्या अरामको कंपनीच्या अबकैक आणि खुरैस येथील प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाचे भाव पाच ते सहा टक्क्यांनी वाढले. 
 • सोमवारी दुपारीच ब्रेन्ट निर्देशांक १० टक्क्यांनी वाढून ६६.३ प्रतिबॅरलवर गेला. त्या आधी त्याने ७२ डॉलरची पातळी गाठली होती. 

सौदी अरेबियातील या घडामोडींचा तेलाच्या दरावर कसा आणि का परिणाम होतो, यावर टाकलेला दृष्टिक्षेप:-

सौदीचे तेल बाजारातील स्थान:-

 • सौदी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे.
 • सौदी दर दिवशी १० कोटी बॅरल तेल उत्पादन करतो.
 • ताज्या हल्ल्यामुळे सध्या ५७ लाख बॅरल तेल उत्पादन होत आहे.
 • सौदीवरील हल्ल्यामुळे तेलाच्या किमती १०० डॉलरपर्यंत भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तेलाचा पुरवठा घटणार:-

 • ताज्या हल्ल्यांमुळे सौदीतील उत्पादन कमी झाले आहे,
 • परिणामी, जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा कमी होऊ शकतो.
 • इराणसारख्या देशांवरील निर्बंधांमुळे तेथूनही तेलखरेदी बंद आहे.

तेलाच्या दरावर काय परिणाम होईल?:-

 • तज्ज्ञांच्या मते, सौदी अरामकोवरील हल्ल्यांचा परिणाम मर्यादित राहील.
 • हा परिणाम फार काळ राहणारही नाही.
 • भारतीय बाजारात किरकोळ बाजारातील किमती मात्र वाढू शकतात.
 • भारतीय तेल कंपन्यांकडे पुरेसा साठा असल्यामुळे दरवाढही मर्यादितच राहील.

भारताला अधिक फटका का बसतो?:-

 • भारत आपल्या एकूण गरजेपैकी ८० तेल आयात करतो.
 • एकूण गरजेपैकी १८ टक्के नैसर्गिक वायूही आयात करतो.
 • यातील बहुतेक आयात आखाती देशांतून केली जाते.
 • या भागात तणाव वाढल्यास भारताला त्याची झळ सर्वाधिक बसते.

१ डॉलर तेलाच्या किमतीतील वाढ झाल्यास:-

 • १०,७०० कोटी रुपये - भारताला मोजावी लागणारी किंमत
 • १११.९ अब्ज डॉलर - भारताने २०१८-१९मध्ये तेल आयातीपोटी मोजलेली रक्कम

पेट्रोलचे दर पुन्हा भडकणार:-

 • सौदी अरेबियातील अरामको या आघाडीच्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर गेल्या आठवड्यात झालेल्या ड्रोन हल्ल्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. या हल्ल्यामुळे सोदी अरेबियाचे इंधन उत्पादन घटले असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. 
 • या घडामोडी भारतासाठी कमालीच्या मारक ठरण्याची शक्यता असून कच्च्या इंधनाचे दर चढेच राहिल्यास पेट्रोलदरात प्रतिलिटर पाच ते सहा रुपयांनी वाढ होण्याचे भीती व्यक्त होत आहे.
 • सरकारी इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनीही या शक्यतेस दुजोरा दिला आहे. कच्च्या इंधनाच्या किमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ होत राहिल्यास देशांतर्गत पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. मात्र कच्च्या इंधनातील ही दरवाढ फार दिवस टिकणार नाही. 
 • भारताला दिलासा अरामकोच्या इंधन उत्पादनात घट झाली असली, तर सौदी अरेबियाकडून भारताला होणाऱ्या इंधन पुरवठ्यात कपात केली जाणार नाही असे सौदीने स्पष्ट केले आहे. 
 • पुरेशा इंधन पुरवठ्याबाबत सौदी अरामकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या इंधन कंपन्यांना रविवारीच आश्वस्त केले आहे. मात्र तेथील परिस्थितीवर लक्ष असून अरामकोचे इंधन उत्पादन पूर्वपदावर आल्यानंतर आपली काळजी दूर होईल. 
 • सौदीवरच भिस्त भारताच्या एकूण देशांतर्गत इंधन गरजेपैकी सुमारे ८० टक्के गरज ही आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. यामध्ये सर्वाधिक इंधन हे सौदी अरेबियाकडून घेतले जाते. गेल्या आर्थिक वर्षात भारताने सौदीकडून चार कोटी टन कच्चे इंधन आयात केले होते.
   

क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची मागणी

 • भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची समस्या दूर करण्यासाठी मॅच फिक्सिंगशी संबंधित नियम करण्यात यावेत, तसेच क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्यात यावी. त्यामुळं सरकारचा मोठा फायदा होईल, असं मत बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख अजितसिंग शेखावत यांनी व्यक्त केलं आहे. शेखावत हे याआधी राजस्थानचे पोलीस महासंचालक होते.
 • गेल्या वर्षभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसहित बारा खेळाडूंविरोधात भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारी, तसंच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली तामिळनाडू प्रीमिअर लीग आणि महिला क्रिकेटपटू सट्टेबाजांच्या संपर्कात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 
 • त्या पार्श्वभूमीवर शेखावत यांनी मॅच फिक्सिंगसंबंधी नियम आणि क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची शिफारस केली आहे. मॅच फिक्सिंगसंबंधी नियम करण्याची गरज का आहे हे देखील त्यांनी स्पष्ट करून सांगितले. मॅच फिक्सिंग रोखणे शक्य नाही. त्यासाठी मॅच फिक्सिंगसंबंधी नियम करण्याची गरज आहे. भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी सट्टेबाजीही कायदेशीर करावी, असेही त्यांनी सूचवले.
 • सट्टेबाजी कायदेशीर केली तर भ्रष्टाचार नियंत्रणात आणता येईल, तसंच या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूलही मिळेल. 
 • सट्टेबाजी कायदेशीर केल्यानंतर कोण सट्टेबाजी करतो आणि किती रकमेचा सट्टा लावला जातो, याची आकडेवारीही मिळू शकेल.
   
17 Sep Current Affairs
17 Sep Current Affairs

मोदींचे आमसभेत २७ सप्टेंबरला भाषण

 

 • पतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७४व्या सत्रात भाषण करणार आहेत. 
 • मोदी यांच्या या आठवडाभराच्या दौऱ्यामध्ये विविध द्विपक्षीय आणि बहुस्तरीय चर्चा-बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. 
 • मोदी यांच्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही २७ सप्टेंबर रोजी आमसभेत भाषण देणार आहेत. 
 • आमसभा २४ ते ३० सप्टेंबर या काळात होणार आहे. 
 • या सत्रामध्ये ११२ देशांचे प्रमुख, ४८ देशांतील सरकारांचे प्रमुख आणि ३० परराष्ट्रमंत्री आमसभेत भाषण करतील. 
 • दरम्यान, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे नरेंद्र मोदी यांना 'ग्लोबल गोलकीपर अवार्ड'ने गौरवण्यात येणार आहे. 
 • मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांचा हा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय, मोदी २२ सप्टेंबर रोजी ह्युस्टनला पोहोचण्याची शक्यता असून, तेथे भारतीय-अमेरिकन नागरिकांसमोर भाषण करणार आहेत.
 • या सभेला ५० हजारांपेक्षा जास्त भारतीय हजर राहण्याची शक्यता आहे.टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित राहणार आहेत. ट्रम्प यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अभूतपूर्व होत असून, यातून दोन्ही देशांमधील मैत्री व सहकार्याचा दृढ संबंधच दिसून येत असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
 • पुढील आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याची सुरुवात ह्युस्टनच्या एनआरजी स्टेडियममधील सभेतून होणार आहे. 'हाउडी, मोदी' या नावाने होणाऱ्या या कार्यक्रमाला ५० हजारांपेक्षा जास्त भारतीय-अमेरिकन नागरिकन उपस्थित राहणार आहेत. गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये झालेल्या भेटीमध्ये मोदी यांनी ट्रम्प यांना विनंती केली आणि ट्रम्प यांनी तत्काळ हे निमंत्रण स्वीकारले

अमेरिकेचे अध्यक्ष प्रथमच भारतीयांसमोर:-

 • अमेरिकेचे अध्यक्ष प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय-अमेरिकन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. गेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात ट्रम्प यांनी ऑक्टोबर २०१६मध्ये न्यू जर्सीमध्ये पाच हजार भारतीयांसमोर भाषण केले होते. 
 • मोदी २०१४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यापासून, अमेरिकेमध्ये भारतीय-अमेरिकन नागरिकांची सभा घेण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यांनी सन २०१४मध्ये न्यूयॉर्क, तर २०१६मध्ये सिलीकॉन व्हॅलीमध्ये सभा घेतली होती. या दोन्ही कार्यक्रमांना २० हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.
   

पाकचा अंतराळवीर २०२२पर्यंत अवकाशात

 • 'चीनच्या मदतीने पाकिस्तान २०२२पर्यंत पहिला अंतराळवीर अवकाशात पाठविणार आहे,' अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री चौधरी फावद हुसेन यांनी दिली. 'अंतराळवीराची निवडप्रक्रिया २०२०मध्ये सुरू होईल. सुरुवातीला ५० जणांची निवड केली जाईल. 
 • २०२२ पर्यंत त्यातील सर्वोत्कृष्ट २५ जणांची निवड होईल. अंतिमत: त्यातील एक जण प्रत्यक्षात अंतराळात जाईल. अंतराळवीराची निवड करण्यामध्ये पाकिस्तानचे हवाई दल महत्त्वाची भूमिका बजावेल,' असे फावद यांनी सांगितले.
 • ते म्हणाले, 'या क्षेत्रात भारताबरोबर सहकार्य महत्त्वाचे ठरेल. सोव्हिएत संघराज्याने १९६३मध्ये पहिल्यांदा अवकाशात रॉकेट सोडल्यानंतर आशियामध्ये तसे करणारा पाकिस्तान हा दुसरा देश होता. गेल्या वर्षी चीनच्या लाँच पॅडवरून पाकिस्तानने दोन देशी बनावटीचे उपग्रह अवकाशात सोडले आहेत.'
   
17 Sep Current Affairs
17 Sep Current Affairs

देशात दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार

 • देशात पहिल्यांदाच ७०० मेगावॉट क्षमतेचे तब्बल दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार आहेत. २०३१ पर्यंत देशाची अणुऊर्जा क्षमता २२ हजार ४८० मेगावॉटपर्यंत जाईल. १९६० आणि ७० च्या दशकात डॉ. विक्रम साराभाई व डॉ. होमी भाभा यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे निकाल आहेत.
 • 'देशात पहिल्यांदाच ७०० मेगावॉट क्षमतेचे तब्बल दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार आहेत. २०३१ पर्यंत देशाची अणुऊर्जा क्षमता २२ हजार ४८० मेगावॉटपर्यंत जाईल. १९६० आणि ७० च्या दशकात डॉ. विक्रम साराभाई व डॉ. होमी भाभा यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे निकाल आहेत. 
 • डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नेहरू विज्ञान केंद्रात सोमवारी 'अंतराळात भारत व अणुऊर्जा' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र झाले. अंतराळ विज्ञान व अणुऊर्जा क्षेत्रात कार्यरत संशोधकांनी त्यात विचार मांडले. 
 • डॉ. चिदंरबरम म्हणाले, 'आर्थिक क्षेत्रात देश सध्या विकसनशील असला तरी अंतराळ विज्ञान व अणुऊर्जा या क्षेत्रात विकसित देशांच्या यादीत आहोत. याचे श्रेय डॉ. सारभाई व डॉ. भाभा यांनाच जाते. त्यांनी त्यावेळी स्वप्न पाहिले, त्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना त्यावेळी सरकारनेही भरभरून सहकार्य दिले. त्याची रसाळ फळे आपल्यासमोर आहेत.
 • देशाची ऊर्जा मागणी वाढती आहे. अशावेळी औष्णिक निर्मितीतूनच सर्वाधिक वीज मिळत असली तरी त्यातून प्रदूषणही खूप होते. पण आता अणुऊर्जेच्या वापराद्वारे औष्णिक वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील प्रदूषण कमी करता येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
 • इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार म्हणाले, 'डॉ. साराभाई यांच्या तेव्हाच्या प्रयत्नामुळेच आज मंगळ, चांद्रयान यासारखे प्रकल्प डोळ्यांसमोर दिसत आहेत. भारताने क्रायोजनिक इंजिन देशात तयार केले आहे. जीएसएलव्हीच्या तीन यशस्वी मोहिमा केल्या आहेत. पुढील काळात लवकरच उपग्रह वाहनाचा पुनर्वापर करण्याबाबतही विचार सुरू आहे. भारताने सोडलेला उपग्रह समुद्रात नाविकांना दिशा देत आहे. या यशाचे श्रेय डॉ. साराभाई यांनाच जाते.'

दुबई इंटरनॅशनल बॅडमिंटन तानिशाने जिंकले भारतासाठी सुवर्णपदक

 • दुहेरी गटात कामगिरी, भारताला एकूण सहा पदकेपदकांमागून पदके मिळवणाऱ्या गोव्याच्या तानिशाने पुन्हा एकदा सुवर्णमय धडाका दिला. दुबई इटरनॅशनल ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत तानिशान देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत भारताने तीन सुवर्णपदकांसह एकूण सहा पदकांची कमाई केली. त्यात तानिशाचे पदक गौरवास्पद ठरले. 
 • तानिशा आणि आदिती भट ही जोडी पुन्हा चमकली. मुलींच्या दुहेरी गटात खेळतान या जोडीने भारताच्याच जोडीचा म्हणजे त्रिसा आणि वर्षिणी यांचा पराभव केला. अंतिम सामना रोमांचक होईल, अशी अपेक्षा होती; मात्र तानिशा-आदितीने हा सामना २१-१७, २१-१७ अशा दोन गेमध्ये जिंकला. एकेरी गटात तसनीम मीर हिने किताब पटकाविला. 
 • मिश्र दुहेरीत तसनीम आणि राशिद यांनी सुवर्णपदक मिळवून दिले. मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित वरुण कपूरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला नेपाळच्या दुसºया मानांकित प्रिन्स दहलने अत्यंत रोमांचक सामन्यात २१-१९, २१-१९ ने पराभूत केले. 
 • दरम्यान, गोव्याच्या तानिशाने सुवर्णपदकाची मोहीम कायम राखली. तानिशाने भारतात झालेल्या अखिल मानांकन ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या होत्या. या दोन स्पर्धा जिंकल्यानंतर तानिशाने विश्व ज्युनियर स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले होते. 
 • आता दुबईतील स्पर्धा जिंकल्याने तानिशा या स्पर्धेतही देशाला पदक जिंकून देईल, असा विश्वास निवडकर्त्यांना आहे. तानिशा आणि उत्तराखंडची तिची साथीदार आदिती भट यांनी सलग विजेतेपद जिंकून ज्युनियर गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे
   
17 Sep Current Affairs
17 Sep Current Affairs

ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बडतर्फ

 • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांची हकालपट्टी केली. त्यांच्या अनेक कल्पना मला अमान्य असल्याने ही कारवाई केल्याचे ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 
 • नव्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची निवड पुढील आठवडय़ात जाहीर होईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, मी स्वत: सोमवारी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर उद्या पाहू, असे ट्रम्प मला म्हणाले होते. मी वाट पाहून सकाळी त्यांना राजीनामा पाठवला.
 • त्यानंतर त्यांनी माझी बडतर्फी जाहीर केली आहे, असे ट्विट बोल्टन यांनी केले.
 • ट्रम्प यांच्या कारकिर्दीतले बोल्टन हे चौथे आणि सर्वाधिक काळ पदावर राहिलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.पहिले सल्लागार मिशेल फिन फक्त २४ दिवस पदावर होते.
   

अरुणाचल प्रदेश चीन सीमेवर प्रथमच भारतीय लष्कर करणार मोठा युद्धाअभ्यास

 • भारतीय लष्कराकडून वायुसेनेबरोबर चीनच्या सीमेवर ऑक्टोबर महिन्यात मोठा युद्धाअभ्यास केला जाणार आहे. भारतीय सेनेच्या एकमेव '17 - माउंटन स्ट्राइक कोर'चे पाच हजार जवान अरूणाचल प्रदेशात होणाऱ्या या मोठ्याप्रमाणावरील युद्धाअभ्यासात सहभागी होणार आहेत. 
 • चीनच्या सीमेवर भारतीय सेनेचा हा पहिलाच युद्धाअभ्यास असणार आहे. या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जवानांना तैनात केले जाणार आहे.
 • यासाठी नवनिर्मित '17 - माउंटन स्ट्राइक कोर' कडून पाच ते सहा महिन्यांपासून ईस्टर्न कमांड अंतर्गत तयारी केली जात आहे. सेनेच्या सुत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार युद्धाअभ्यासात तेजपूरमधील 4 कोर तुकड्यांना सेनेच्या रक्षणासाठी एका अतिउच्च ठिकाणी तैनात केले जाणार आहे. 
 • यामध्ये '17 - माउंटन स्ट्राइक कोर' च्या अडीच हजारपेक्षा जास्त जवानांना वायुसेना युद्धाअभ्यासासाठी एअरलिफ्ट करणार आहे. या युद्धाअभ्यासादरम्यान स्ट्राइक कोरचे जवान, 4 कोरच्या जवानांवर हवाई हल्ला करणार आहेत.
 • या युद्धाअभ्यासासाठी वायुसेना पश्चिम बंगालमधील बगदोगरा येथून सैनिकांना एअरलिफ्ट करणार आहे. यासाठी वायुसेना सी-17 ग्लोबमास्टर, सी-130 जे सुपर हरक्युलिस आणि एएन-32 या विमानांचा वापर करणार आहे. ज्यामुळे लवकरात लवकर युद्ध क्षेत्राच्या ठिकाणी सैन्य तैनात करता येणार आहे.
 • याशिवाय या युद्धाअभ्यासात '17 - माउंटन स्ट्राइक कोर' च्या हॉवित्झर तोफांबरोबर रणगाडे आणि लष्कराच्या लढाऊ तुकड्यांचा शस्त्रसज्जतेसह समावेश असणार आहे. या युद्धाअभ्यासाचे आयोजन चीन बरोबर पर्वतीय क्षेत्रात युद्धासाठी '17 - माउंटन स्ट्राइक कोर' ला अधिक सक्षम बनवण्यासाठी केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
   
17 Sep Current Affairs
17 Sep Current Affairs

MDH च्या मसाल्यामध्ये घातक जीवाणू अमेरिकेने परत पाठवले मसाले

 • भारतामधील प्रसिद्ध मसाला कंपनी असणाऱ्या एमडीएचचे मसाले अमेरिकेने परत पाठवले आहेत. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्राधिकरणाने एमडीएचचे तीन मोठ्या ऑर्डर भारतात परत पाठवल्या आहेत. एमडीएचच्या सांबर मसाल्यांमध्ये अन्नामधून विषबाधा होण्यासाठी कारणीभूत असणारे साल्मोनेला जीवाणू (बॅक्टेरिया) असल्याचे चाचणीत दिसून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
 • 'एमडीएचच्या प्रोडक्टच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) काही चाचण्या केल्या. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या मसाल्यांमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असल्याचे निष्पण्ण झाले,' असं अमेरिकन एफडीएने ७ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या पत्रकामध्ये नमूद केले आहे. परत पाठवण्यात आलेला सांबर मसाल्याची पाकिटे उत्तर कॅलिफोर्नियामधील रिटेल स्टोर्समध्ये विक्रिसाठी भारतातून अमेरिकेत निर्यात करण्यात आली होती. 
 • एमडीएचसाठी या मसाल्यांची निर्मिती आर प्युअर अॅग्रो स्पेसलिस्ट या कंपनीने केली होती. तर त्याचे वितरण हाऊस ऑफ स्पाइस (इंडिया) कंपनीने केले होते. आर प्युअर बोर्डाचे संचालक हे एमडीएचच्या संचाकल मंडळातही असल्याचे द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
 • अमेरिकन एफडीएने जारी केलेल्या पत्रकामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असलेले पादर्थ खाल्ल्यास अतिसार, ओटीपोटात दुखणे, ताप येणे यासारखे आजार होऊ शकतात असा इशाराही नागरिकांना दिला आहे. हे आजार चार ते पाच दिवसात कोणत्याही उपचाराशिवाय बरे होत असले तरी कधीकधी अधिक त्रास झाल्यास उपचारांसाठी थेट रुग्णालयातही दाखल करावे लागते असंही एफडीएने म्हटले आहे. 'वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना साल्मोनेला बॅक्टेरियामुळे त्रास होण्याची शक्यता अधिक जास्त असते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्ती बॅक्टेरियामुळे लवकर आजारी पडू शकतात,' असा इशाराही एफडीएने दिला आहे.
 • अमेरिकेत निर्यात करण्यात येणारेच मसाले भारतात वितरित केले जातात का याबद्दलची कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही असं 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
   

टी २०मध्ये नवा करिश्मा सात चेंडूत सात षटकार युवीचा विक्रम कायम

 • सात चेंडूवर एकापाठोपाठ सात षटकार लगावण्याची किमया साधली
 • अफगाणिस्तान संघाने शनिवारी टी-२० मध्ये नवीन करिश्मा केला आहे. सात चेंडूवर एकापाठोपाठ सात षटकार लगावण्याची किमया अफगाणिस्तानच्या संघाने केली आहे. बांग्लादेशात सुरु असलेल्या त्रिकोणीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात अफगानिस्तानच्या संघाने झिम्बाब्वेचा २८ धावांनी पराभव केला. मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह यांनी अफगाणिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली.
 • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह यांच्याबळावर अफगाणिस्तानने झिम्बाब्वेसमोर १९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रतिउत्तर झिम्बाब्वेच्या संघाला केवळ १६९ धावा करता आल्या.
 • पहिल्या टी-२० सामन्यात मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह यांनी सलग सात चेंडूवर सात षटकार लावले आहेत. तरीदेखील त्यांना भारताचा फलंदाज युवराजचा विक्रम मोडता आला नाही. 
 • प्रथम फलंदाजी करताना १७ व्या षटकाच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर मोहम्मद नबीने चार षटकार लगावले. त्यानंतर १८ व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर नजीबुल्लाहने सलग तीन षटकार लगावले. युवराजने इंग्लंडच्या ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार लगावले होते. त्यामुळे युवीचा विक्रम अद्यापही अबाधित आहे.
   
17 Sep Current Affairs
17 Sep Current Affairs

के 2 18 बी एक्स्पोनेटवर प्रथमच पाण्याची वाफ शोधली

 • अलीकडे, यूएस स्पेस एजन्सी नासाच्या हबल टेलीस्कोपने के 2-18 बी एक्स्पप्लानेटवर पाण्याचे वाष्प शोधले. आपल्या सौर मंडळाच्या बाहेरील ग्रहावर वैज्ञानिकांना पाण्याची वाफ सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे ज्याला एक्सोप्लानेट देखील म्हणतात.
 • हे ग्रह त्याच्या राहत्या प्रदेशात आहे हे शास्त्रज्ञांच्या दृष्टीने फार आनंददायक आहे, म्हणजेच तो तारा किंवा सूर्यापासून फारच दूर नाही.
 • हे 2015 मध्ये नासाच्या केपलर स्पेशल टेलीस्कोपने शोधले होते. ११० प्रकाश वर्ष दूर असलेल्या त्याच्या लाल बौने ताराभोवती फिरणारी ही एक्सोप्लानेट आहे आणि ११० प्रकाश वर्ष दूर लिओ नक्षत्रात आहे. हे पृथ्वीच्या आकारापेक्षा आठपट मोठे आहे तर पृथ्वीच्या आकारापेक्षा दुप्पट आहे.
   

दि विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020 ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वोत्तम

 • लडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 • भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), रोपार या केवळ दोन भारतीय संस्थांनी या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये जागा मिळविलेली आहे. 
 • मात्र या यादीत कोणत्याही भारतीय संस्थेला प्रथम 300 मध्ये जागा मिळविण्यात यश आलेले नाही. 
 • या दोन संस्थांनी समान गुणासह संयुक्तपणे क्रमांक ‘301-350’ या गटात जागा मिळविलेली आहे.

ठळक बाबी:-
जगातले सर्वोत्तम विद्यापीठ - ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ब्रिटन.
परथम 10 सर्वोत्तम विद्यापीठे (अनुक्रमे) - 
1) ऑक्सफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया
2) इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका), 
3) केंब्रिज विद्यापीठ (ब्रिटन), 
4) स्टॅनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका),
5) मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका), 
6) प्रिन्सटन विद्यापीठ (अमेरिका), 
7) हार्वर्ड विद्यापीठ (अमेरिका), 
8) येल विद्यापीठ (अमेरिका), 
9) शिकागो विद्यापीठ (अमेरिका), 
10) इम्पीरियल कॉलेज लंडन (ब्रिटन)

 • जागतिक क्रमवारीत भारताची उपस्थिती सुधारली असून गतवर्षी केवळ 49 संस्था यादीत समाविष्ट होत्या मात्र यंदा 56 संस्थांचा क्रमांक लागला आहे.
 • नवीन IIT इंदौर या संस्थेचे 351-400 गटात स्थान आहे, जेव्हा की जुन्या संस्था 401-500 गटात आढळून येत आहेत. 
 • पजाब विद्यापीठ, चंदीगड 601-800 या गटात कायम असून IIT गांधीनगर नव्यानेच 501-600 या गटात प्रवेश केला आहे.
 • जागतिक क्रमवारीत समाविष्ट केल्या गेलेल्या भारतीय संस्थांच्या संख्येमुळे, भारत हा आशिया खंडात पाचव्या स्थानावर असून जापान आणि चीन अव्वल आहेत.
17 Sep Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »