18 July Current Affairs

18 July Current Affairs
18 July Current Affairs

स्मृती मानधना आणि रोहन बोपण्णा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना आज अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचे क्रीडा मंत्रा किरेन रिजिजू यांच्या हस्ते स्मृती आणि रोहन यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेल्या वर्षभरात स्मृती आणि रोहन यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या संघटनांनी त्यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि या दोघांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 

‘इनक्रेडिबल इंडिया’ अभियानाने जिंकला PATA गोल्ड अवॉर्ड 2019

देशभरातल्या पर्यटनासंबंधी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या "फाइंड द इनक्रेडिबल यू" अभियानाने ‘पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (PATA) गोल्ड अवॉर्ड 2019 हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकला.
"मार्केटींग – प्रायमरी गवर्नमेंट डेस्टीनेशन" श्रेणीच्या अंतर्गत हा पुरस्कार दिला गेला आहे. देशभरात आणि विश्वात भारतीय वारसा पर्यटनाच्यादृष्टीने प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने 2002 साली अधिकृतपणे "इनक्रेडिबल इंडिया" या ब्रॅंडखाली एक आंतरराष्ट्रीय उपक्रम सुरू केला. मोहिमांना पुढील स्तरावर नेण्यासाठी, 'इनक्रेडिबल इंडिया 2.0' मोहिम सप्टेंबर 2017 मध्ये सुरू करण्यात आली. या मोहिमेचा भाग म्हणून, मंत्रालयाद्वारे योग, कल्याण, लक्झरी, पाककृती आणि वन्यजीवन यावर पाच नवीन दूरदर्शन जाहिराती तयार करण्यात आल्या, ज्याचे प्रसारण दूरदर्शन आणि सोशल मिडीयावर केले गेले.
 

18 July Current Affairs
18 July Current Affairs

पाकिस्तानकडून हवाईक्षेत्र खुले

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने बंद केलेले हवाईक्षेत्र पुन्हा खुले करण्यात आले असून मंगळवारपासून भारत-पाकिस्तान दरम्यान हवाई वाहतूक सेवा पूर्ववत झाली. नागरी विमानांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र साडेचार महिन्यांनी खुले झाले आहे.
पाकिस्तानच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे, की पहाटे १२.४१ वाजेपासून हवाई क्षेत्र नागरी विमानांसाठी खुले करण्यात येत आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने जाहीर केलेल्या मार्गावर ही वाहतूक खुली करण्यात आली आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्र खुले केल्यानंतर भारतानेही आपले हवाई क्षेत्र खुले केले आहे.
सरकारी सूत्रांनी सांगितले, की पाकिस्तानने हवाई क्षेत्र खुले केल्यानंतर आता भारतानेही आपले हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी पाकिस्तानला खुले केले आहे. बंद असलेले हवाई मार्ग वापरण्याची परवानगी मिळताच विमान कंपन्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पाकिस्तानने सर्व विमान कंपन्यांच्या विमानांना पहाटे १२.४१ पासून परवानगी दिल्याने आता नवीन मार्ग वापरण्यास सुरुवात झाली.
पाकिस्तानने २६ फेब्रुवारीला बालाकोट  येथे भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर त्यांच्या देशातून जाणारे हवाई मार्ग भारताला बंद केले होते. त्यानंतरच्या काळात एकूण ११ मार्गापैकी दक्षिण पाकिस्तानातून जाणारे दोन मार्ग खुले करण्यात आले होते. पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्याने इंडिगो कंपनीला दिल्ली-इस्तम्बूल थेट सेवा सुरू करता आली नव्हती. त्यांना ही सेवा कतारमधील दोहा येथे इंधन भरून लांबच्या मार्गाने द्यावी लागत होती.
 

चुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजारांचा दंड

सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स  भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना चूक झाल्यास दहा हजारांचा दंड बसणार आहे. सरकार लवकरच ‘इन्कम टॅक्स ऍक्ट’शी संबंधित नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार नंबर चालू शकणार आहे, ही महत्त्वाची घोषणा दुसऱ्या टर्मचा पहिल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली होती. तर त्यामुळे सरकारी कागदपत्रावर किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार नंबर टाकाताना सावधानता बाळगा. चुकीचा आधार नंबर टाकल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.
‘इन्कम टॅक्स ऍक्ट’च्या कलम 272 नुसार हा बदल केला जाणार आहे. हा नवीन नियम 1 सप्टेंबर 2019 पासून लागू होण्याची शक्यता आहे.

18 July Current Affairs
18 July Current Affairs

ADBने भारताचा GDP वृद्धीदराचा अंदाज 7% एवढा कमी केला

दक्षिण आशियाई क्षेत्राचा विकास दर भक्कम राहणार असून तो 2019 साली 6.6% तर 2020 साली 6.7% असेल असा अंदाज आशियाई विकास बँकेनी (ADB) केला आहे.
तसेच चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल स्थानिक उत्पन्नाच्या वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवर वर्तवला आहे. तर 2020 या वर्षात हा 7.2% असण्याचा अंदाज बांधला आहे.
दक्षिण आशियाई क्षेत्रासाठी 2019 या वर्षात विकास दर 6.6% आणि 2020 या वर्षी 6.7% असेल असा अंदाज आहे.
सकल स्थानिक उत्पन्न (GDP) म्हणजे काय?:-
सकल स्थानिक उत्पन्न (Gross domestic product -GDP) हे सर्वसाधारणपणे वर्षभरात उत्पादित केल्या गेलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाचे आर्थिक मोजमाप आहे. GDPला "राष्ट्रीय विकास आणि प्रगतीसाठीचे जगातले सर्वात शक्तिशाली सांख्यिकीय निर्देशक" मानले जाते.
विलियम पेटी या ब्रिटिश अर्थशास्त्रीने सन 1654-1676 या काळात पहिल्यांदा GDP ची मूलभूत संकल्पना मांडली. पुढे 1695 साली चार्ल्स डेव्हनंट ह्यांनी त्यासंबंधी पद्धती विकसित केली. सन 1934 मध्ये अमेरिकेच्या सायमन कुझनेट्स ह्यांनी GDPची आधुनिक संकल्पना प्रथमताः विकसित केली. नंतर ब्रेटन वुड्स परिषद-1944 मध्ये देशाची अर्थव्यवस्था मोजण्यासाठी GDP ला मुख्य साधन बनविले गेले.
आशियाई विकास बँक (ADB):-
ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली. मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे. “फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. याचे 67 देश सदस्य आहेत.
 

जाणून घ्या काय आहेत NIA विधेयकातील महत्त्वाच्या बाबी

लोकसभेत सोमवारी एनआयए संशोधन विधेयक 2019 पारित करण्यात आले. मोठ्या चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक पारित करण्यात आले. या विधेयकामुळे एनआयएची कक्षा रूंदावणार आहे. दरम्यान, आज संपूर्ण जगाला आणि भारताला दहशतवादाचा सामना करायचा असल्याचे गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. तपास यंत्रणांना अधिक सक्षम करणं हे या विधेयकाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
काय आहेत महत्त्वाच्या बाबी:-
या विधेयकामुळे एनआयएच्या कक्षा देशातच नाही तर देशाबाहेरही रूंदावणार आहेत. देशाबाहेर भारतीयांवर दहशतवादी हल्ले झाल्यास, तसेच भारतीय हितसंबंध असलेल्या ठिकाणी हल्ले झाल्यास सदर ठिकाणी एएनआयला तपास करता येणार आहे. दरम्यान, एनआयएने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला आपण दहशतवादी नसल्याचेही सिद्ध करावे लागणार आहे.
एनआयएला दहशतवादा व्यतिरिक्त मानवी तस्करीशी निगडीत तपासाचे अधिकार देण्यात येणार असल्याचेही विधेयकात म्हटले आहे.
एनआयएला अतिरिक्त अधिकार देण्यात आले आहेत. त्यांना आता सायबर गुन्ह्यांचाही तपास करता येणार आहे.
भारताबाहेर भारतीय नागरिकांविरोधात तसेच भारताचे भारताचे हितसंबंध बिघडतील अशी कृती करणाऱ्यांविरोधातही एनआयएला कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
एनआयएला बनावट नोटांसंबंधीत गुन्ह्यांच्या तपासाचेही अधिकार देण्यात आले आहेत.
एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स अॅक्ट, 1 9 08 च्या अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांच्या तपासणीसाठी एनआयएला सक्षम करण्यात आले आहे.
हत्यारांची निर्मिती आणि त्यांच्या विक्री संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांचा तपासही आता एनआयएला करता येणार आहे.
एनआयएच्या कक्षेत येणारे गुन्हे किंना अन्य गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. 
दरम्यान, देशाच्या सुरक्षेसाठी अति महत्त्वाच्या असलेल्या या विधेयकावर सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. 278 विरूद्ध 6 मतांनी हे विधेयक पारित करण्यात आले.


 

18 July Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »