19 August Current Affairs

19 August Current Affairs
19 August Current Affairs

जपानी नौसैनिकाला भारतीय नौदलाने वाचवले

 • अरबी समुद्रात अपघातात जखमी झालेल्या जपानी नौदलाच्या नौसैनिकाला भारतीय नौदलाने वाचवून रुग्णालयात दाखल केले. 
 • 'साझानामी' ही जपानी युद्धनौका अरबी समुद्रातून मार्गक्रमण करीत होती. 
 • त्यावेळी मुंबईच्या किनारपट्टीपासून २४४ किमी अंतरावर असताना युद्धनौकेवर अपघात झाला आणि त्यात एक नौसैनिक जखमी झाला. 
 • जपानी नौदलाकडून आपत्कालीन मदतीच्या विनंतीनंतर या नौसैनिकाला वाचविण्यासाठी नौदलाच्या पश्चिम कमांडमधील 'सी किंग' हेलिकॉप्टरने भरारी घेतली. 
 • जखमी नौसैनिकाला सांताक्रूझ नौदल हवाईतळावर आणले गेले. त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
   

त्यांचा पहिला स्वातंत्र्य दिन

 • देशाचा ७३वा स्वातंत्र्यदिन आपण नुकताच साजरा केला. मात्र, 'त्यांच्या'साठी तो पहिला होता. त्यांनी तयार केलेल्या राष्ट्रगीताचा व्हिडीओही थिएटरमध्ये दाखवण्यात आला. 
 • यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उपभोग घेतला. ही स्वातंत्र्याची गोष्ट आहे ती एलजीबीटी समुदायाची. 
 • एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्स्युअल, ट्रान्सजेन्डर) समुहासाठी अन्यायकारक असलेले कलम ३७७ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आणि या समुहाला जगण्याचा अधिकार मिळाला. 
 • स्वातंत्र्यांनंतर देशात अनेक लढे दिले गेले. लिंगाधारित विषमतेपासून सुटका करण्यासाठी एलजीबीटी समुदायाने दिलेले लढाही या देशातील अंतर्गत स्वातंत्र्यलढ्यात मोजता येईल. 
 • राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि व्यक्तिप्रतिष्ठेची हमी दिली आहे. मात्र, हे अधिकार विविध समुहांना प्रत्यक्षात सोडाच, पण कागदोपत्री आणि तत्त्वत:ही मिळत नव्हते. 
 • सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर २०१८ रोजी भारतीय दंड संहितेमधील ३७७वे कलम हे अवैध ठरवून नागरिकांमध्ये कोणत्याही मिषाने भेदाभेद न करण्याच्या आदर्श स्थितीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. 
 • यामुळे एलजीबीटी समाजाला मोठा दिलासा मिळाला. तब्बल तीन दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आणि त्यांनी यंदा पहिला 'स्वातंत्र्यदिन' साजरा केला. 
 • एलजीबीटी समुदायाला त्यांचा हक्क मिळावा व समाजात स्थान समान स्थान मिळावे या उद्देशाने 'हमसफर ट्रस्ट' ने हा लढा दिला. या यशानंतर त्यांनी या समुदायातील लोकांना घेऊन राष्ट्रगीताची एक चित्रफीत बनवली. 
 • ही चित्रफीत १५ ऑगस्ट रोजी शहरातील काही महत्त्वाच्या चित्रपटगृहांमध्ये दाखविण्यात आली. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. या पावलामुळे त्यांना समजात आपण अधिक चांगल्या प्रकारे स्वीकारले जात आहोत, अशी भावना निर्माण झाली. 
 • या राष्ट्रगीतासोबत त्यांनी I #StandWithPride, Do you? हा संदेशही समाजामध्ये पोहचवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर यंदाचा आमचा पहिला मुक्त आणि स्वातंत्र्यदिन आहे. यानिमित्ताने आम्ही राष्ट्रगीत मार्मिकपणे तुमच्यासमोर आणल्याची भावना हा लढा देणाऱ्या 'हमसफर ट्रस्ट'चे संस्थापक अशोक रावकवी यांनी यावेळी व्यक्त केली. 
 • तसेच, आमच्या या स्वातंत्र्यदिनात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभारही त्यांनी मानले. ३७७ कलम रद्द झाल्यानंतर देशात एलजीबीटी समुहात अनेक विवाह झाले. ते आता समाजाने स्वीकारण्यासही सुरुवात केली. यामुळे यंदाचा १५ ऑगस्ट आमच्यासाठी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन होता', असे मत सुशील वेदराज याने व्यक्त केले. 
 • आज एलजीबीटीबद्दल खुली चर्चा होऊ लागली आहे. आम्हीही मोकळेपणाने भेटू लागलो आहोत. आमच्यात आत्मविश्वास आणखी वाढू लागला आहे, असेही सुशील सांगतो. 
 • यामुळे यंदा आम्ही हा पहिला स्वातंत्र्यदिन मुक्तपणे साजरा करण्याचा विचार केला होता. त्यात या व्हिडीओने आमच्यासारख्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचेही तो म्हणाला. 
   
19 August Current Affairs
19 August Current Affairs

मुंबई सेंट्रल सर्वोत्कृष्ट

 • अस्वच्छ फलाट, सदोष तिकीट मशिनमुळे झालेली गर्दी, स्वच्छतागृहांत दुर्गंधी अशी ओळख असलेल्या मुंबई रेल्वेवरील स्टेशनांमध्ये मुंबई सेंट्रलने आदर्श स्थानक म्हणून वेगळा ठसा उमटवला आहे. 
 • आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणपूरकतेच्या तब्बल १२ कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल स्थानकाची दखल आतंरराष्ट्रीय संस्थेने घेत स्थानकाला iso 14001 : 2015 या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे.
 • विशेष म्हणजे, आयएसओ प्रमाणित मुंबई सेंट्रल स्टेशनाचा पॅटर्न अन्य ३८ रेल्वे स्टेशनांवर राबवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.
 • रेल्वेच्या निकषांनुसार रेल्वे स्टेशनातील एकूण जागेपैकी ३० टक्के जागेवर उद्यान उभारणे आवश्यक आहे. मुंबई सेंट्रलमध्ये जागेची अडचणी असल्याने टप्प्या टप्प्यांमध्ये छोटेखानी उद्यानांची निर्मिती करण्यात आली. 
 • स्टेशन आणि फलाटाची स्वच्छता, कचरा आणि मलजलाच्या विल्हेवाटीसाठी बायोगॅस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. विजेच्या बचतीसाठी सूर्यप्रकाश परावर्तित करणारे दिवे छतावर बसविण्यात आले. या दिव्यांचे आयुर्मान २० वर्षांपेक्षा अधिक असल्याने वीज संवर्धनामुळे कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. या पर्यावरणीय प्रकल्पांमुळे आंतरराष्ट्रीय संस्थेने दखल घेत मुंबई सेंट्रल स्टेशनाला गुणवत्तेच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 
 • मे-२०१९ ते मे-२०२२ पर्यंत पर्यावरण प्रकारातील आयएसओ प्रमाणपत्रधारक स्टेशन म्हणून ओळखले जाणारे मुंबई रेल्वेवरील हे एकमेव स्टेशन आहे. 
 • एटीव्हीएम, तिकीट खिडकी यांसह दिव्यांगासाठी रॅम्प, कार्यरत असणाऱ्या लिफ्ट यांमुळे प्रवाशांना स्थानकात आल्यानंतर दिलासा मिळतो. मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व मेल-एक्स्प्रेसमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय आयएसओ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वे मुख्यालय आणि मुंबई विभागाने विशेष प्रयत्न केले होते. 
 • पर्यावरण आणि प्रवासी सुविधा दर्जेदार असल्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. येणाऱ्या काळात या सुविधा टिकवणे अधिक गरजेचे आहे. 
 • मुंबई रेल्वेवरील अनेक रेल्वे स्टेशनांत पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट या सुविधा आहेत. मात्र देखभालीअभावी त्या सुविधाच गैरसोयीचे मुख्य कारण ठरत आहेत.
   

मनमोहन सिंग राज्यसभेवर बिनविरोध

 • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राजस्थानमधून ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. 
 • या जागेसाठी मनमोहन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच मनमोहन यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
 • राज्यसभेची राजस्थानमधील एक जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी मनमोहन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मनमोहन यांचा सन्मान राखत भाजपने त्यांच्याविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. 
 • राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी त्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे मनमोहन यांची बिनविरोध निवड होणार हे आधीपासूनच निश्चित झाले होते. आज त्याबाबतची औपचारिकता पूर्ण झाली आहे. 
 • दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनमोहन यांचे अभिनंदन केले. मनमोहन सिंग राजस्थानातून राज्यसभेवर जाणं ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे गेहलोत म्हणाले. 
 • काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही मनमोहन यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड अनुभवाचा व ज्ञानभंडाराचा निश्चितच सभागृहाला फायदा होईल, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
   
19 August Current Affairs
19 August Current Affairs

बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे निधन

 • बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे निधन
 • तीन वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते
 • बिहारमध्ये काँग्रेस वाढवण्याचे काम त्यांनी केले होते
 • बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे दीर्घ आजारानं आज नवी दिल्लीत निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. त्यांनी तीन वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते.
 • मिश्रा यांच्या निधनाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
 • जगन्नाथ मिश्रा यांच्या निधनानंतर बिहारमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. बिहारमधील दिग्गज नेते म्हणून ओळख असलेल्या मिश्रा यांनी तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले होते. त्यावेळी ते काँग्रेस पक्षात होते. 
 • बिहारमध्ये काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सध्या ते जेडीयूचे सदस्य होते. १९७५मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. १९७७पर्यंत ते या पदावर राहिले होते. 
 • त्यानंतर १९८०मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. तीन वर्षे त्यांनी हे पद भूषवले. १९८९मध्ये मिश्रा यांनी पुन्हा अवघ्या तीन महिन्यांसाठी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. 

चांद्रयान २ने पाठवला संदेश

 • २२ जुलैला अवकाशात भरारी घेऊन चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या 'चांद्रयान २'ने २५ दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर एक संदेश 'इस्रो'ला दिला आहे. चांद्रयान २ हळूहळू चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत असून ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असल्याची माहिती या संदेशातून मिळाली आहे.
 • भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज पहाटे २ वाजून २१ मिनिटांनी 'चांद्रयान-२'ने पृथ्वीची कक्षा सोडली. 'इस्रो'ने ट्रान्स लूनर इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यानाचे लिक्विड इंजिन १२०३ सेकंदासाठी फायर करण्यात आले. यानंतर गेले २२ दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चांद्रयान-२' हे पुढील सहा दिवस चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू ठेवणार आहे. जवळपास ४.१ लाख किलोमीटरचा प्रवास करून ते २० ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल. त्यानंतर २७ दिवसांनी ७ सप्टेंबरला ते चंद्रावर उतरणार आहे. 
 • पृथ्वीची कक्षा सोडल्यानंतर यासंदर्भात एक संदेश चांद्रयान २ ने दिला आहे. ' नमस्कार! मी चांद्रयान-२ आहे. मला देशाच्या नागरिकांना हे सांगायचे होते की आतापर्यंतचा प्रवास उत्तम झाला असून सात सप्टेंबरला मी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मी कुठे आहे, हे जाणून घेण्यासाठी संपर्कात राहा,' असा संदेश यानानं पाठवला आहे. 'इस्रो'ने ट्विटच्या माध्यमातून या संदेशाची माहिती दिली आहे.
   
19 August Current Affairs
19 August Current Affairs

ई सिगारेटवरबंदीबाबत अध्यादेश

 • ई-सिगारेट, ई-निकोटिन फ्लेवर्ड हुक्का यांसह इतर 'ईएनडीएस'(इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम्स) उपकरणांचे उत्पादन, वितरण, विक्री आणि आयातीवर बंदी घालण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे. 
 • याआधी अशा उत्पादनांवरील बंदीला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. ती उठविली न गेल्यास बंदीबाबतचा अध्यादेश आणण्याचा पर्याय सरकारच्या विचाराधीन आहे.
 • 'ईएनडीएस' उपकरणेस ई-सिगारेट तसेच ई-निकोटिन हुक्कासारख्या धूम्रपानाच्या उत्पादनांवर बंदी आणणे, हे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात आरोग्य मंत्रालयाच्या १०० दिवसांच्या अजेंड्यामधील प्राधान्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. 
 • त्यापैकी ७५ दिवस सरले असून उरलेल्या २५ दिवसांत 'ईएनडीएस' उत्पादनांवर बंदी आणण्याच्या दिशेने आरोग्य मंत्रालय वेगाने पावले उचलत आहे. याबाबतीत कोणकोणते मार्ग अवलंबिता येतील, याची चाचपणी सरकारने सुरू केली असून बंदीबाबत अध्यादेशही काढला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले आहे. 
 • तसा अध्यादेश काढला गेल्यास संसदेच्या पुढील अधिवेशनात त्याबाबत विधेयक आणणे गरजेचे ठरेल. ते मंजूर झाल्यास या बंदीला कायदेशीर बळ मिळेल. 'ईइनडीएस'च्या वापराबाबत सध्या जगभरात वादविवाद सुरू आहेत. काही संघटनांच्या मते या उपकरणांमुळे धूम्रपानाचे व्यसन सुटण्यास मदत होते, तसेच पारंपरिक सिगारेटपेक्षा ती कमी हानिकारक असतात. 
 • मात्र, ही उपकरणेही पारंपरिक सिगारेटएवढीच हानिकारक असतात, असा दावा करून सरकार त्यांच्यावर बंदी घालण्याच्या प्रयत्नात आहे. 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'नेही 'ईएनडीएस'वर पूर्ण बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
   

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचा कार्यकाळ तीन वर्षाने वाढवला

 • पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ तीन वर्षाने वाढवण्यात आला आहे. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनीही बाजवा यांचा कार्यकाळ वाढवण्यास मंजुरी दिली आहे. 
 • भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बाजवा यांचा कार्यकाळ वाढविण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
 • नोव्हेंबर २०१६मध्ये बाजवा यांची लष्कर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांची नियुक्ती केली होती. मात्र बाजवा यांचा कार्यकाळ संपल्याने इम्रान खान यांनी एक नोटीफिकेशन काढून त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. 
 • सीमेवरील सुरक्षेच्या निमित्ताने हा कार्यकाळ वाढविण्यात येत असल्याचंही इम्रान यांनी म्हटलं आहे. 
 • भारताने जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताच्या या निर्णयाविरोधात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मंचावर जाण्याचा प्रयत्न केला होता. 
 • मात्र त्यांना कुणाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून वारंवार युद्धाची भाषा करण्यात येत असून भारत-पाक सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं.
   
19 August Current Affairs
19 August Current Affairs

आईसलँडने उभारले वितळलेल्या हिमनगाचे स्मारक

 • आईसलँडमधील प्रशासकीय अधिकारी, मंत्री, पर्यावरण अभ्यासक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी रविवारी एका वेगळ्या शोकसभेमध्ये सहभागी झाले होते. ही सभा तब्बल सातशे वर्षे वयाच्या 'ओके जोकुल' या हिमनगाला आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. हवामान बदलात बळी गेलेल्या या हिममनगाच्या स्मारकाचे उदघाटन यावेळी करण्यात आले.
 • जोकुल याचा अर्थ हिमनग. हवामान बदलांमुळे चारशे हिमनग संकटात आले असल्याचा इशारा या वेळी शास्त्रज्ञांनी दिला. आइसलँडमधील सर्वच हिमनगबद्दल जागृती करण्यासाठी अमेरिकेतील राइस विद्यापीठातील अभ्यासकांनी हा उपक्रम राबविला. पर्यावरण अभ्यासकांनी २०१४मध्येच 'ओके-जोकुल' वितळण्यास सुरूवात झाल्याचे जाहीर केले होते.
 • शोकसभेला आईसलँडचे पंतप्रधानांसहित विविध शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. जागतिक तापमान वाढ, हवामान बदलांमुळे पृथ्वीवरील वितळणारे हिमनग हा मनुष्यासाठी धोका आहे. मात्र याचे गांभीर्य लोकांना अद्याप कळालेले नाही. 
 • जगभरात इतिहास घडविणाऱ्या लोकांची स्मारके उभारली जातात, याच धर्तीवर निसर्गाचा समतोल राखणारा घटक आज अस्तित्वाची लढाई लढतो आहे, याकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हिमनगाचे स्मारक उभारले, असे राइस युनिव्हर्सिटीचे सिमेन हाऊ यांनी सांगितले.
 • २०१४ मध्ये संशोधन सुरू असताना या हिमनगाचा केवळ बर्फ राहिला आहे, असे अभ्यासकांच्या लक्षात आले होते. त्याच वेळी त्यांनी हा हिमनग आपण गमावल्याचे जाहीर केले. 
 • हवामान बदलांमुळे आईसलँडमधून दरवर्षी ११० कोटी टन बर्फ वितळतो आहे. यामुळे ४००हून अधिक हिमनग धोक्यात आले आहेत. हरित वायूंचे उत्सर्जन वेळीच रोखले नाही तर जगातील हिमनग नष्ट होतील, असे या वेळी अभ्यासकांनी सांगितले.

'एक पत्र भविष्यासाठी':-

 • 'ओकेजोकुल' या हिमनगाच्या या स्मारकावर 'अ लेटर टू दी फ्यूचर' असा मथळा देण्यात आला आहे. 'आईसलँडने 'जोकुल' हा एक सर्वांत मोठा हिमनग गमावला आहे. पुढील दोनशे वर्षात सर्वच हिमनगांचा याच दिशेने प्रवास होणार आहे.
 • हे स्मारक उभारण्याची वेळ का आली याचे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एवढेच नव्हे; तर अशी स्मारके यापुढे उभारली जाऊ नयेत, यासाठी काय करावे लागणार आहे, हे सगळेच जाणतात,' असा संदेश देण्यात आला आहे.

वाहन उद्योगाला पॅकेज

 • देशातील वाहन उद्योगातील मंदीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली असून, पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) अर्थ आणि अवजड उद्योग मंत्रालयाकडून या संदर्भातील आकडेवारीची मागणी केली आहे. या शिवाय वाहन उद्योगासाठी स्वतंत्र पॅकेजच्या निर्मितीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये नोकऱ्या वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याविषयीही बजावले आहे. या उद्योगाला दिलासा देण्याच्या उद्देशाने वितरकांना साठ दिवसांऐवजी ९० दिवसांचे कर्ज देणे आणि काही ठरावीक कालावधीसाठी करांतून सवलत देण्यावर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. 
 • केवळ वाहन उद्योगच नव्हे तर, अन्य उद्योगांवरही मंदीचे मळभ दाटले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी बैठकांचा सपाटाच लावण्यात आला आहे. मंदीतून बाहेर पडण्यासाठी सर्वच उद्योगांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येत आहे. वाहन उत्पादकांची प्रमुख संघटना असणाऱ्या 'सियाम'ने दिलेल्या माहितीनुसार मंदीमुळे कंपन्यांनी आजपावेतो वीस हजार कर्मचाऱ्यांना कमी केले असून, १३ लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. 

कर घटविण्याची मागणी:-

 • दिल्लीतील व्यापाऱ्यांनी शनिवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन समस्या त्यांच्या कानावर घातल्या. वाहनांच्या सुट्ट्या भागांवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येतो. मात्र, हे सुटे भाग लक्झरी नसल्याने त्यांच्यावरील कर कमी करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केल्याचे वृत्त आहे. सुट्या भागांवर २८ टक्के जीएसटीऐवजी 
 • १८ किंवा १२ टक्के जीएसटी आकारण्याचीही विनंती त्यांनी ठाकूर यांना केली आहे. या शिवाय जुन्या गाड्या भंगारात घालण्यासाठी धोरण लवकरात लवकर जाहीर करण्याचीही विनंती त्यांनी केली. 

सातत्याने उत्पादनात घट:-

 • राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली 'सीटीआय' या व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या सदस्यांनी ठाकूर यांची भेट घेतली. ब्रिजेश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत वाहन उद्योगातील मंदीचा आढावा घेण्यात आला. नोकऱ्यांचे प्रमाण घटत असून,
 • मागणी घटल्याने कंपन्यांनी उत्पादन कमी करण्याचा सपाटा लावल्याचेही व्यापाऱ्यांनी मंत्रिमहोदयांच्या कानावर घातले. वाहन उद्योगातील नोकऱ्यांचे प्रमाण घटत असल्याच्या पार्श्वभूमीववर केंद्र सरकारने ऑटोमोबाइल वेल्फेअर बोर्डाची स्थापना करण्याचीही मागणी व्यापाऱ्यांनी केली. 

कंपनी सोडण्याचा 'लेलँड'चा प्रस्ताव:-

 • वाहन उद्योगातील संकटाच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या 'अशोक लेलँड'ने कर्मचाऱ्यांनी कंपनीला रामराम ठोकावा, यासाठी 'व्हीआरएस' योजनेची घोषणा केली. 'लेलँड'च्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी बोनसवरून शुक्रवारी संपाचे हत्यार उपसले होते.
 • त्यातच शनिवारी कर्मचाऱ्यांनी स्वत:हून कंपनी सोडावी, यासाठी नवी योजना जाहीर केली. या पार्श्वभूमीवर कामगार संघटनेने मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.संघटनांनी १० टक्के बोनसची मागणी केली आहे. मात्र, कंपनी पाच टक्क्यांवर अडून बसली आहे. 

तेरा लाख नोकऱ्यांवर 'संक्रांत':-

 • गेल्या आठवड्यात जुलै महिन्यातील वाहनांच्या विक्रीचे आकडे जारी करताना 'सियाम'तर्फे वाहन उद्योगातील मंदीमुळे गमावलेल्या नोकऱ्यांची परिस्थिती जाहीर केली. त्यानुसार 
 • गेल्या वर्षभरात १३ लाख कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्याचे म्हटले आहे. 'सियाम'चे महासंचालक विष्णू माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन उद्योगातील मंदीचा सर्वाधिक फटका सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना बसला आहे.
 • विविध अहवालांनुसार या कंपन्यांतील अकरा लाख कर्मचाऱ्यांना आतापर्यंत नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. अकरा लाखांपैकी १० लाख नोकऱ्या छोट्या कंपन्यांनी कमी केल्या आहेत. या शिवाय देशातील जवळपास ३०० वितरकांनी आपले दुकान बंद केल्याने २,३०,००० कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे.
   
19 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »