26 Sep Current Affairs

26 Sep Current Affairs
26 Sep Current Affairs

अंदमान बेटांवरील वस्ती धोक्यात संयुक्त राष्ट्रांच्या इंटर गव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने

 • संयुक्त राष्ट्रांच्या इंटर-गव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने (आयपीसीसी) अहवाल प्रसिद्ध
 • येत्या काही वर्षांत समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे अंदमान आणि निकोबार व्दीपसमूहासारखी अन्य काही बेटे मानवी वस्तीसाठी योग्य राहणार नाहीत, तेथील वस्ती अन्यत्र स्थलांतरित करावी लागेल, असा इशारा हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या एका पर्यावरणविषयक जागतिक अहवालामध्ये देण्यात आला आहे.
 • त्याचबरोबर महासागराचे तापमान वाढल्यामुळे भारतात चक्रीवादळासारख्या हवामानविषयक आपत्तींची तीव्रता आणि प्रमाण वाढण्याचीही भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
 • 'महासागर आणि निम्नतापावरण (पृथ्वीचा बर्फाच्छादित भाग) यावर हवामान बदलाचा परिणाम' या विशेष अहवालाने हा धोक्याचा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटर-गव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने (आयपीसीसी) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 • 'अंदमान-निकोबार, मालदिव यांसारख्या बेटांवरून मानवी वस्ती हटवण्याची गरज पडू शकते. समुद्राची पातळी वाढल्यामुळे ही बेटे वस्तीसाठी योग्य राहणार नाहीत, त्यामुळे तेथील रहिवाशांचे स्थलांतर करावे लागेल,' असे इंटर-गव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) अहवालाचे समन्वयक आणि मुख्य लेखक अंजल प्रकाश यांनी स्पष्ट केले.
 • प्रकाश हे टेरी स्कूल ऑप अॅडव्हान्स्ड स्टडीज येथील रीजनल वॉटर स्टडीज येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. 'जागतिक तापमानात दोन अंशांपेक्षा कमी वाढ झाली, तरी समुद्राची पातळी वाढेल, हिमनद्या वितळतील आणि अनेक ठिकाणच्या मानवी वस्तीला फटका बसेल. त्यातील काही बदल उलट फिरवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना तोंड देण्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे.

समुद्राच्या पातळीत तीन फूटांची वाढ:-

 • हवामान बदलाच्या वेगाला आळा घातला नाही, तर या शतकाच्या अखेरीपर्यंत समुद्राच्या पाण्याच्या पातळीत तीन फुटांची वाढ होण्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या आयपीसीसी या यंत्रणेच्या अहवालात देण्यात आला आहे.
 • यामुळे महासागरातील प्रवाहांची क्षमता कमी होईल, बर्फाची प्रमाण घटेल, एल निनो यंत्रणेत बदल होतील, तसेच चक्रीवादळे अधिक शक्तिशाली होतील, असा धोक्याचा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवरच परिणाम:-

 • हवामानातील हे बदल अत्यंत वेगाने होत आहेत. या बदलांमुळे पृथ्वीवरील केवळ महासागराने व्यापलेल्या ७१ टक्के भागावर किंवा १० टक्के हिमाच्छादित भागावरच परिणाम होईल, असे नाही. तर त्यामुळे मानवी वस्ती, वनस्पती, प्राणी, अन्न, समाज, पायाभूत सुविधा आणि जागतिक अर्थव्यवस्था या सर्वांवरच परिणाम होणार आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

खासगीपणाच्या मुद्दा गुगलचा मोठा विजय

 • इंटरनेट क्षेत्रातील बडी अमेरिकन कंपनी गुगलला खासगीपणाच्या मुद्द्यावरील याचिकेत युरोपियन युनियनच्या न्यायालयात मंगळवारी मोठा विजय मिळाला. गुगलला युरोपच्या बाहेरील देशांमध्ये आपल्या सर्च इंजिनासाठी युरोपियन युनियनचा 'राइट टु बी फरगॉटन' हा नियम लागू करण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय या न्यायालयाने दिला.
 • युरोपियन युनियनच्या कायद्यांनुसार बंधनकारक असलेली सर्च केलेली माहिती हटवण्याची प्रक्रिया गुगल डॉट कॉम या डोमेनच्या युरोपबाहेरील साइटवर लागू होऊ शकत नाही, असा युक्तिवाद गुगलच्या वतीने करण्यात आला होता. युरोपियन युनियनचे ऑनलाइन माहितीसंदर्भातील खासगीपणाविषयक नियम युरोपच्या सीमेच्या बाहेर लागू होणार की नाही, हे न्यायालयाच्या या निकालामुळे स्पष्ट होणार असल्याने या निर्णयाकडे लक्ष लागले होते.
 • वैयक्तिक खासगीपणाचा अधिकार आणि माहितीचे स्वातंत्र्य यामधील संघर्ष म्हणून या खटल्याकडे पाहिले जात होते. गुगलने आपल्या सर्व सर्च इंजिनांमध्ये 'राइट टु बी फरगॉटन' लागू करावे या मागणीसाठी फ्रान्सने २०१४पासून यासाठी कायदेशीर लढाई दिली होती.
 • युरोपियन युनियनच्या न्यायालयाने यावर आदेश देताना स्पष्ट केले की, 'राइट टु बी फरगॉटन'ची व्याप्ती आणखी वाढवण्याची गरज नाही. गुगलसारख्या सर्च इंजिन ऑपरेटरला या सुधारणा करण्याचे निर्देश देण्याची कोणतीही तरतूद युरोपियन युनियनच्या कायद्यात नाही.
 • न्यायालयाच्या या निर्णयाचे गुगलने स्वागत केले आहे. माहिती मिळवण्याचा अधिकार आणि खासगीपणाचा अधिकार यांच्यात योग्य संतुलन राखण्यासाठी गुगल प्रयत्नशील आहे, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

'राइट टु बी फरगॉटन' म्हणजे काय?:-

 • 'राइट टु बी फरगॉटन' अन्वये इंटरनेटच्या रेकॉर्डवरून आपली माहिती, व्हिडीओ, छायाचित्रे सर्च इंजिनला मिळू नयेत, यासाठी ती हटवण्याचा अधिकार युजर्सना मिळतो. युरोपियन युनियनमधील नागरिकांना हा अधिकार आहे. याला 'राइट टु इरेजर' असेही म्हणतात.
26 Sep Current Affairs
26 Sep Current Affairs

लोकप्रिय तेलगू अभिनेते वेणू माधव यांचे निधन

 • 'छत्रपती' आणि 'से' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे लोकप्रिय तेलगू विनोदी अभिनेते वेणू माधव यांचे बुधवारी निधन झाले. ते 39 वर्षांचे होते.
 • वेणू माधव यांना गेले काही दिवस यकृताच्या आजारासह अनेक आजारांनी ग्रासले होते.
 • हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात बुधवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'संप्रदायम' या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केलेल्या वेणू माधव यांनी ६०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
 • ते मिमिक्री कलाकार म्हणूनही लोकप्रिय होते.
 • तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांसह अनेक नेत्यांनी वेणू माधव यांना श्रद्धांजली वाहिली.
 • वेणू माधव यांनी आतापर्यंत १५० पेक्षा जास्त तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशच्या नालागोंडा जिल्ह्यातील कोडड गावामध्ये झाला होता.
 • त्यांनी १९९७ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. संप्रदायम आणि मास्टर या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती.
 • 'हंगामा', 'भूकैलास', 'प्रेमाभिशेकम' या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली होती.

मुकेश अंबानी आठव्यांदा सर्वाधिक श्रीमंत भारतीय

 • रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी सलग आठव्यांदा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
 • आयआयएफल वेल्थ हुरून इंडिया रिचने ही श्रीमंत व्यक्तीची यादी प्रसिद्ध केली आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ३ लाख ८० हजार ७०० कोटी रुपये इतकी आहे.
 • लंडनस्थीत असलेले एस. पी. हिंदुजा अँड फॅमिली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. १ लाख ८६ हजार ५०० कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे. विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे १ लाख १७ हजार १०० कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
 • IIFL च्या नवीन यादीनुसार, भारतीय श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ झाली आहे. या यादीत १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या वाढून ती आता ९५३ झाली आहे.
 • २०१८ मध्ये ही संख्या ८३१ इतकी होती. आर्सेसर मित्तलचे अध्यक्ष आणि सीईओ एल. एन. मित्तल हे चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १ लाख ७ हजार ३०० कोटी रुपये इतकी आहे. गौतम अदानी हे पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती ९४ हजार ५०० कोटी रुपये इतकी आहे.
 • श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आणखी १० जणांचा समावेश आहे. यामध्ये उदय कोटक (९४ हजार १०० कोटी), सायरस एस. पुनावाला (८८ हजार ८०० कोटी), सायरस पालोनजी मिस्त्री ( ७६ हजार ८०० कोटी), शापूर पालोनजी (७६ हजार ८०० कोटी) आणि दिलीप संघवी (७१ हजार ५००) दहाव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे सर्व श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत २ टक्क्यांनी यावर्षी वाढ झाली आहे.
26 Sep Current Affairs
26 Sep Current Affairs

आता पीएमसीतून सहा महिन्यात दहा हजार काढता येणार

 • सहा महिन्यातून एकदाच एक हजार रुपये काढण्याचे लादलेले आर्थिक निर्बंध पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने (पीएमसी) आज अखेर अंशत: मागे घेतले आहेत. सहा महिन्यातून एकदा एक हजाराऐवजी दहा हजार रुपये काढण्याची मुभा पीएमसी बँकेने ग्राहकांना दिली आहे. मात्र बँकेच्या या निर्णयावरही ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. आमचे पैसे बँकेतून काढण्यावर आम्हालाच का मनाई करण्यात येत आहे? दहा हजारात सहा महिने घर कसे चालवायचे? असे सवाल या ग्राहकांनी उपस्थित केले आहेत.
 • आरबीआयच्या आदेशानंतर पीएमसीने ग्राहकांची त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्याची लिमिट वाढवली आहे. नव्या नियमानुसार ग्राहक आता पीएमसी बँकेतून सहा महिन्यातून फक्त दहा हजार रुपये काढू शकणार आहेत. त्याआधी ही मर्यादा केवळ एक हजार रुपयांची होती. आरबीआयच्या बॅकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या सेक्शन ३५ अ अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे.
 • पीएमसी बँकेने सहा महिन्यातून केवळ एक हजार रुपये काढता येणार असल्याचा फतवा काढल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्यामुळे ग्राहकांनी आंदोलने-निदर्शनेही केली होती. बँकेविरोधातील ग्राहकांच्या वाढत्या रोषामुळे पीएमसीला काहीशी माघार घ्यावी लागली असून त्यांना बँक खात्यातून काढावयाच्या रकमेत वाढ करावी लागली आहे.
 • पीएमसी बँकेत आरबीआयच्या अधिकाऱ्यांचेही पैसे अडकल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकानं दिलं आहे. त्यानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स 'को-ऑप क्रेडिट सोसायटी'चे आर्थिक वर्ष २०१९च्या ताळेबंदनुसार, पीएमसी बँकेत १०५ कोटी रुपये मुदत ठेव स्वरूपात आहेत. या सोसायटीचे सदस्य आरबीआयमध्ये मोठ्या पदांवर आहेत. आरबीआय स्टाफ अँड ऑफिसर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचीही या बँकेत मुदत ठेवी आहेत. मात्र, रक्कम किती आहे, याबाबत स्पष्ट करण्यात आलं नाही.

PMC बँकेत आरबीआयच्या अधिकाऱ्यांचेही पैसे अडकले!:-

 • दरम्यान, आरबीआयच्या आदेशानुसार पीएमसी बँकेच्या बचत/चालू किंवा अन्य खात्यांमधून एक हजार रुपयांहून अधिक रक्कम काढता येणार नाही. बँकेवर निर्बंध लादल्यानंतर मुंबईसह देशभरातील बँकेच्या शाखांसमोर खातेदार आणि ठेवीदारांची गर्दी होत आहे. सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठेवीदार आणि व्यापारी अडचणीत आले आहेत.
 • दरम्यान, ठेवीदार, खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
 • दरम्यान, आरबीआयच्या आदेशानुसार बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी बँकेच्या सर्व खातेदारांना एसएमएसद्वारे या निर्बंधांविषयी माहिती दिली होती. बँकेचा व्यवस्थापकीय संचालक या नात्याने या कारवाईची जबाबादारी मी स्वीकारतो. बँकेमधील सर्व अनियमितता सहा महिन्यांत दूर होतील, असे मी आश्वासन देतो.
 • बँकेसाठी, ठेवीदारांसाठी हा अत्यंत कठीण काळ असून ठेवीदारांना होणारा त्रास सहन करण्यापलीकडचा आहे, याची मला जाणीव आहे. खातेदारांनी बँकेला सहकार्य करावे. यातून बँक नक्की बाहेर पडेल, असे थॉमस यांनी या संदेशात म्हटले होते. तसंच खातेदारांचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत.

स्नूकर भारताचे पंकज-आदित्य जगज्जेते

 • क्यू स्पोर्ट्समधील (स्नूकर-बिलियर्ड्स) भारताचा अव्वल जगज्जेता खेळाडू पंकज अडवाणीचा झंझावात सुरूच आहे.
 • बुधवारी त्याने कारकिर्दीतील २३ वे जगज्जेतेपद पटकावले. यावेळी स्पर्धा होती ती आयबीएसएफ जागतिक स्नूकर सांघिक स्पर्धा.
 • आदित्य मेहतासह पंकज यांच्या भारतीय संघाने थायलंड २ संघाचा ५-२ असा पराभव करत जगज्जेतेपदाचा मान संपादला. हे जेतेपद पंकजच्या जगज्जेतेपदांमध्ये नव्हते. अखेर बुधवारी पंकजने या सांघिक जगज्जेतेपदाचा योग जुळवून आणलाच.
 • पंकजला तोलामोलाची साथ लाभली ती आदित्य मेहताची. आदित्यचे मात्र हे पहिलेच जगज्जेतेपद ठरले आहे. प्रकृतीच्या तक्रारींमुळे आदित्यची कारकीर्दच धोक्यात आली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत पटकावलेले हे पहिले जगज्जेतेपद आदित्यच्या कारकिर्दीला नवे वळण देईल.
 • या जगज्जेतेपदासह आयबीएसएफची सगळी जगज्जेतेपदे पंकजच्या नावावर जमा झाली आहेत. गेल्याच आठवड्यात पंकजने जागतिक बिलियर्ड्स स्पर्धा जिंकली आहे.
 • फायनलला तेवढीच जबरदस्त सुरुवात करून दिली ती आदित्य मेहताने. त्याने पहिली फ्रेम ६५-३१ अशी जिंकली. मात्र पुढील फ्रेममध्ये पंकजला ९-६९ असा अनपेक्षित पराभव पत्करावाला लागला. दुहेरीची तिसरी फ्रेम भारतीयांनी जिंकली, ज्यात आदित्यच्या ५५ ब्रेकचा मोलाचा वाटा होता. चुरशीच्या फ्रेम होत असतानाही भारतीयांनी मध्यंतराला ३-२ अशी निसटती आघाडी घेतील होती.
 • ज्यामुळे पुढील दोन फ्रेम जिंकून जेतेपदावर नाव कोरण्याची औपचारिकता बाकी होती. पंकजने अनुभव पणाला लावत दुहेरीची दुसरी फ्रेम जिंकण्यात पुढाकार घेतला. मात्र जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब करुन दिले ते आदित्य मेहताने. त्याने पुढील फ्रेम जिंकून भारताच्या सांघिक जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

पंकज आता आठवडाभरासाठीच घरी येणार असून नंतर तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल ते जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपसाठी. या स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले आहे.
'कारकिर्दीतील पहिले जगज्जेतेपद लाभल्याचा आनंद खरेच खूप मोठा आहे. गेल्या काही वर्षांपासून घेत असलेली मेहनत फळली आहे'
 - आदित्य मेहता
'यंदाची म्यानमार वारी माझ्यासाठी खासमखास ठरली. तीन आठवड्यांच्या कालावधीत मी इथे दोनवेळा जगज्जेता ठरलो. याशिवाय वर्ल्ड ६-रेड स्नूकरमध्ये ब्राँझ लाभले ते वेगळेच. हे सांघिक जगज्जेतेपद मला सातत्याने गुंगारा देत होते. ते जिंकल्याने आता आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटते आहे. हे जगज्जेतेपद माझ्यासाठी खास आहे'
 - पंकज अडवाणी

 

26 Sep Current Affairs
26 Sep Current Affairs

सिंधू सायना साई गारद

 • भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे; पण बुधवारचा दिवस भारताच्या इतर बॅडमिंटनपटूंसाठी विस्मरणीयच होता.
 • जगज्जेत्या सिंधूने मॅच पॉईंट गमावत, पराभव ओढावून घेतला. तर सायना नेहवाल, साईप्रणीत यांना दुखापतीमुळे लढत अर्धवट सोडावी लागली. पुरुष एकेरीत कश्यपने तैपईच्या ल्यू चिया हन्ग याच्यावर २१-१६, २१-१६ अशी मात करत आगेकूच केली. पुढील फेरीत कश्यपचा सामना होईल तो मलेशियाच्या ल्यू डारेनेशी.
 • सिंधूचा पराभव मात्र जिव्हारी लागणारा होता. अमेरिकेच्या बीवन झँगने सिंधूची झुंज ७-२१, २४-२२, २१-१५ अशी मोडून काढली. तीन गेममध्ये पण नव्हे. अगदी सहज दोन गेममध्येच झुंज जिंकण्याची संधी सिंधूला होती.
 • मात्र मूळची चिनी असणारी आणि आता अमेरिकेची नागरिक झालेल्या झँगने संयम राखत खेळ केला अन् सिंधूविरुद्धच्या सलग तीन पराभवांनंतर पहिल्यांदा तिच्याविरुद्धची लढत जिंकली.

साई, सायनाला दुखापत:-

 • जागतिक स्पर्धेत पदकाची कमाई करणाऱ्या बी साईप्रणीतनेही पुरुष एकेरीच्या आपल्या सलामीच्या लढतीतून दुखापतीमुळे माघार घेतली. डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसनविरुद्ध ९-२१, ७-११ असा मागे पडला असताना साईची दुखापत बळावली अन् त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला.
 • साईप्रणीतप्रमाणेच भारताच्या सायना नेहवाललाही दुखापतीमुळे लढत सोडावी लागली. दक्षिण कोरियाच्या किम गा इयूनविरुद्ध सायनाने पहिला गेम १९-२१ असा गमावला, तर दुसरा गेम २१-१८ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये सायना १-८ अशी पिछाडीवर पडली होती. मात्र दुखापतीचा 'खो' बसल्याने तिने सामना सोडला.

दुहेरीत अपयशी झुंज:-

 • पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी सुमीत रेड्डी यांचे आव्हान चीनच्या हुआंग काय झियांग-ल्यू चेंग यांनी १६-२१, २१-१९, १८-२१ असे परतवून लावले. सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या जोडीने जागतिक रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या जोडीला तोडीची लढत दिली.
 • मात्र जपानच्या किगो सोंडा-ताकेशी कामुरा यांनी सात्विक-चिरागची झुंज २१-१९, १८-२१, २१-१८ अशी मोडून काढली. दुसरा गेम जिंकून लढतीत बरोबरी साधणारे सात्विक-चिराग निर्णायक गेममध्ये ११-१० असे आघाडीवर होते; पण अनुभव सरस ठरला अन् सोंडा-कामुरा यांनी आगेकूच केली.

दृष्टीक्षेप:-

 1. २४ वर्षांच्या सिंधूला जगज्जेतेपद लाभल्यानंतर सलग दोन स्पर्धांमध्ये झटपट गाशा गुंडाळावा लागला आहे. गेल्याच आठवड्यात चीन ओपन आणि आता कोरिया ओपन स्पर्धेतूनही सिंधूला झटपट गाशा गुंडाळावा लागला आहे. चायना ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत थायलंडच्या पोर्नपावी चोचूवांगने सिंधूला नमवले होते.
 2. सिंधूप्रमाणेच सायनालाही सलग दुसऱ्या बॅडमिंटन स्पर्धेतून झटपट गाशा गुंडाळावा लागला आहे. चायना ओपन आणि आता कोरिया अशा दोन्ही स्पर्धेत तिचा निभाव लागला नाही.

हाफिज सईदच्या मदतीसाठी पाकिस्तानची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे धाव

 • दहशतवादाला आम्ही पाठींबा देत नाही, दहशतवाद्यांना  आम्ही पोसत नाही असं जगाला ओरडून सांगणाऱ्या पाकिस्तानाचं खर रूप सर्वांनाच ठाऊक आहे. वेळोवेळी पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडही झाला आहे.
 • शिवाय अनेक पातळ्यांवर दहशतवाद्याच्या मुद्यावर पाकिस्तान अनेकदा तोंडघशी देखील पडलेला आहे. आता देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एकीकडे दहशतवाद्यांवर कारवाई करत असल्याचं ढोंग करणारा पाकिस्तानने त्यांच्यासाठीच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे धाव घेतली आहे.
 • मुंबई हल्ल्याचा सुत्रधार व जागतिक दहशतवादी हाफिज सईदला कुटुंबाच्या मासिक खर्चासाठी त्याच्या बँक खात्याचा वापर करु दिला जावा, अशी पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्तानची ही मान्य करत जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला त्याच्या बँक खात्याचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.
 • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून पाकिस्तानची ही मागणी मान्य केली कारण, निश्चित करण्यात आलेल्या कालवधी दरम्यान कोणतीही दहशतवादी कारवाई घडली नव्हती. १५ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, हाफिज सईद, हाजी मोहम्मद अशरफ आणि जफर इकबाल यांना त्यांच्या सामान्य खर्चासाठी बँक खात्यांचा वापर करण्यास परवानगी दिली जात आहे. १५ ऑगस्टपर्यंत या दहशतवाद्यांकडून घातपात घडवला जाण्याची शक्यता होती.
 • पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेस पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले होते की, हाफिज सईदच्या कुटुंबात चार सदस्य आहेत व त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या खाण्यापिण्यासह कपडे आदींची व्यवस्था त्यालाच करावी लागते, त्यामुळे त्याला बँक खात्याचा वापर करण्याची परवानगी दिली जावी. हाफिजचे बँक खाते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार पाकिस्तानला बंद करावे लागले होते. त्याच्या खात्यात जवळपास साडेअकरा लाख रुपये असल्याची माहिती आहे.
26 Sep Current Affairs
26 Sep Current Affairs

ICC T20 Ranking विराट कोहलीच्या क्रमवारीत घसरण

 • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय संघाला १-१ अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं. बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात आफ्रिकेने ९ गडी राखत भारतावर मात केली. या कामगिरीचा परिणाम भारतीय कर्णधाराच्या क्रमवारीवर झालेला दिसतो आहे.

आयसीसीने नुकतीच नवीन टी-२० क्रमवारी जाहीर केली:-

 • टी-२० क्रमवारीत विराट कोहली दहाव्या स्थानावरुन अकराव्या स्थानावर घसरला आहे.
 • इतर भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्माने आपलं आठवं स्थान कायम राखलं आहे. तर त्याचा सलामीवीर साथीदार चौदाव्या स्थानावरुन तेराव्या स्थानावर पोहचला आहे.
 • कसोटी संघातून बाहेर गेलेल्या लोकेश राहुलचीही क्रमवारीत घसरण झाली असून तो दहाव्या स्थानावर घसरला आहे.
 • दरम्यान भारतीय गोलंदाजांनाही फारशी आश्वासक कामगिरी करता आलेली नाहीये. गेले काही महिने टी-२० क्रिकेटपासून दूर राहिलेला जसप्रीत बुमराह आपल्या ३१ व्या स्थानावर कायम आहे.
 • तर फिरकीपटू कुलदीप यादव तेराव्या स्थानावरुन चौदाव्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.

कोणालाही न जमलेली कामगिरी स्मृती मंधानाने करुन दाखवली

 • हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघानी पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात केली.
 • ५ सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला सध्या १-० ने आघाडीवर आहेत. या विजयासोबतच भारताची सलामीवीर स्मृती मंधानाच्या नावावर अनोखा विक्रम जमा झाला आहे.
 • आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी-२० सामना हा स्मृती मंधानाचा सलग ५० वा टी-२० सामना ठरला आहे.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ५० टी-२० सामने खेळणारी स्मृती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी भारतीय पुरुष आणि महिला संघातील कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती.
 • याआधी हरमनप्रीत कौरने २००९ ते २०१४ दरम्यान भारताकडून सलग ४९ टी-२० सामने खेळले होते.
 • आता हा विक्रम स्मृतीच्या नावे जमा झाला आहे. स्मृतीने जुलै २०१५ पासून आतापर्यंतल सलग ५० टी-२० सामने खेळले आहेत.
 • मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १३० धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला विजयासाठी १३१ धावांचे आव्हान दिले होते.
 • भारताकडून हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली, तर स्मृतीने २१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून शब्निम इस्माइलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
26 Sep Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »