28-29 Oct Current Affairs

28-29 Oct Current Affairs
28-29 Oct Current Affairs

गांधीनगर हा गुजरातचा पहिला केरोसिनमुक्त जिल्हा बनला

 • गुजरात गांधीनगर जिल्हा हा राज्यातील पहिला केरोसीनमुक्त जिल्हा झाला आहे.
 • गांधीनगर जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांना एक हजार एलपीजी कनेक्शनचे वाटप करण्यात आले.
 • उज्ज्वला योजनेंतर्गत ग्रामीण महिलांना एलपीजी कनेक्शनचे वाटप करण्यात आले आहे.
 • ओएनजीसीने 75 हजाराहून अधिक लाभार्थींच्या समावेशाने 6.13 कोटी रुपये खर्च करुन ही योजना पूर्ण केली आहे.

गांधीनगर:-

 • गांधीनगर हे शहर भारताच्या गुजरात राज्याची राजधानी आहे. अहमदाबाद जवळचे हे शहर पूर्वनियोजित आराखड्याप्रमाणे वसवण्यात आलेले आहे.
 • गुजरातमधील गांधीनगर शहर हे आशियातील सर्वात हिरवेगार शहर मानले जाते.
 • साबरमती नदीच्या पश्चिम किना-यावर गांधीनगर हे शहर वसले आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ गांधीनगराचे नामकरण करण्यात आले.
 • चंडीगढ नांतर गांधीनगर हे दुसरे नियोजित शहर असून १९६६ मध्ये गुजरातची राजधानी अहमदाभोळ गांधीनगर करण्यात आली.

 

अँजेला मर्केल भारताच्या दौऱ्यावर

 • जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल गुरुवारी भारत दौऱ्यावर येत असून, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहे.
 • मर्केल यांच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि जर्मनीमध्ये वेगवेगळे २० करार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 • मर्केल यांच्यासोबत जर्मनीतील १२ मंत्रीदेखील भारत दौऱ्यावर येत आहेत. आज, गुरुवारी सायंकाळी मर्केल दिल्लीत दाखल होतील. जर्मनीतील मंत्र्यांची भारतातील संबंधित मंत्र्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांसोबतही मर्केल चर्चा करतील. 'आर्टिफिशिय इंटेलिजन्स, शाश्वत विकास, शहरी वाहतूक, शेती आणि फूटबॉल या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे,' असे जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांनी सांगितले.
 • मोदी आणि मर्केल यांच्या चर्चेदरम्यान काश्मीरचा मुद्दा उपस्थित होणार का, या प्रश्नावर लिंडनर म्हणाले, 'मोदी आणि मर्केल यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. ते कोणत्याही विषयावर बोलू शकतात. मात्र, ते कोणत्या विषयावर चर्चा करतील याबद्दल मी बोलणार नाही.'
 • जर्मनीची काश्मीरबाबतची भूमिका युरोपीय महासंघाप्रमाणेच आहे. भारत आणि पाकिस्तानने चर्चेने काश्मीर मुद्द्यावर, सीमारेषेच्या दोन्ही बाजूच्या काश्मिरी लोकांचा आदर करून शांततामय आणि राजकीय तोडगा काढावा अशी ही भूमिका आहे.
 • युरोपिय महासंघामधील खासदारांच्या काश्मीर दौऱ्याबाबत लिंडनर म्हणाले, 'या सदस्यांचा दौरा खासगी असल्याचे युरोपीय महासंघाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ते भारतात येणार असल्याची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. याबद्दल तुम्हाला जितकी माहिती आहे, तितकीच मला आहे.'
 • मर्केल शुक्रवारी राजघाट येथेही जाणार आहेत; तसेच तीस जानेवारी मार्गावरील महात्मा गांधी यांना समर्पित संग्रहालयालाही त्या भेट देणार आहेत. शुक्रवारी विमानतळावर जाण्यापूर्वी गुडगावमधील जर्मन कंपनी आणि मेट्रो स्टेशनलाही भेट देणार आहेत.
 • जर्मनीचे भारताशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. अशा प्रकारचे संबंध अत्यंत थोड्या देशांशी आहेत. दक्षिण आशियातील स्थैर्याचा भारत हा आधार आहे. प्रदूषण असो की शाश्वत विकास किंवा गरिबी. मानवासमोरच्या आव्हानांवर तोडगा काढणे भारताच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. भारताकडे धोरणात्मक वजन आणि महत्त्व आहे. - वॉल्टर जे. लिंडनर, जर्मनीचे भारतातील राजदूत

 

28-29 Oct Current Affairs
28-29 Oct Current Affairs

आंतरराष्ट्रीय सौर युती याची दुसरी सभा नवी दिल्लीत पार पडली

 • 30 आणि 31 ऑक्टोबर 2019 रोजी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची दुसरी सभा भरविण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले.
 • भारताचे अक्षय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग आणि फ्रान्सचे ब्रूने पिर्सन कार्यक्रमाचे सह-अध्यक्ष होते. सभेला 400 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झालेत. ही सभा 'ISA'ची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे आणि विविध प्रशासकीय, आर्थिक आणि कार्यक्रमांशी संबंधित मुद्द्यांविषयी मार्गदर्शन पुरविते.

आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA):-

 • पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे. गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 81 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्यास मान्यता दिली आहे.

 

२०५० सालापर्यंत मुंबई शहर अरबी समुद्रात लुप्त होणार नव्या संशोधनातील दावा

 • समुद्राच्या वाढत्या जलस्तराचा जगातील अनेक किनारी शहरांना धोका असल्याचा दावा आजवर अनेक संशोधनांतून करण्यात आला आहे. मात्र, एका नव्या संशोधनातून हा धोका तीनपट अधिक असल्याचे समोर आले आहे.
 • २०५० सालापर्यंत समुद्र किनाऱ्यावरील अनेक शहरांचा मोठा भाग समुद्रामध्ये लुप्त होणार असून यामध्ये मुंबई शहराचाही समावेश असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
 • न्यूयॉर्क टाइम्समध्ये यासंदर्भात एक वृत्त प्रसारित झाले आहे. त्यानुसार, हे संशोधन करणाऱ्या संशोधकांनी उपग्रहाच्या माहितीच्या आधारे हा दावा केला. जितका अंदाज आजवर लावला जात होता त्यापेक्षा तीनपट अधिक मोठा हा धोका आहे.
 • जगभरातील किनारी शहरांमध्ये सुमारे १५ कोटी लोक अशा जागी राहत आहेत जे या शतकाच्या मध्यावर समुद्राच्या पाण्याखाली समावून जातील, असे या संशोधन अहवालात म्हटले आहे. न्यू जर्सीतील क्लायमेट सेन्ट्रलने या विज्ञान संस्थेने हे संशोधन केले आहे.
 • सर्वाधिक जास्त धोका असलेल्या शहरांमध्ये व्हिएतनामचे नाव सर्वात वर आहे. दक्षिण व्हिएतनामची सुमारे एक चर्तुर्थांश लोकसंख्या म्हणजे २ कोटी लोकांना २०५० पर्यंत सर्वाधिक फटका बसणार आहे. इथले आर्थिक केंद्र मानले जाणारे शहर हो शी मिन्ह देखील पूर्णपणे समुद्रात बुडालेले असेल.
 • भारताची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहराला देखील याचा मोठा धोका असून २०५० सालापर्यंत हे शहर देशाच्या नकाशावरुन जवळपास पुसले जाईल, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
 • त्यामुळे समुद्राच्या वाढत्या जलस्तराचा फटका ज्या देशांना बसणार आहे त्या देशांनी आत्तापासूनच या धोक्यातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरु करायला हवेत, असेही या संशोधन अहवालात म्हटले आहे. इराण, चीन आणि पाकिस्तानला देखील याचा फटका बसणार आहे.
28-29 Oct Current Affairs
28-29 Oct Current Affairs

शाकिबचा एमसीसी च्या समितीचा राजीनामा

 • बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनने बुधवारी मेरीलीबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) जागतिक क्रिकेट समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
 • सामनानिश्चितीच्या उद्देशाने सट्टेबाजांकडून अनेकदा संपर्क साधल्याची माहिती लपवल्यामुळे ३२ वर्षीय शाकिबवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळे शाकिब भारताविरुद्धच्या आगामी दौऱ्यालाही मुकणार आहे.
 • ‘‘शाकिबने जागतिक क्रिकेट समितीशी सर्व प्रकारचे संबंध तोडले आहेत. शाकिबसारख्या खेळाडूला गमावल्यामुळे आम्हाला दु:ख झाले असून त्याने समितीसाठी दिलेले योगदान कायमस्वरूपी स्मरणात राहील. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर राखून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो,’’ असे ‘एमसीसी’ने निवेदनपत्रात नमूद केले आहे.
 • २०१७ मध्ये शाकिबने जागतिक क्रिकेट समितीचे सदस्यत्व स्वीकारले होते. आजी-माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या या समितीची वर्षभरातून दोनदा क्रिकेटचे नियम आणि अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक होते. पुढील बैठक मार्च २०२० मध्ये श्रीलंकेत आयोजित करण्यात आली आहे.

सात्त्विक चिराग जोडीची अव्वल १० स्थानांमध्ये पुन्हा मजल

 • सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या पुरुष दुहेरीतील जोडीने जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या क्रमवारीत अव्वल १० स्थानांमध्ये पुन्हा मजल मारली आहे.
 • सात्त्विक आणि चिरागने रविवारी फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचे उपविजेतेपद पटकावले. ‘बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ७५०’ दर्जाच्या स्पध्रेची अंतिम फेरी गाठणारी सात्त्विक-चिराग ही पहिली जोडी ठरली. या जोडीने दोन स्थानांनी आगेकूच करीत क्रमवारीत नववे स्थान गाठले आहे.
 • सात्त्विक-चिरागने गतवर्षी ऑगस्टमध्ये ‘बीडब्ल्यूएफ सुपर टून ५००’ दर्जाच्या थायलंड खुल्या स्पध्रेचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावताना अव्वल १० स्थानांवर मजल मारली होती. गेल्या आठवडय़ात या जोडीने विश्वविजेत्या मोहम्मद एहसान व हेंड्रा सेटिआवान जोडीला नामोहरम केले होते.
 • महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल अनुक्रमे सहाव्या आणि नवव्या स्थानावर कायम आहेत. फ्रेंच खुल्या स्पध्रेत या दोघींना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली होती.
 • सध्या सारलॉरलक्स खुल्या स्पध्रेत खेळणारा उदयोन्मुख खेळाडू लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या क्रमवारीत एका स्थानाने आगेकूच करीत ५१वे स्थान गाठले आहे, तर शुभंकर डे याने चार स्थानांनी सुधारणा करीत ३८वे स्थान प्राप्त केले आहे. पारुपल्ली कश्यप आणि समीर वर्मा या दोघांनी एकेक स्थानांनी सुधारणा करीत अनुक्रमे २५वे आणि १७वे स्थान मिळवले आहे.
 • महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांची दोन स्थानांनी घसरण झाली असून, त्या २६व्या स्थानावर आहेत.
28-29 Oct Current Affairs
28-29 Oct Current Affairs

मराठमोळे पडसलगीकर नवे राष्ट्रीय उप सुरक्षा सल्लागार

 • पडसलगीकर हे १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
 • राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पडसलगीकर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सहाय्य करतील.
 • अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू मानले. त्यांच्या मदतीसाठी सरकारने राष्ट्रीय उप-सल्लागारांची नियुक्ती केली आहे. अजित डोवाल हे आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे जेम्स बॉण्ड म्हणून परिचयाचे आहेत.
 • अजित डोवाल यांना आता राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची साथ लाभणार आहे. त्यांची देशाचे उप-सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच ते अंतर्गत सुरक्षा विभागाची जबाबदारी पार पाडतील.
 • पडसलगीकर यांनी यापूर्वी 'आयबी'मध्ये संचालकपदावरही आपली सेवा बजावली आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पडसलगीर हे परिचयाचे आहेत. दोन दशकांहून अधिक काळ पडसलगीकर यांनी गुप्तहेर खात्यात कर्तव्य बजावताना अनेक किचकट मोहिमा हाताळल्या.
 • दहशतवाद, दहशतवादी संघटनांबाबत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी उपाययोजना करताना त्यांच्यासारख्या अनुभवी, कर्तव्य कठोर, प्रामाणिक अधिकाऱ्याचा डोभाल यांना निश्चित फायदा होऊ शकेल. पडसलगीकर हे १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
 • मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण तपासात त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी मुंबई हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील धागेदोरेही शोधून काढले होते.
 • याव्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. पडसलगीकर यांनी अरूण गवळी टोळीचंही कंबरडं मोडलं होते. याव्यतिरिक्त पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असताना त्यांनी कामाठीपुऱ्यातील कुंटनखान्यातून त्यांनी ४५० अल्पवयीन मुलींची सुटका करून त्यांचं पुनर्वसनाचही मोठं काम केलं होतं.
 • तर दुसरीकडे नागपुरमधील मटका आणि बेकायदेशीर दारूविक्रीविरोधात त्यांनी मोठी कारवाई केली होती. तर उस्मानाबादमध्ये सेवा बजावत असताना त्यांनी निजामाविरोधातील कारवाईत शहीद झालेल्या पोलिसांच्या पत्नींची माहिती मिळवून त्यांना पेन्शन सुरू करून दिलं होतं. त्यांच्या अनेक कामांची दखल घेत त्यांची राष्ट्रीय उप-सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत पडसलगीकर:-

 • पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
 • २०१६ मध्ये पडसलगीकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी
 • त्यापूर्वी सुमारे १० वर्षे आयबीमध्ये त्यांनी सेवा बजावली
 • नागपूर, कराड आणि नाशिकमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली
 • उस्मानाबाद, साताऱ्याचे अधीक्षकपदाची जबाबदारी
 • मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
 • पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान
 • प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून ख्याती

 

फेडररचे १० वे विजेतेपद

बॅसेल खुली टेनिस स्पर्धा एएफपी, बॅसेल

 • स्वित्र्झलडचा मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडररने रविवारी स्विस बॅसेल खुल्या टेनिस स्पर्धेचे १०व्यांदा विजेतेपद मिळवले, तर एकूण कारकीर्दीतील त्याचे १०३वे विजेतेपद ठरले.
 • ३८ वर्षीय अग्रमानांकित फेडररने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनॉरला ६-२, ६-२ अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली.
 • विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत फेडररने एकही सेट गमावला नाही.
 • २००६मध्ये वयाच्या २५व्या वर्षी फेडररने पहिल्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
 • तर गेल्या पाच वर्षांत (२०१४ पासून) चौथ्यांदा त्याने जेतेपदाचा चषक उंचावला.
 • पुरुषांमध्ये सर्वाधिक विजेतेपदे मिळवणाऱ्यांच्या यादीत फेडरर दुसऱ्या स्थानी असून जिमी कॉनर्स १०९ विजेतेपदांसह अग्रस्थानी आहे.

तंदुरुस्ती राखण्यासाठी पॅरिस मास्टर्समधून माघार:-

 • बॅसेल स्पर्धेचे विजेतेपद मिळवून फेडररने त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली असली तरी मंगळवारपासून सुरू झालेल्या पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेतून या खेळाडूने माघार घेतली आहे.
 • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या फेडररने पुढील वर्षांतील महत्त्वाच्या स्पर्धासाठी स्वत:ला अधिकाधिक तंदुरुस्त राखण्यावर भर दिला आहे.
 • त्याशिवाय यापूर्वीच ऑस्ट्रेलियन आणि ऑलिम्पिकसारख्या महत्त्वांच्या स्पर्धामध्ये आपण खेळणार असल्याचे फेडररने सांगितल्याने तो सावधपणेच स्पर्धाची निवड करतो आहे.
28-29 Oct Current Affairs
28-29 Oct Current Affairs

एक किलो प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात गरिबांना मोफत जेवण ओदिशा सरकारची योजना

 • प्लास्टिकच्या धोक्यांबाबत जनजागृती करण्याकरिता ओदिशा सरकारने एक स्तुत्य उपक्रम राबवला असून त्यात एक किलो प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात गरीब व्यक्तींना मोफत जेवण देण्याचे ठरवले आहे.
 • कोरापुट जिल्ह्य़ात कोटापड अधिसूचित मंडळाच्या अखत्यारीत ही योजना राबवण्यात आली असून त्यात जी व्यक्ती प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, कप यांचा एक किलो कचरा आणून देईल त्यांना मोफत जेवण देण्यात येत आहे.
 • राज्य सरकारच्या आधार योजनेत हा उपक्रम समाविष्ट केला असून प्लास्टिक कचऱ्याने गटारी तुंबतात, पक्षी व प्राणी मरतात.
 • माणसाला अनेक आजार होतात. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी आमची ही योजना आहे असे कोटापडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक सामंतराय यांनी सांगितले.
 • ओदिशा सरकारच्या आहार योजनेत शहरी भागातील गरिबांना भात व डाळमा ( भाजी- वरण) असा आहार पाच रुपयात देण्यात येतो. आता जे लोक १ किलो प्लास्टिक कचरा आणून देतील त्यांना मोफत जेवण दिले जाणार आहे.
 • प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात मोफत जेवण देण्याच्या योजनेचे फलक लावण्यात आले असून आधार केंद्रावर त्यासाठी खास काउंटर सुरू करण्यात आले आहेत.
 • सोमवारी या योजनेत दहा किलो प्लास्टिक कचरा गोळा झाला आहे त्यामुळे आधार योजनेत दहा जणांना मोफत जेवण देण्यात आले.
 • पुढील काळात या योजनेमुळे शहर पॉलिथिन कचरा मुक्त होईल असा विश्वास सामंतराय यांनी व्यक्त केला आहे. एनएसी अधिकाऱ्यांनी नेहमीच प्लास्टिक विरोधी मोहिमा राबवल्या आहेत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »