3 Oct Current Affairs

3 Oct Current Affairs
3 Oct Current Affairs

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे मुंबईत निधन

 • 'शोले' या सुप्रसिद्ध चित्रपटातील 'कालिया'च्या भूमिकेद्वारे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने दक्षिण मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते.
 • विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांचे अभिनय कौशल्य आणि संवादफेक अप्रतिम असल्याने त्या दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या. शोले चित्रपटातील त्यांची कालियाची भूमिका विशेष गाजली. शोलेतील गब्बर जेव्हा तेरा क्या होगा, कालिया?, असे विचारतो तेव्हा कालिया घाबरत उत्तर देतो, ' स..स.. सरदार, मैने तो आपका नमक खाया हैं, सरदार' हा संवाद अंत्यंत गाजला. चार दशकांचा काळ उलटून गेला असला तरी आजही या संवादाचे स्मरण केले जाते.

विनोदाचे अचूक टायमिंग साधणारा कलाकार:-

 • त्यांती अंदाज अपना अपना या चित्रपटातील रॉबर्टची भूमिकाही गाजली. 'गलती से मिश्टेक हो गया' हा अंदाज अपना अपना या चित्रपटातील त्यांचा संवादही विशेष गाजला. तसेच अशी ही बनवा बनवी या मराठी चित्रपटात अतिशय छोटी भूमिका असूनही ती प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. खोटे हे विनोदाचे अचूक टायमिंग साधणारे कलाकार म्हणून प्रसिद्ध होते.
 • विजू खोटे यांनी नायकाच्या भूमिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली असली, तरी देखील पुढे त्यांनी छोट्या परंतु स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या.

विजू खोटे:-

 • जन्म    - १७ डिसेंबर १९४१ मुंबई
 • मृत्यू    - ३० सप्टेंबर २०१९ मुंबई
 • कार्यक्षेत्र - अभिनय
 • भाषा - मराठी
 • वडील    - नंदू खोटे
 • आई - विजया खोटे-मेहता

विजू खोटे हे हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते होते. त्यांनी ४४०पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली होती.
विजू खोटे यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट:-

 1. अदाबदली
 2. अशी ही बनवाबनवी
 3. आयत्या घरात घरोबा
 4. एक उनाड दिवस
 5. उत्तरायण
 6. माझा नवरा तुझी बायको
 7. या मालक

विजू खोटे यांचे चित्रपटांतील प्रसिद्ध उद्गार:-
"सरदार मैने आपका नमक खाया है ('शोले' चित्रपटातला काल्या डाकू.).
" गलतीसे मिस्टेक हो गया" ('अंदाज अपना अपना' मधला राॅबर्ट)

 

इंडियन ऑइलने तयार केला प्लास्टिकचा रस्ता

 • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयओसी) डांबर, काँक्रीटमध्ये १.६ कोटी टन सिंगल यूज प्लास्टिक कचऱ्याचा वापर करत रस्ता तयार केला आहे. हा प्लास्टिकचा रस्ता ८५० मीटर इतका लांब आहे. इंडियन ऑइलने सिंगल यूज प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार केलेल्या मालाला कुठून आणि किती मागणी येऊ शकते याची चाचपणी करायलाही सुरुवात केली आहे. प्लास्टिक पासून तयार केलेला हा रस्ता हरयाणा राज्यातील फरीदाबादमध्ये आयओसीच्या रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फॅसिलिटीच्या बाहेर तयार करण्यात आला आहे.
 • प्लास्टिकचा वापर असलेला हा रस्त्यात किती क्षमता आहे, तसेच तो किती टिकाऊ आहे याची चाचपणीही कंपनीला करावी लागणार आहे. प्रीमियम दर्जाच्या डांबराच्या तुलनेत ३ टक्के प्लास्टिक कचऱ्याचा वापर केल्याने एक किलोमीटरचा रस्ता बनवताना सुमारे २ लाख रुपयांची बचत होणार आहे, असे आयओसीचे संचालक (आर अॅण्ड डी) एस. एस. व्ही. रामकुमार यांनी म्हटले आहे. जर आम्ही इम्पोर्टेड व्हर्जिन पॉलीमरचा वापर टाळत देशातील प्लास्टिक कचऱ्याचा वापर करायला सुरू केले, तर रस्ते निर्मितीसाठी लागणार पैसा बराचसा कमी होईल, असेही रामकुमार यांनी सांगितले आहे.
 • आयओसीने हा रस्ता कॅरी बॅग किंवा पॅकेजिंग फिल्म कचऱ्याचा वापर करून तयार केला आहे. यात काहीमध्ये १ टक्का, तर काहीमध्ये २ टक्के आणि ३ टक्के प्लास्टिक कचऱ्याचा वापर केला आहे. प्लास्टिक कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे दोन वर्षांसाठी मेंटेनन्स केले जाणार आहे. कंपनीच्या प्रयोगशाळेत हा प्रयोग लोड कपॅसिटी आणि डेप्रिसिएशन रेझिस्टन्सच्या चाचणीत यशस्वी झाला होता. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टीट्यूटनुसार (सीआरआरआय), डांबरीत ०.८ टक्के प्लास्टिकचा कचरा वापरण्याची मुभा आहे. मात्र या मर्यादेत आणखी ३ टक्क्यांची वाढ करता येईल का, याबाबत आयओसीची आर अॅण्ड डी टीम सीआरआरआयच्या सोबत मिळून प्रयोग करत आहे.
 • जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर या संदर्भात एक नवे धोरण तयार करावे अशी विनंती आम्ही एमओआरटीएचकडे ( मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अॅण्ड हायवेज) करणार आहोत, अशी माहिती रामकुमार यांनी दिली. हे धोरण तयार झाले, तर आम्ही यात प्लास्टिकच्या कचऱ्याचा अधिक प्रमाणात वापर करू शकू असे रामकुमार यांचे म्हणणे आहे. जर का असे झाले, तर स्वीडन आणि डेन्मार्क या देशांप्रमाणे भारतातही रिसायकल न होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा निर्यात करणारा देश बनेल असेही रामकुमार यांचे म्हणणे आहे.
3 Oct Current Affairs
3 Oct Current Affairs

भारताचे स्वच्छतेकडे महत्त्वपूर्ण पाऊल

 • भारताने स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, देश open defecation free /हागणदरीमुक्त झाला असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित 'स्वच्छ भारत दिवस' कार्यक्रमात हा दावा करतानाच, तब्बल ६० कोटींहून अधिक नागरिकांना शौचालये बांधून दिल्याबद्दल जग भारताची प्रशंसा करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 • मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महात्त्वाकांक्षी 'स्वच्छ भारत अभियाना'ची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या स्वच्छता संदेशाचा हवाला देत २०१९पर्यंत देश हागणदरीमुक्त होईल, असे म्हटले होते 'आज ग्रामीण भारत आणि ग्रामस्थांनी स्वत:ला हागणदरीमुक्त केले आहे. ६० महिन्यांमध्ये ६० कोटी नागरिकांना शौचालय उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि ११ कोटींहून अधिक शौचालये बांधल्यामुळे संपूर्ण जग सरकारची प्रशंसा करत आहे', असे ते म्हणाले.

'प्लास्टिकचा वापर थांबवू':-

 • स्वच्छता, पर्यावरणाचे संरक्षण आणि प्राणी गांधीजींना खूपच प्रिय होते. प्लास्टिक या सर्वांसाठी मोठा धोका आहे. त्यामुळे २०२२पर्यंत आपल्याला एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवायला हवा, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागले

 • अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये चालू आठवड्याच्या शेवटी अण्वस्त्रांबाबत चर्चा होणार असल्याचे जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, बुधवारी उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
 • पाणबुडीद्वारे हे क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दक्षिण कोरियाने याबाबतची माहिती दिली आहे. कोणत्याही देशाशी चर्चा करण्याआधी उत्तर कोरिया शक्तिप्रदर्शन करून समोरच्या देशावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अण्वस्त्रांबाबत होणाऱ्या चर्चेआधी अमेरिकेवर दबाव निर्माण करण्यासाठी उत्तर कोरियाने ही चाचणी घेतली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 • दक्षिण कोरियाच्या 'जॉइंट चीफ ऑफ स्टाफ'ने सांगितले की, बुधवारी सकाळी एक क्षेपणास्त्र आढळून आले असून, ते सुमारे ४५० किलोमीटर अंतरावर डागण्यात आले होते. ते मिसाइल पुक्कुकोंग बनावटीचे वाटते आहे.
 • 'जॉइंट चीफ ऑफ स्टाफ' म्हणाले, 'उत्तर कोरियाच्या अशा हालचालींमुळे कोरिया द्विपकल्पातील तणाव वाढत आहे. आम्ही हा तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात आहोत. उत्तर कोरियाने तत्काळ हे सर्व थांबवावे, अशी आमची आग्रही मागणी आहे.'
 • कोरिया द्विपकल्पातील घडामोडींवर आपले लक्ष असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. जपान उत्तर देणार? उत्तर कोरियाकडून डागण्यात आलेले एक क्षेपणास्त्र जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या हद्दीतील समुद्रात पडले आहे.
 • जपानचे पंतप्रधान शिंझो आबे म्हणाले, की क्षेपणास्त्रे डागणे हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन करणारे असून, आम्ही याचा तीव्र निषेध करतो. लवकरच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेऊन याला उत्तर कसे द्यायचे, हे ठरवले जाईल.

उत्तर कोरिया:-

 • उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे.
 • उत्तर कोरियाच्या दक्षिणेला दक्षिण कोरिया, तर उत्तरेला चीन हा देश आहे. याच्या पूर्वेला कोरियाचे आखात व पश्चिमेला जपानचा समुद्र आहे.

 

 

3 Oct Current Affairs
3 Oct Current Affairs

अॅमेझॉन फ्लिपकार्टला न्यायालयाची नोटीस

 • पारंपरिक व्यापारी व ई-कॉमर्स कंपन्यांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ई-कॉमर्स कंपन्यांमुळे आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप पारंपरिक विक्रेत्यांकडून होत असतानाच हा लढा आता न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (केट) या संघटनेतर्फे अॅमेझॉन व फ्लिपकार्टविरोधात न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आल्या असून राजस्थान उच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत या दोन कंपन्यांविरोधात नोटीस जारी केली आहे.
 • या कंपन्यांनी केंद्र सरकारच्या एफडीआय (विदेशी थेट गुंतवणूक) धोरणाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर पीठाने ही नोटीस बजावली असून या प्रकरणी केंद्र सरकारलाही नोटीस बजावण्यात आली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी १५ ऑक्टोबरला होईल. या सुनावणीदरम्यान केंद्र सरकार व ई-कॉमर्स कंपन्यांना आपापली भूमिका मांडावी लागेल.

आरोप काय?:-

 • या कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाट सवलत दिली जाते. या कंपन्यांचे स्वरूप आता इन्व्हेंटरी आधारित झाले असून या सर्व गोष्टी एफडीआयच्या धोरणाशी विसंगत असल्याचा दावा केटने केला आहे.
 • एफडीआयच्या नियमानुसार कोणत्याही वस्तूची किंमत पूर्वनिर्धारित करता येत नाही. मात्र अॅमेझॉन व फ्लिपकार्टकडून विशेष सेलदरम्यान १० ते ९० टक्के सवलत दिली जाते. ही सवलत एफडीआयच्या धोरणाचे उल्लंघनच आहे, असे केटचे महानगर अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले.

पुढील वर्षी इस्रो करणार अंतराळात एक नवा प्रयोग

 • इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेनंतर आता इस्रोने पुन्हा एकदा अंतराळ संशोधनात आपली छाप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा एक कठिण मोहीम इस्रो हाती घेणार आहे. काही महिन्यांपूर्वीच इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी अंतराळात भारत आपले स्पेश स्टेशन उभारणार असल्याचं म्हटलं होतं.
 • स्पेश स्टेशन उभारण्यापूर्वी अवकाशयान किंवा उपग्रहांना एकत्रित जोडण्याचं महत्त्वाचं काम इस्रोला पूर्ण करावं लागणार आहे. ही मोहीम अत्यंत गुंतागुंतीची आणि कठिण असल्याचं म्हटलं जात आहे.
 • “इमारत उभारण्यासाठी ज्या प्रकारणे विटांची रचना करावी लागते, ताशाच प्रकारचं हे अभियान आहे. ‘स्पेडेक्स’ म्हणजेच ‘स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ असं या मोहिमेचं नाव आहे,” अशी माहिती डॉ. सिवन यांनी दिली.
 • “सध्या सरकारकडून या मोहिमेसाठी 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या मोहिमेसाठी पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून दोन उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. अवकाशात सोडल्यानंतर या उपग्रहांची गती कमी करून त्यांना एकमेकांशी जोडलं जाणार आहे. जर त्यांची गती योग्यरित्या कमी झाली नाही तर ते उपग्रह एकमेकांवर आदळूदेखील शकतात आणि हाच या मोहिमेतील सर्वात कठिण भाग असल्याचंही” ते म्हणाले.
 • “ही मोहिम सुरू करण्याचा अर्थ इस्रोच्या स्पेस स्टेशन मोहिमेची सुरूवात झाली असं होत नाही. गगनयान मोहिमेनंतरच डिसेंबर 2021 मध्ये स्पेस स्टेशन मोहिम हाती घेतली जाणार आहे. अंतराळात मानवाला पाठवणं आणि डॉकिंगमध्ये यश मिळाल्यानंतरच स्पेश स्टेशन मिशनची सुरूवात करणार असल्याचे” सिवन यांनी स्पष्ट केलं.
 • डॉकिंगमुळे शास्त्रज्ञांना आपल्या स्पेस स्टेशनमधील इंधन, अंतराळवीर आणि अन्य आवश्यक वस्तू पोहोचवू शकतो किंवा नाही यांची माहिती मिळेल. यापूर्वी स्पेडेक्स मोहिमेला 2025 पर्यंत अंतराळात सोडण्याचा मानस होता. यामध्ये रोबोटिक आर्म एक्सपेरिमेंटदेखील सामिल करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाच देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी मिळून तयार केलं आहे. अमेरिका, रशिया, जपान, युरोप आणि कॅनडाला ते उभारण्यासाठी 13 वर्षांचा कालावधी लागला होता. यासाठीदेखील डॉकिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता, असंही सिवन म्हणाले.
3 Oct Current Affairs
3 Oct Current Affairs

राजस्थानातील तीन रेल्वे स्थानके स्वच्छतेबाबत देशात सर्वोत्कृष्ट

मुंबईतील ३ उपनगरीय स्थानकेही अव्वल

 • रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी जाहीर केलेल्या रेल्वेच्या स्वच्छता सर्वेक्षणात राजस्थानमधील तीन रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान मिळवला. उपनगरीय स्थानकांमध्ये हा मान मिळवणाऱ्यांत मुंबईतील ३ स्थानके आहेत.
 • रेल्वेच्या देशभरातील ७२० स्थानकांपैकी जयपूर, जोधपूर व दुर्गापुरा या तीन स्थानकांनी यादीत पहिल्या तीन क्रमांकांवरील स्थान पटकावले. १०९ उपनगरीय स्थानकांपैकी मुंबईतील अंधेरी, विरार व नायगाव ही तीन स्थानके पहिल्या तीन क्रमांकांची ठरली.
 • रेल्वेचा विभागनिहाय विचार करता, उत्तर पश्चिम रेल्वेने पहिला क्रमांक मिळवला. त्याखालोखाल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वे यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक आहे.
 • २०१६ सालापासून रेल्वे देशभरातील ४०७ महत्त्वाच्या स्थानकांच्या स्वच्छतेबाबत तटस्थ यंत्रणेकडून अंकेक्षण करून त्यांची क्रमवारी जाहीर करत असते. या वर्षी याचा ७२० स्थानकांपर्यंत विस्तार करण्यात येऊन पहिल्यांदाच उपनगरीय स्थानकांचाही समावेश करण्यात आला.

अरुणाचलमधील तीन जिल्हे पुन्हा अशांत घोषित

 • अरुणाचल प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर तेथील ३ जिल्हे केंद्र शासनाने सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्यान्वये (आफस्पा) सहा महिन्यांसाठी ‘अशांत’ घोषित केले आहेत.
 • याशिवाय आणखी तीन जिल्ह्य़ांमधील चार पोलीस ठाण्यांच्याही हद्दीत या कायद्याचा अंमल लागू करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. सशस्त्र दले विशेषाधिकार कायद्याच्या कलम ३ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारने तिराप, चांगलांग व लोंगडिंग हे जिल्हे आणि आसामला लागून असलेल्या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील भाग १ एप्रिलला ‘अशांत क्षेत्र’ म्हणून जाहीर केला होता.
 • या सर्व भागांतील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आल्यानंतर, हा संपूर्ण भाग १ ऑक्टोबर २०१९ पासून सहा महिन्यांपर्यंत, म्हणजे ३१ मार्च २०२० पर्यंत ‘अशांत क्षेत्र’ जाहीर करण्यात येत आहे, असे गृहमंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.
 • नागरी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी जेथे सशस्त्र दलांनी काम करण्याची आवश्यकता असते, अशा भागांमध्ये ‘आफस्पा’ लागू केला जातो. मात्र, तो वैध ठरण्यासाठी संबंधित भाग वरील कायद्यान्वये केंद्र किंवा राज्य शासनातर्फे अशांत जाहीर केला जाणे आवश्यक असते.
 • अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये एनएससीएन, उल्फा व एनडीएफबी यांसारख्या बंदी घातलेल्या संघटनांचे अस्तित्व आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
3 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »