4 August 2019 Current Affairs

4 August 2019 Current Affairs
4 August 2019 Current Affairs

देशातील 2 हजार रेल्वेस्थानकावर मोफत वायफाय सुविधा

रेल्वेने आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना आणखी एक चांगली सुविधा दिली आहे. देशतील सुमारे 2 हजार रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सध्या मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
    
राजस्थानातील अजमेर विभागातील राणा प्रतापनगर रेल्वे स्थानक हे मोफत इंटरनेट सेवा असलेले देशातील दोन हजारावे स्थानक ठरले, असे रेलटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित चावला यांनी सांगितले. आमचा चमू दिवसरात्र काम करत असून, दररोज या कामाच्या अंमलबजावणीची गती वाढत आहे. शुक्रवारी आम्ही 74 रेल्वे स्थानक वायफाययुक्त केले आणि अजून काही स्थानकांवर मोफत वायफायची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे, असे चावला यांनी सांगितले. रेल्वेचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या रेलटेल या कंपनीने डिजिटलयुक्त फलाट तयार करण्यासाठी स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याची सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात 1600 स्थानकांवर ही सोय पुरवण्यात आली.
 

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन

चित्रपट रंगभूमी व मालिकांमधील हरहुन्नरी अभिनेता श्रीराम कोल्हटकर यांचे आज पहाटे निधन झाले. डोंबिवलीत राहून नाट्यसृष्टीत कार्य करणाऱ्या त्यांच्या वडिलांचे म्हणजे भालचंद्र कोल्हटकर यांचे काही महिन्यांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. ‘आपला माणूस’, ‘एक अलबेला’ आणि ‘करले तू भी मोहब्बत’ अशा विविध चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांचा अभिनय चतुरस्त्र होता. डोंबिवलीच्या टिळक नगर हायस्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली होती. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांसोबत हिंदी सिनेसृष्टीतील त्यांचे सहकालाकारही शोकाकूल झाले आहेत.

अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सिनसृष्टीत शोककळा पसरली आहे. श्रीराम कोल्हटकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात अभिनय केला. ‘अ डॉट कॉम मॉम’, ‘आपला माणूस’, ‘करले तू भी मोहब्बत’, ‘एक अलबेला’, ‘उंच भरारी’ आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची वाहवा मिळाली. तसेच त्यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली. त्यांच्या वाट्याला काही निवडक भूमिका आल्या, पण त्यातही त्यांनी आपली विशिष्ट शैली दाखवून दिली.
 

4 August 2019 Current Affairs
4 August 2019 Current Affairs

वयोवृद्ध सेवानिवृत्तांना वाढीव पेन्शन

राज्य सरकारचा निर्णय; ८० वयापासून लागू
राज्य सरकारने ८० हून अधिक वय असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. हे कर्मचारी ज्या महिन्यात वयाची ८०, ८५, ९०, ९५ आणि १०० वर्षे पूर्ण करतील, त्या महिन्याच्या एक तारखेपासून वाढीव दराने निवृत्तिवेतन किंवा कुटुंब निवृत्तिवेतन लागू होईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

वित्त विभागाने या अतिरिक्त निवृत्तिवेतनाबाबत कशा पद्धतीने कार्यवाही करावयाची आहे, त्याबाबतचा शासन निर्णय ३० जुलै २०१९ रोजी जारी केला आहे.

शासकीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेले सर्व निवृत्त कर्मचारी, शाळांचे निवृत्त शिक्षक-प्राचार्य व अन्य कर्मचारी महाविद्यालयांमधील प्राध्यापक व अन्य कर्मचारी यांच्यासह सर्वाना या निर्णयानुसार अतिरिक्त निवृत्तिवेतनाचा लाभ दिला जाईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

होणार काय?

ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वय ८० पूर्ण झाले आहे, त्यांच्या मूळ निवृत्तिवेतनात १० टक्के, ८५ ते ९० दरम्यान वय असल्यास मूळ वेतनाच्या १५ टक्के, ९० ते ९५ वय असल्यास २० टक्के, ९५ ते १०० वय असल्यास २५ टक्के आणि १०० हून अधिक वय असल्यास ५० टक्के इतकी अतिरिक्त वाढ देऊन निवृत्तिवेतन दिले जाईल.
 

मालदीवच्या माजी उपाध्यक्षांना राजाश्रय नाकारला

मालदीवचे माजी उपाध्यक्ष अहमद अधीब अब्दुल गफूर यांनी भारतात राजाश्रय मिळावा म्हणून मागणीकेली होती पण त्यांची ती मागणी भारताने फेटाळली असून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे. गफूर हे एका मालवाहू जहाजातून तामिळनाडुच्या किनाऱ्यावर गुरूवारी आले होते. त्यांच्या समवेत त्यांचे नऊ अन्य सहकारीही होते.

पण त्यांच्याकडे पासपोर्ट नसल्याने त्यांना भारतात प्रवेश करू देण्यात मनाई करण्यात आली. त्यांना जहाजातून उतरू देण्यात आली नाही. विविध केंद्रीय संस्थांनी त्यांची जहाजावरच चौकशी केली. त्यावेळी आपल्याला भारतात राजाश्रय मिळावा म्हणून त्यांनी विनंती केली होती. पण भारत सरकारने त्यांची ही विनंती अमान्य करून त्यांना मायदेशी परत पाठवून दिले. आपल्या जीविताला आपल्या देशात धोका असल्याने आपण तेथून निसटून आलो आहोत असे त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सांगितले होते.

4 August 2019 Current Affairs
4 August 2019 Current Affairs

उत्तेजकांच्या नियमांचा भंग करणाऱ्या अव्वल १० राष्ट्रांमध्ये भारत

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट २०००मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळली होती. सर्दी झाली म्हणून घेतलेल्या औषधात उत्तेजक पदार्थ आढळले. त्यामुळे तिची कारकीर्द डागाळली आणि बंदीच्या शिक्षेलाही सामोरे जावे लागले. आता मुंबईचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि नाशिकची धावपटू संजीवनी जाधव उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्याच्या दोन ताज्या घटना घडल्या आहेत.

खोकल्यासाठी घेतलेल्या औषधाद्वारे पृथ्वीने उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे, तर आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यामुळे संजीवनी उत्तेजकांच्या कचाटय़ात सापडली आहे. या तिन्ही घटनांचा समान धागा म्हणजे अजाणतेपणा. १९ वर्षांमध्ये देशातील आणि महाराष्ट्रातील उत्तेजकविरोधी चळवळ किती मर्यादित राहिली आहे, हेच या तीन घटनांमधून स्पष्ट होत आहे. पृथ्वीवरील कारवाईबाबत तांत्रिक अडचणी मोठय़ा प्रमाणात आहेत.

खेळाडू उत्तेजकांचे सेवन का करतात? याचे पहिले उत्तर अजाणतेपणा आहे. उत्तेजक पदार्थाचा समावेश असलेली सर्दी-खोकल्याची असंख्य औषधे उपलब्ध आहेत. परंतु त्यांचे सेवन करताना हेळसांडपणा दाखवला जातो. दुसरे म्हणजे कामगिरी उंचावण्याचे प्रचंड दडपण. यात स्वत: अन्य खेळाडूंपेक्षा सरस ठरण्याची अभिलाषा आणि अपेक्षा अंतर्भूत असते. त्यामुळे प्रशिक्षक, पालक खेळाडूला या वाईट मार्गाकडे प्रेरित करतात. उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेला कुस्तीपटू नरसिंग यादव २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरला होता. त्याला आहारातून उत्तेजक पदार्थ देण्याचा कट रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु या प्रकरणातील सत्याचा अद्याप उलगडा झालेला नाही. म्हणजेच कुरघोडी करण्यासाठीसुद्धा ‘उत्तेजकप्रयोग’ होऊ शकतो.या संदर्भातील साक्षरतेसाठी केंद्राच्या आणि राज्यांच्या अर्थसंकल्पात उत्तेजकविरोधी अभियानासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक तरतुदीची आवश्यकता आहे.

उत्तेजक पदार्थ म्हणजे काय?

उत्तेजक म्हणजे असा पदार्थ ज्याच्या सेवनाने नैसर्गिक क्षमतेत कृत्रिम वाढ होते. क्रीडाप्रकारांमध्ये खेळाडूंच्या कौशल्याचा कस लागतो. परंतु इंजेक्शन किंवा गोळ्यांद्वारे घेतलेल्या उत्तेजकांमुळे खेळाडूला नियमबा पद्धतीने फायदा होतो.

उत्तेजक पदार्थ कसे ओळखावेत?

जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्था (वाडा) प्रतिबंधित उत्तेजकांची यादी ठरावीक कालावधीने जाहीर करते. जसे पृथ्वीच्या उत्तेजक चाचणीत टब्र्यूटलान हा प्रतिबंधित रासायनिक पदार्थ सापडला. त्याचप्रमाणे ‘वाडा’कडून प्रतिबंधित रासायनिक पदार्थाची यादी प्रसारित केली जाते. खेळाडूंना या रासायनिक घटकांची माहिती नसल्यामुळे उपचार घेताना अजाणतेपणे या औषधांचा वापर होऊ शकतो.

अव्वल १० राष्ट्रांमध्ये भारत

उत्तेजकांच्या नियमांचा भंग करणाऱ्या राष्ट्रांची दरवर्षी प्रसारित होते. भारताने या यादीत गेली अनेक वष्रे अव्वल १० राष्ट्रांमधील आपले स्थान अबाधित राखले आहे. २०१८-१९मध्ये १८७ खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत. यात ७० शरीरसौष्ठवपटू, ६० वेटलिफ्टिंगपटू, ५५ अ‍ॅथलेटिक्सपटू, ४० पॉवरलिफ्टिंगपटू आणि २० कुस्तीपटू यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यात वरिष्ठच नव्हे, तर विविध वयोगटांमधील खेळाडूसुद्धा मागे नाहीत. १७ आणि २१ वर्षांखालील वयोगटांच्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धामध्येही गेल्या वर्षी १२ आणि या वर्षी १३ प्रकरणे उजेडात आली आहेत.

‘बीसीसीआय’ला अडचण ‘नाडा’ची

पृथ्वीसहित तीन खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ‘बीसीसीआय’ला ‘‘तुम्हाला उत्तेजक चाचणी घेण्याचा अधिकार कुणी दिला?’’ असा सवाल केला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘बीसीसीआय’ला ‘नाडा’चे वर्चस्व अडचणीचे वाटते आहे. ‘नाडा’ची उत्तेजक प्रतिबंधक चळवळ आणि त्यांचे नमुने घेण्याची पद्धती खराब दर्जाची आहे, असे ‘बीसीसीआय’चे म्हणणे आहे. जुलै २००६पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ‘वाडा’च्या उत्तेजक प्रतिबंधक नियमांचा स्वीकार केला आहे. त्यामुळे ‘ठावठिकाणा’ (व्हेअरअबाऊट्स) या नियमाला विरोध करणाऱ्या ‘बीसीसीआय’ला ‘वाडा’च्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. पण क्रीडा मंत्रालयाशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांमध्ये समाविष्ट नसल्यामुळे ‘बीसीसीआय’ला ‘नाडा’शी संलग्नता अमान्य आहे. ‘बीसीसीआय’ने २००८च्या इंडियन प्रीमियर लीगपासून ‘बीसीसीआय’ स्वीडनस्थित ‘वाडा’ची मान्यता असलेल्या आंतरराष्ट्रीय उत्तेजक चाचणी आणि व्यवस्थापन या संस्थेकडून चाचण्या करून घेत आहे. पण ‘नाडा’शी बांधिलकी नसल्यामुळे ‘बीसीसीआय’ ही संघटना ‘वाडा’च्या अधिपत्याखाली नाही.

‘वाडा’च्या उत्तेजक प्रतिबंधाच्या यादीत इतक्या रासायनिक पदार्थाचा समावेश आहे की, खेळाडूंना त्यांची माहिती होणे शक्य नाही. यापैकी बऱ्याच उत्तेजक घटकांबाबत डॉक्टरसुद्धा अनभिज्ञ असतात. त्यामुळे खेळाडूंनी कोणत्याही गोष्टींचे सेवन करण्यापूर्वी क्रीडावैद्यकतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. याचप्रमाणे उत्तेजकविरोधी चळवळ अधिक सशक्त करण्यासाठी राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही स्पर्धेच्या कालखंडात खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि संघटकांसाठी यासंदर्भातील मार्गदर्शन वर्ग बंधनकारक करण्याची नितांत गरज आहे.  

#मेसीवर तीन महिन्यांची बंदी:-
‘कॉनमेबोल’ संघटनेवर टीका केल्यामुळे कारवाई
गेल्या महिन्यात झालेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत भ्रष्टाचार झाल्याचे वक्तव्य करणारा अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी याच्यावर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी तीन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

‘कॉनमेबोल’ या दक्षिण अमेरिका फुटबॉल महासंघाने मेसीला बंदीसह ५० हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. जुलै महिन्यात ब्राझील येथे झालेल्या या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्याच अर्जेटिनाने चिलीवर २-१ असा विजय मिळवल्यानंतर मेसीने हे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर उपांत्य फेरीत ब्राझीलकडून २-० असा पराभव पत्करल्यानंतर मेसीचा राग उफाळून आला होता.

‘‘सध्या ‘कॉनमेबोल’ संघटनेवर ब्राझीलचे नियंत्रण आहे. भ्रष्टाचार आणि पंचांच्या खराब कामगिरीमुळे लोकांना फुटबॉलचा निखळ आनंद लुटता येत नाही. त्यामुळे हा खेळ मलिन होत आहे,’’ असा दावा मेसीने केला होता.

तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात चिलीच्या गॅरी मेडेलसह वाद घातल्याप्रकरणी मेसीला लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवण्यात आले होते. आपल्या कारकीर्दीतील मेसीचे हे दुसरे लाल कार्ड ठरले होते. मेसीने आपल्या या वक्तव्याबद्दल नंतर ‘कॉनमेबोल’ संघटनेची माफी मागितली होती.

बंदीमुळे मेसीला चार मैत्रीपूर्ण सामन्यांना मुकावे लागणार आहे. मात्र या बंदीविरोधात दाद मागण्यासाठी मेसी आणि अर्जेटिनाकडे एका आठवडय़ाचा कालावधी आहे. अर्जेटिनाचे सप्टेंबर महिन्यात चिली आणि मेक्सिकोविरुद्ध मैत्रीपूर्ण सामने होणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये अर्जेटिना मैत्रीपूर्ण सामन्यात जर्मनीशी दोन हात करेल. या तिन्ही सामन्यांत मेसीला खेळता येणार नाही, मात्र नोव्हेंबरनंतर तो अर्जेटिनाचे प्रतिनिधित्व करू शकेल.

मेसीवर तीन महिन्यांची बंदी

‘कॉनमेबोल’ संघटनेवर टीका केल्यामुळे कारवाई

गेल्या महिन्यात झालेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत भ्रष्टाचार झाल्याचे वक्तव्य करणारा अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी याच्यावर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी तीन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

‘कॉनमेबोल’ या दक्षिण अमेरिका फुटबॉल महासंघाने मेसीला बंदीसह ५० हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. जुलै महिन्यात ब्राझील येथे झालेल्या या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्याच अर्जेटिनाने चिलीवर २-१ असा विजय मिळवल्यानंतर मेसीने हे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर उपांत्य फेरीत ब्राझीलकडून २-० असा पराभव पत्करल्यानंतर मेसीचा राग उफाळून आला होता.

‘‘सध्या ‘कॉनमेबोल’ संघटनेवर ब्राझीलचे नियंत्रण आहे. भ्रष्टाचार आणि पंचांच्या खराब कामगिरीमुळे लोकांना फुटबॉलचा निखळ आनंद लुटता येत नाही. त्यामुळे हा खेळ मलिन होत आहे,’’ असा दावा मेसीने केला होता.

तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात चिलीच्या गॅरी मेडेलसह वाद घातल्याप्रकरणी मेसीला लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवण्यात आले होते. आपल्या कारकीर्दीतील मेसीचे हे दुसरे लाल कार्ड ठरले होते. मेसीने आपल्या या वक्तव्याबद्दल नंतर ‘कॉनमेबोल’ संघटनेची माफी मागितली होती.

बंदीमुळे मेसीला चार मैत्रीपूर्ण सामन्यांना मुकावे लागणार आहे. मात्र या बंदीविरोधात दाद मागण्यासाठी मेसी आणि अर्जेटिनाकडे एका आठवडय़ाचा कालावधी आहे. अर्जेटिनाचे सप्टेंबर महिन्यात चिली आणि मेक्सिकोविरुद्ध मैत्रीपूर्ण सामने होणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये अर्जेटिना मैत्रीपूर्ण सामन्यात जर्मनीशी दोन हात करेल. या तिन्ही सामन्यांत मेसीला खेळता येणार नाही, मात्र नोव्हेंबरनंतर तो अर्जेटिनाचे प्रतिनिधित्व करू शकेल.

4 August 2019 Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »