4 Sep Current Affairs

4 Sep Current Affairs
4 Sep Current Affairs

हाफिज सईद दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित

 • दहशतवाद रोखण्यासाठी करण्यात आलेल्या 'बेकायदा कारवाया प्रतिबंध' (यूएपीए) कायद्यांतर्गत भारताने चार दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. 
 • पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहर याचा या यादीत पहिला नंबर आहे. 
 • तर दहशतवादी संघटना 'जमात उद-दावा'चा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा दुसरा नंबर आहे. 
 • तिसऱ्या नंबरवर गँगस्टर माफिया डॉन दाऊद इब्राहीम आहे. हे तिघेही पाकिस्तानात राहत असल्याची माहिती आहे.
 • या तीन नावांसोबतच दहशतवादी जकी-उर लख्वीचाही या यादीत समावेश आहे. 

बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा (यूएपीए):-

 • यूएपीए म्हणजेच बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा नुकताच संसदेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता.
 • विशेष म्हणजे, मसूद अजहर आणि हाफिज सईद या दोघांना संयुक्त राष्ट्राने ग्लोबल दहशतवादी म्हणून याआधीच जाहीर केलेले आहे.
 • जर एखादी व्यक्ती दहशतवादी कारवाया करीत असेल किंवा त्यात सहभागी असल्यास त्या व्यक्तीला दहशतवादी करता येऊ शकते, असे यूएपीए कायद्याने करता येवू शकणार आहे. 
 • २००४ मध्ये यूपीए सरकार असताना हे विधेयक आणले होते. २००८ साली या विधेयकात सुधारणा करण्यात आली.
 • त्यानंतर २०१३ साली या विधेयकात पुन्हा सुधारणा करण्यात आली. जर एखादी व्यक्ती दहशतवाद पसरवण्यासाठी मदत करीत असेल, पैसे पुरवत असेल, दहशतवादी साहित्याचा प्रचार-प्रसार करीत असेल तर त्या व्यक्तीला या कायद्यानुसार दहशतवादी म्हणून घोषित करता येवू शकते.


 

इथेनॉलच्या किमतीत वाढ

(इथेनॉलचा उपयोग कश्यासाठी होतो असा साधा प्रश्न आयोग विचारू शकतो म्हणून ही बातमी असे छोटे छोटे फॅक्टस आपण निबंधातही वापरू शकतो.)

पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या, उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत प्रति लिटर एक रुपया ८५ पैशांनी वाढ करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली. इंधन आयातीचे शुल्कात एक अब्ज डॉलरची बचत करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे वाहनांसाठी लागणाऱ्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार येत्या एक डिसेंबरपासून राज्य सरकारच्या अखत्यारितील तेल कंपन्या साखर कारखान्यांकडून वाढीव दराने इथेनॉलची खरेदी करतील. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली. उसापासून इथेनॉल निर्मिती तीन प्रकारांनी केली जाते. सरकारच्या निर्णयामुळे इथेनॉल निर्मिती डिसेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० या दरम्यानच्या काळात २६० कोटी लिटरवर पोहोचेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या इथेनॉल निर्मिती प्रतिवर्ष २०० कोटी लिटरपर्यंत केली जाते. 'पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यात दर वर्षी २० लाख टनांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयातशुल्कात एक अब्ज डॉलरची बचत होईल,' असे प्रधान म्हणाले.

Ethenol Formula : C2H5OH

4 Sep Current Affairs
4 Sep Current Affairs

चांद्रयान २ विक्रम लँडरची कक्षा कमी

 • महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ या मोहिमेअंतर्गत चांद्रयानापासून विलग झालेल्या 'विक्रम' या लँडरची कक्षा मंग‌ळवारी प्रथमच यशस्वीरित्या कमी करण्यात आली.
 • त्यामुळे हे लँडर चंद्रावर उतरण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. शनिवारी पहाटे हे लँडर चांद्रभूमीवर उतरणार आहे. 
 • चांद्रभूमीवर उतरवण्यात येणाऱ्या विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरला मुख्य 'चांद्रयान-२' पासून विलग करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला सोमवारी यश आले होते.
 • त्यानंतर कक्षा कमी करण्याची ४ सेकंदांची कारवाई करण्यात आली आहे. 

जम्मू-काश्मिरात पंच सरपंचांना विमासुरक्षा

 • जम्मू आणि काश्मिरातील गावांचे सरपंच आणि पंच (पंचायतींचे सदस्य) यांना पोलिस संरक्षण दिले जाणार असून त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे विमा कवच पुरवले जाणार आहे.
 • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मिरातील पंच व सरपंचांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी हे आश्वासन दिले. या शिष्टमंडळाने मंगळवारी येथे शहा यांची भेट घेतली. 'आम्हाला सुरक्षा पुरवण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली. त्याप्रमाणे प्रशासन सुरक्षा पुरवेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे,' असे कुपवाडा जिल्ह्यातील सरपंच मिर जुनैद यांनी भेटीनंतर सांगितले. तर सर्व पंच व सरपंचांना दोन लाखांचे विमा संरक्षण देण्याचे आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिल्याचे श्रीनगर जिल्ह्यातील हरवान गावचे सरपंच झुबेर निषाद भट यांनी सांगितले. जम्मू-काश्मिरात येत्या १५ ते २० दिवसांत मोबाइलचे नेटवर्क पुन्हा प्रस्थापित होईल. संसदेच्या सभागृहात सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे, परिस्थिती सामान्य झाली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल केला जाईल. - गृहमंत्री अमित शहा
 • जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल सहा वर्षांनी गेल्या वर्षी पंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. (सरपंच, पंचायतींच्या निवडणुका उजळणी करा )
4 Sep Current Affairs
4 Sep Current Affairs

डॉक्टरांवर हल्ला १० लाखांचा दंड १० वर्षांचा कारावास

 • देशभरात डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना वाढत असतानाच, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा तयार करण्यात येत आहे. 
 • डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा देण्याची तरतूद या संदर्भातील कायद्याच्या मसुद्यात करण्यात आली आहे. 

'आरोग्य सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय आस्थापना (हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) कायदा २०१९':-

 • 'आरोग्य सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय आस्थापना (हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) कायदा २०१९' या कायद्याचा मसुदा आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केला असून त्यावर ३० दिवसांमध्ये सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत.
 • या कायद्यांतर्गत वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये वैद्यकीय आस्थापनांमधील डॉक्टर, पॅरा-मेडिकल कर्मचारी यांच्यासह वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, निदान चाचण्यांची सेवा पुरवणारे कर्मचारी तसेच रुग्णवाहिकांचे चालक यांचाही समावेश आहे. 
 • या कायद्याच्या मसुद्यान्वये, हल्ला झाल्यास किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
 • याअंतर्गत नुकसान झालेल्या मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या दुप्पट तसेच हल्ला झाल्यास किंवा जखमी झाल्यास रुपये एक लाख ते पाच लाख इतकी नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
 • दोषीने नुकसानभरपाई दिली नाही, तर महसूल वसुली कायदा १८९० अंतर्गत जमीन महसुलातील बाकी म्हणून ही रक्कम वसूल केली जाईल. 

हिंसाचार म्हणजे काय?:-

 • या मसुद्यानुसार, वैद्यकीय कर्मचारी वैद्यकीय आस्थापनेमध्ये सेवा बजावत असताना त्याला कोणत्याही प्रकारे इजा, धमकी, अडथळा किंवा जीव धोक्यात घालणारे वर्तन करणे हे हिंसाचार म्हणून गृहीत धरले जाईल.
 • वैद्यकीय आस्थापनेच्या मालमत्तेचे नुकसान किंवा कागदपत्रांचे नुकसान हेही हिंसाचार म्हणून गणले जाईल.

डोरियन चक्रीवादळाचा बहामासला तडाखा

 • डोरियन चक्रीवादळाने कॅरेबियन देश बहामासला जोरदार तडाखा दिला. बहामासमध्ये जोरदार पाऊस सुरू असून, वादळाच्या तडाख्याने बहामासमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि २१ जण जखमी झाले आहेत. वादळामुळे सुमारे १३०० घरांचे मोठे नुकसान झाले आहे. 
 • वादळामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या आहेत. किनारपट्टीवर असलेल्या घरांच्या दुसऱ्या मजल्यावर पाणी शिरले आहे. 
 • ग्रँड बहामा विमानतळावर सहा फूट पाणी आहे. वाऱ्याचा जोर इतका होता, की बचाव पथकालाच आपला जीव वाचविण्यासाठी पळापळ करावी लागली. वादळ प्लोरिडाच्या दिशेने पुढे जात आहे. 
 • बहामासचे पंतप्रधान हुबर्ट मिनिस यांनी डोरियन वादळाला आजवरचे सर्वांत शक्तिशाली वादळ असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, वादळाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बहामास:-

 • बहामास हा अटलांटिक महासागरातील २९ बेटांनी बनलेला एक देश आहे. 
 • बहामास अमेरिकेच्या आग्नेय दिशेला तर क्युबा, डॉमिनिकन प्रजासत्ताक व हैतीच्या पूर्वेला कॅरिबियन प्रदेशात वसला आहे. 
 • नासाउ ही बहामासची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
4 Sep Current Affairs
4 Sep Current Affairs

L&T करणार नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम

 • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जीव्हीके समूह उभारणार असून या विमानतळाच्या बांधणीचे काम जीव्हीकेने एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शन्स या बांधकाम क्षेत्रातील अग्रणी कंपनीकडे सोपवले आहे. 
 • या संबंधीचा करार नुकताच झाला. या विमानतळावरून प्रारंभी दरवर्षी एक कोटी प्रवाशांची ये-जा होण्याची शक्यता आहे. 
 • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार हलका करण्यासाठी नवी मुंबई विमानतळ उभे केले जात आहे. 
 • पनवेलच्या दक्षिणेकडे उलवे परिसरात हे विमानतळ सिडकोअंतर्गत उभारले जाणार आहे. सिडकोने त्याचे कंत्राट जीव्हीकेला दिले असून जीव्हीकेने एल अॅण्ड टी कंपनीला या कामाचे उपकंत्राट दिले आहे. 
 • या अंतर्गत ३,७०० मीटर लांबीची धावपट्टी, प्रवासी टर्मिनल, विमाने उभी करण्याची जागा, टॅक्सी वे, अंतर्गत रस्ते, बहुस्तरीय वाहनतळ तसेच, हवाई क्षेत्राशी निगडित अन्य कामे एल अॅण्ड टी कंपनी करेल.
 • या कराराच्या वेळी जीव्हीके समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जीव्हीके रेड्डी व एल अॅण्ड टी सीईओ एस. एन. सुब्रमण्यन उपस्थित होते.
   

टी-२०तून मितालीची निवृत्तीची घोषणा!

 • भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राजने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करण्याकरिता वेळ मिळावा म्हणून टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे मितालीने स्पष्ट केले आहे. 
 • मितालीने सलामीची फलंदाज म्हणून श्रीलंका, बांगलादेश आणि भारतातील महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आहे. 
 • २००६ पासून टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर आता२०२१ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मितालीने स्पष्ट केले. 
 • देशासाठी विश्वचषक जिंकण्याचे माझे स्वप्न कायम असून या स्पर्धेत मला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे, असं सांगतानाच सतत प्रोत्साहन दिल्याबद्दल मिताली राजने बीसीसीआयचे आभारही मानले आहेत. 
 • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या महिलांच्या टी-२० संघाला तिने शुभेच्छा दिल्या आहेत, असे बीसीसीआयने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
 • २००६ मध्ये डर्बी येथे खेळल्या गेलेल्या टी-२०मध्ये तिने भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 
 • मितालीने टी-२० च्या ८९ सामन्यात ३७.५ च्या सरासरीने २३६४ धावा केल्या आहेत. तिच्या टी-२० करिअरमध्ये तिने सर्वाधिक ९७ धावा केल्या आहेत. १९९९मध्ये मितालीने टी-२० सामन्यात पदार्पण केले होते. 
 • गुवाहटी येथे इंग्लंड विरोधात तिचा कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. टी-२० सामन्यात दोन हजार धावांचा टप्पा पार करणारी मिताली ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. 
 • तिने २०३ एकदिवसीय सामन्यात ५१.२९ च्या सरासरीने ६७२० धावा केल्या आहेत. १० कसोटी सामन्यात मितालीने ६६३ धावा केल्या आहेत.
4 Sep Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »