5 July Current Affairs

5 July Current Affairs
5 July Current Affairs

#IAFची क्षमता वाढणार; रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी रशियाशी २०० कोटींचा करार

१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्लानंतर सरकारकडून तिन्ही सैन्यदलांना आपत्कालीन अधिकार देण्यात आले होते. याअंतर्गत हा करार करण्यात आला आहे.
भारतीय हवाई दलाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने भारताने रशियासोबत आणखी एक महत्वाचा करार केला आहे. रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी भारताने रशियासोबत २०० कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यानुसार, आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आपल्या एमआय-३५ या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी रशियाकडून ही रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे (स्ट्रम अटाका) खरेदी केली जाणार आहेत. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्लानंतर सरकारकडून तिन्ही सैन्य दालांना आपत्कालीन अधिकार देण्यात आले होते. यानुसार, तिन्ही सैन्य दले आपल्या गरजेनुसार ३०० कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे तत्काळ प्रभावाने खरेदी करु शकतात.
भारताकडून याच आपत्कालीन नियमांचा वापर करुन रशियासोबत स्ट्रम अटाका क्षेपणास्त्रांचा करार करण्यात आला आहे. भारताला येत्या तीन महिन्यांत या क्षेपणास्त्रांचा पुरवठा सुरु होणार आहे. स्ट्रम अटाका हे क्षेपणास्त्र एसआय-३५ हेलिकॉप्टरमध्ये लावल्यानंतर शत्रूचे रणगाडे आणि इतर शस्त्रांपासून वाचण्याची क्षमता वाढणार आहे. एमआय-३५ भारतीय हवाई दलाचे थेट हल्ला करणारे हेलिकॉप्टर आहे. भारत अनेक काळापासून रशियाकडून क्षेपणास्त्र खरेदी करण्यास उस्तुक होता. मात्र, या कराराद्वारे तब्बल एक दशकानंतर भारताची इच्छा पूर्ण झाली आहे.
गेल्या आठवड्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीन संरक्षण आपत्कालीन तरतुदींनुसार तिन्ही सैन्य दलांकडून होणाऱ्या खरेदीबाबत एक प्रेझेंटेशन दिले होते. यामध्ये आपत्कालीन तरतुदींचा वापर करुन शस्त्रास्त्रे खरेदीमध्ये हवाई दल पुढे राहिले आहे. याच तरतुदीनुसार, लष्करही २००० स्टँड ऑफ वेपन सिस्टिमसोबत अनेक स्पेअर पार्ट आणि हवेतून हवेत मारा करण्याच्या क्षेपणास्त्रांचा करार अनेक देशांसोबत करुन स्वतःला कोणत्याही युद्धासाठी सज्ज ठेवणार आहे. त्याचबरोबर भारत रशियाकडून इंग्ला-एस एअर डिफेन्स क्षेपणास्त्रही तत्काळ खरेदी करणार आहे.

#विधान परिषदेत मंत्र्यांची पूर्णवेळ उपस्थिती

या अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये एकूण २० विधेयके पारित करण्यात आली.
मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज बंद पडण्याचे अनेक प्रसंग उद्भवतात. मात्र, यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत मंत्री उपस्थित नसल्याच्या कारणामुळे एकदाही सभागृह तहकूब लागले नाही. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाजाचा वेळ वाया गेल्याचा प्रसंग विधान परिषदेत उद्भवला नसल्याचे संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
२० विधेयके पारित या अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये एकूण २० विधेयके पारित करण्यात आली. एकूण १२ बैठकांच्या माध्यमातून एकूण ६८ तास ७ मिनिटे सभागृहाचे कामकाज झाले. मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज तहकूब करण्याची वेळ या अधिवेशनात आली नाही. अन्य कारणांमुळे १२ तास १४ मिनिटांचा सभागृहाचा वेळ वाया गेला. दररोज सरासरी ५ तास ४० मिनिटे सभागृहाचे काम चालले.
९५ औचित्याचे मुद्दे या अधिवेशनात एकूण ९५ औचित्याचे मुद्दे आले. त्यापैकी २९ मांडण्यात आले. ७७२ पैकी २०५ लक्षवेधी सूचना मान्य करण्यात आल्या. त्यापैकी ५८ ची सभागृहात चर्चा झाली. २५६ विशेष उल्लेखांपैकी १३८ सभागृहात मांडण्यात आले. आठपैकी दोन अल्पकालीन सूचनांवर सभागृहात चर्चा झाली.
विधानसभेची २० आणि परिषदेचे एक अशी एकूण २१ शासकीय विधेयके पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत संमत करण्यात आली. तर, अशासकीय विधेयकांच्या सात सूचनांपैकी चार स्वीकृत करण्यात आली तर दोन विचारार्थ आहेत. १६१ पैकी १२७ अशासकीय ठरावाच्या सूचना स्वीकृत करण्यात आल्या.
२८२५ तारांकित प्रश्न या अधिवेशनात २८२५ तारांकित प्रश्न आले. त्यापैकी ९७२ प्रश्न स्वीकारण्यात आले. तर ३७ प्रश्नांची सभागृहात तोंडी उत्तरे देण्यात आली. नियम ९३ अन्वये आलेल्या १३१ पैकी ८१ सूचना आल्या. त्यावर सभागृहात १४ निवदने झाली तर १६ पटलावर ठेवण्यात आली.

5 July Current Affairs
5 July Current Affairs

#बांगलादेशच्या टायगरचा विश्वविक्रम एकही खेळाडू नाही आसपास:-

 शाकिबने फलंदाजीत कोहलीला मागे टाकलं तर गोलंदाजीत बुमराहशी बरोबरी केली आहे.
ICC Cricket World Cup च्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने अर्धशतक केलं. त्याने आतापर्यंत 4 अर्धशतकं आणि दोन शतकं केली आहेत. वर्ल्ड कपमध्ये त्याने 500 धावा पूर्ण केल्या असून यासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. शाकिब हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जात आहे. त्याने वर्ल्ड कपमध्ये 500 धावा आणि 11 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. कोणताच खेळाडू त्याच्या आसपास नाही. त्याने सात सामन्यात 40 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
भारताविरुद्ध शाकिबनं 66 धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोहलीने 7 सामन्यात 408 धावा केल्या आहेत. तर बुमराहने 7 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. कोहली फलंदाजीत सर्वोत्तम तर बुमराह गोलंदाजीत सर्वोत्तम आहे.
बांगलादेश 7 गुणांसह सध्या सातव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशच्या संघाची कामगिरी जरी दिसण्यासारखी नसली तरी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने यंदाचा वर्ल्ड कप गाजवला आहे. मॉर्गन, रूट किंवा अॅरॉन फिंच, रोहित शर्मा, वॉर्नर यांनाही शाकिब अल हसनने मागं टाकलं आहे. पहिल्या सामन्यापासून त्याने वर्ल्ड कपमध्ये खेळात सातत्य ठेवलं आहे. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या या खेळाडूने आतापर्यंत 542 धावा केल्या आहेत. तो दुसऱ्या स्थानावर असून भारताचा रोहित शर्मा 544 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध शाकिब अल हसनने फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत 5 विकेट घेत त्याने इतिहास रचला. वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा क्रिकेटपटू आहे.
वर्ल्ड कपमध्ये एकाच सामन्यात अर्धशतक आणि 5 विकेट घेण्याची कामगिरी यापूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केली होती. त्याने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडविरुद्ध अर्धशतक आणि 5 विकेट घेतल्या होत्या.
बांगलादेशकडून वर्ल्ड कपमध्ये 5 विकेट घेणारा शाकिब अल हसन पहिला खेळाडू ठरला आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 400 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 10 विकेट घेणारा तो एकमेव खेळाडू ठरला होता.
शाकिब अल हसनने वर्ल्ड कपमध्ये शतक आणि एकाच सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी आतापर्यंत फक्त दोन खेळाडूंनी केली आहे. भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार कपिल देव आणि 2011 च्या वर्ल्ड कप विजयात मोलाची कामगिरी करणारा युवराज सिंग यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा शाकिब तिसरा खेळाडू ठरला आहे.

#चांद्रयान-२’चं प्रक्षेपण प्रत्यक्षात पाहण्याची संधी जाणून घ्या कशी कराल नाव नोंदणी:-

भारताचा महत्वकांशी प्रकल्प असणारे चांद्रयान-२ लवकरच आकाशात झेपावण्यास तयार आहे. लाँचिंगसाठी तयार आहे. १५ जुलै रोजी रात्री २ वाजून ५१ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ चं आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटामधून येथून प्रक्षेपण होणार आहे. इस्त्रोमार्फत करण्यात येणाऱ्या या लॉचिंगचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे लॉचिंग सर्वसामन्यांना श्रीहरीकोटा येथून प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.
‘चांद्रयान-२’ चं लॉचिंग पाहण्यासाठी आज रात्री १२ वाजल्यापासून म्हणजेच ४ जून सुरु होताच नावनोंदणी सुरु होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी इस्त्रोकडून कोणत्याही पद्धतीचं शुल्क किंवा तिकीट आकारण्यात येणार नाही. श्रीहरीकोट्टा येथील दोन लॉचिंग पॅडपैकी एकावरुन हे प्रक्षेपण होणार आहे. याच लॉचिंग पॅडपासून काही अंतरावर असलेल्या मैदानासारख्या रॉकेट स्पेस थीम पार्कमधून हे लॉचिंग साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. इस्त्रोच्या ट्विटवर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे.
चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे. लाँचिंगनंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चंद्राच्या कक्षात शिरल्यानंतर यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या आसपास ठरलेल्या जागी उतरणार आहे.
कशी कराल नोंदणीहे प्रक्षेपण पाहण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. इस्त्रोमार्फत सतीश धवन स्पेस सेंटरच्या (एडीएससी) वेबसाईटवर ४ जूलैपासून उपलब्ध होणार आहे.
त्या लिंकवर क्लिक करुन तेथे आपली माहिती देऊन लॉगइन करणे आवश्यक असणार आहे.
याआधी इस्त्रोचे लॉचिंग पाहण्यासाठी नागरिकांना त्यांचे इमेल आयडी इस्त्रोकडे पाठवायला लागायचे. हे इमेल आयडी व्हेरिफाय झाल्यानंतरच लॉचिंग लाइव्ह पाहता येत होते.हे लॉचिंग पाहायला जाण्यासाठी नोंदणी करताना नाव, संस्थेचे नाव, किती जणांचा ग्रुप आहे, लॉचिंग पॅडजवळ कसे पोहचणार, कोणत्या गाडीने येणार तिचा नंबर अशी माहिती द्यावी लागणार आहे.
या साईटवर मोबाइल क्रमांकही द्यावा लागणार आहे. त्या माध्यमातून व्हेरिफिकेश झाल्यानंतर अटी आणि नियम मान्य केल्यावर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल.

5 July Current Affairs
5 July Current Affairs

#पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री

नागपूर : राज्याचे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी नवा विक्रम केला आहे. मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारे 1972 नंतरचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. (आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.) 1972 नंतर एका नेत्याने सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे.
दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 11 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यामध्ये वसंतरावांनी पाच वर्षांची एक सलग टर्म पूर्ण केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच 5 सलग वर्ष विधिमंडळाचे नेते राहू शकले आहेत. फडणवीस हे राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्रीदेखील आहेत.
मुख्यमंत्री होणे आणि पद टिकवण्यासाठी फडणवीसांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर फडणवीसांना पक्षातील आणि पक्षाबाहेरची मोठी आव्हाने होती. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी काही आमदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांना पक्षातील जुने नेते एकनाथ खडसे यांची महत्त्वकांक्षा, शेतकरी आंदोलनाची तीव्रता, मराठा आंदोलनाचे आवाहन, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ते पंढरपूरच्या विठ्ठल पूजेला जाऊ न शकणे इथपर्यंत बरीच आव्हाने पेलावी लागली होती. तरिही फडणवीस टिकले.

#हिमा दासला सुवर्णपदक

पोलंडमध्ये झालेल्या पोझनेन ग्रा प्रि ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताची महिला धावपटू हिमा दासने महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत भारताचा ऍथलीट तेजेंदर पाल सिंग तूरने पुरूषांच्या गोळाफेकीमध्ये कास्यपदक घेतले.
भारताची महिला धावपटू आणि राष्ट्रीय विक्रम नोंदविणारी हिमा दासने मंगळवारी या स्पर्धेतील महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत 23.65 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. 
महिलांच्या 400 मी. धावण्याच्या प्रकारात हिमा दासही राष्ट्रीय विक्रमवीर आहे. भारताच्या व्ही के विस्मयाने महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत 23.75 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक मिळविले. 
पुरूषांच्या गोळाफेकमध्ये भारताचा आशियाई विजेता तेजिंदर पाल सिंगने 19.62 मी. चे अंतर नोंदवित कास्यपदक मिळविले. 
पुरूषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या मोहम्मद अनासने कास्यपदक तर 400 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या के.एस. जीवनने कास्यपदक मिळविले.

5 July Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »