6 August Current Affairs

6 August Current Affairs
6 August Current Affairs

राजस्थानात लवकरच ऑनर किलिंग झुंडबळी प्रतिबंधक कायदे

राजस्थानमधील झुंडबळी (मॉब लिचिंग) आणि ऑनर किलिंगच्या (प्रतिष्ठाबळी) घटनांना आळा घालण्यासाठी अशोक गेहलोत यांचे सरकार कायदा लवकरच कायदे करणार आहे. या दोन्ही कायद्याचे प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आले आहेत. हे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी आवश्यक न्यायालय तयार करण्याची योजनाही विधेयकात प्रस्तावित आहे.
झुंडीपासून संरक्षण कायदा-२०१९ आणि सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रथांच्या नावाखाली वैवाहिक स्वातंत्र्यामधील हस्तक्षेप प्रतिबंधक कायदा-२०१९ अशी दोन्ही विधेयके सरकारच्या वतीने विधानसभेत मांडण्यात आली आहेत. गेल्या काही काळात झुंडबळीच्या असंख्य घटना घडल्या आहेत. यात अनेकांना जिव गमवावा लागला, तर काही जखमी झाले आहेत. द्वेषाचे वातावरण कमी करून अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी हा कायदा सरकारने आणला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सागितले.
यासाठी राज्य पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत समन्वयक असणार आहे. राज्यस्तरावरील अधिकाऱ्याचे पद पोलीस महानिरीक्षकांच्या दर्जाचे असून त्याची नियुक्ती राज्याचे पोलीस महासंचालक करणार आहे. याचप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक अधिकारी समन्वयक असणार आहे. या कायद्यात झुंडबळीची व्याख्या सविस्तर करण्यात आलेली आहे. राजस्थान सरकारने ऑनर किलिंग प्रतिबंधक कायद्यात दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतुद केली आहे.
 

आफ्रिकेच्या स्टेन गन ची कसोटीमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा 'स्टेन गन' म्हणून प्रसिद्ध असलेला वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. स्टेन कसोटीतून निवृत्त होणार असला तरी तो वनडे आणि टी-२० सामन्यात खेळताना दिसणार आहे. स्टेनने दक्षिण आफ्रिकेसाठी ९३ कसोटी सामने खेळले असून ४३९ गडी बाद केले आहेत. 
स्टेनने आज सोमवारी कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. वनडे आणि टी-२० क्रिकेट खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. मी ज्या क्रिकेट खेळाचा सर्वाधिक चाहता आहे. त्या क्रिकेटमधून मी आज संन्यास घेत आहे, असे स्टेनने म्हटले आहे. स्टेनने २००४ साली इंग्लंडविरुद्ध पोर्ट एलिझाबेथ कसोटी क्रिकेटमधून पदार्पण केले होते. तर शेवटचा कसोटी सामना याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात खेळला होता. कसोटीतून निवृत्त घेताना स्टेन म्हणाला, कसोटी क्रिकेट हा सर्वश्रेष्ठ खेळ आहे. ते मानसिक, शारीरिक आणि भावनात्मक रूपाने तुमची परीक्षा घेत असते. कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याने मला वाईट वाटत आहे. पण, मी यापुढे वनडे आणि टी २० क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार आहे. 
स्टेनने ९३ कसोटी सामन्यात ४३९ विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्टेनचा समावेश आहे. स्टेनने करिअरमध्ये २६ वेळा मालिकेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. फलंदाज म्हणून स्टेनने १२५१ धावा सुद्धा केल्या आहेत.

6 August Current Affairs
6 August Current Affairs

1000 रुपयांची नोट चलनात आणण्यासंबंधीचा 1999 सालाचा कायदा रद्द

भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) 1000 रुपये मूल्य असलेली नोट चलनात आणण्याची परवानगी देणारा 1999 सालाचा कायदा रद्द करण्यात आला आहे.
‘उच्च परिमाण बँक नोटा (चलन अवैधता) दुरूस्ती कायदा-1998’ (High Denomination Bank Notes (Demonetisation) Amendment Act) हा गेल्या आठवड्यात रद्द करण्यात आलेल्या 58 कायद्यांपैकी एक आहे. 
2 ऑगस्ट 2019 रोजी 58 कायदे रद्द करण्याचे विधेयक संसदेनी मंजूर केले. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी चलनी नोटांची कमतरता दूर करण्यासाठी डिसेंबर 1998 मध्ये हे विधेयक आणले होते.
8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने महात्मा गांधी मालिकेच्या सर्व 500 आणि 1000 रुपये मूल्य असलेल्या नोटा चलनातून बाद केल्या. तसेच 500 आणि 2000 रुपये मूल्य असलेल्या नवीन नोटा देण्याची घोषणा केली.

SAIL SCOPE कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड याचा विजेता

यदाच्या ‘SCOPE कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड 2019’ या सोहळ्यात क्राइसिस कम्युनिकेशन्स आणि इंटर्नल कम्युनिकेशन्स या दोन श्रेणींमध्ये भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) याला हा पुरस्कार मिळाला आहे.
3 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
परसारमाध्यम, कर्मचारी आणि लोकांचा विश्वास संपादन करणारी जबाबदार, प्रामाणिक आणि पारदर्शक कॉर्पोरेट असल्याबद्दल क्राइसिस कम्युनिकेशन्स श्रेणीत SAIL ला हा पुरस्कार मिळाला. तर इंटर्नल कम्युनिकेशन्सच्या श्रेणीमध्ये हा पुरस्कार कॉर्पोरेटला विविध प्रसारमाध्यमांचा अभिनव वापर करून कर्मचार्‍यांशी संघटनात्मक बंध बळकट करण्यासाठी, त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी तसेच कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांसाठी दिला गेला.
 

6 August Current Affairs
6 August Current Affairs

ई गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद शिलाँगमध्ये आयोजित केली जाणार

ई-गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद 8 ते 9 ऑगस्ट दरम्यान शिलाँग, मेघालय येथे आयोजित केली जाईल.
ईशान्येकडील राज्यात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘डिजिटल इंडियाः सक्सेस टू एक्सलन्स’ Digital India:  Success to Excellence”   ही या परिषदेची थीम आहे. 
ई-गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद

उद्दीष्ट: ईशान्येकडील राज्यांमध्ये ई-गव्हर्नन्सशी संबंधित पुढाकारांना गती देणे.
प्रशासकीय सुधारणा व लोक तक्रार विभाग यांच्या वतीने हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि मेघालय सरकारच्या सहकार्याने आयोजित केले गेले आहे. 
या कार्यक्रमात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहेत. यात 450 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
 

डॉ अतीश दाभोलकर

विश्वातल्या पदार्थ-वस्तूंची रचना (मॅटर) आणि त्यांच्यातील कार्यरत बले (फोर्सेस) कळली की विश्व समजेल, असा कयास आहे. मग या दोहोंना एकत्रित गुंफणारा नियम (युनिफिकेशन थिअरी) मांडला, तर विश्वनिर्मितीचे कोडे सुटण्याची शक्यता निर्माण होणार होती. १९७०च्या दशकात पदार्थातील चारपैकी तीन बलांचा (विद्युतचुंबकीय, स्ट्राँग आणि वीक) एकत्रित विचार करणारी ग्रँड युनिफिकेशन थिअरी आली; मग या सर्वाचा व गुरुत्वाकर्षण या चौथ्या बलाचाही विचार करणाऱ्या स्ट्रिंग थिअरीचा जन्म १९८०च्या दशकात झाल्याने विश्वरहस्ये उलगडण्याची आशा दृढावली. याच काळात, तोपर्यंत अणूच्या अंतरंगात गुरफटलेले विज्ञानजगत अंतराळाकडेही पाहू लागले आणि कृष्णविवराच्या संशोधनाकडे वळले. या साऱ्या संशोधनास गेली पाच दशके प्रत्यक्षाप्रत्यक्ष गती देणाऱ्या इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स (आयसीटीपी) या इटलीस्थित संशोधन संस्थेच्या संचालकपदी गेल्याच आठवडय़ात डॉ. अतीश दाभोलकर यांची निवड झाली. कृष्णविवरातून ऊर्जा सतत बाहेर टाकली जाते, असा सिद्धांत स्टीफन हॉकिंग यांनी मांडल्यानंतर कृष्णविवराच्या तापमानाबद्दल प्रश्न निर्माण झाला. त्यावर संशोधन करणाऱ्यांत डॉ. अतीश दाभोलकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. कृष्णविवरांची पुंजकीय (क्वांटम) संरचना, हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. स्ट्रिंग थिअरीवरही त्यांनी संशोधन केले, ते ‘मूलभूत’ मानले जाते. इतके की, त्यांनी लिहिलेला शोधनिबंध वाचून खुद्द स्टीफन हॉकिंग त्यांना भेटायला आले होते. संशोधनाच्या जगात वावरणाऱ्यांच्या अशा भेटी होतातच; पण डॉ. दाभोलकर यांचे कौतुक यासाठी की, त्यांच्या पाठपुराव्यामुळे हॉकिंगनी मुंबईत येऊन व्याख्यान दिले होते! संशोधन संस्था हव्यातच, पण विज्ञान जनमानसात झिरपण्यासाठी विज्ञानाची संस्कृती रुजवावी लागते, यावर आपले काका डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणेच त्यांचाही विश्वास आहे. महाराष्ट्रातील सर्वार्थाने आधुनिक असलेल्या या कुटुंबातील शेतीशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोलकर यांचे ते पुत्र. कोल्हापुरात १९६३ साली जन्मलेल्या डॉ. अतीश यांचे सुरुवातीचे शिक्षण गारगोटी येथे झाले. पुढे कानपूरच्या आयआयटीत पदवी घेतल्यानंतर प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळवली. मग १९९६ ते २०१० पर्यंत मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांनी अध्यापन केले. संशोधन कार्यासाठी २००६ साली शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. २०१४ सालापासून ते आयसीटीपीमध्ये कार्यरत होते; लवकरच चार नव्या शाखा स्थापन होणाऱ्या या संस्थेचे प्रमुखपद डॉ. दाभोलकरांकडे येणे, हे त्यांच्या संशोधन कार्यावरील व्यापक विश्वासाचेच द्योतक आहे.

6 August Current Affairs
6 August Current Affairs

आज जागतिक हिरोशिमा दिवस

६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा या ठाण्यावर जगातील पहिला अणुबॉंब टाकला. हा बॉंब वाहून नेणार्‍या वैमानिकाचे नाव कर्नल पॉल डब्ल्यू. टिबेट्स आणि बॉंब टाकणारा मेजर थॉमस डब्ल्यू. फ़ीअरबी. अणुबॉंब म्हणजे नेमके काय? हे वैमानिक आणि प्रमुख अधिकारी पॉल टिबेट्‌स यालाही माहिती नव्हते. या अणुबॉम्ब हल्ल्यांचे सांकेतिक नाव "लिटल बॉय" असे होते. मात्र हे लिटल बॉय जपान आणि माणुसकीला खोल जखम देऊन गेला.लिटल बॉयला दुस-या महायुध्‍दाच्या वेळी अमेरिकेतील मॅनहॅट्टन प्रकल्पांतर्गत लॉस अलामोसमध्‍ये बनवण्‍यात आला होता.

जवळजवळ ४ हजार किलोग्रॅम वजनाच्या या बॉमची लांबी ३ मीटर आणि व्यास ७१ सेंटिमीटर होते. या बॉम्बने आपली विस्फोटक क्षमता युरेनियम -२३५ च्या आण्विक विखंडन प्रक्रियेतून प्राप्त केले होते. तिची विध्‍वंसक क्षमता १३-१८ किलोटन टीएनटी (ट्रायनायट्रोटालूईन) च्या बरोबरीचे होते.या महासंहारक अस्त्राचा जपानवर वापर करू नये, त्या राष्ट्राला त्याची माहिती द्यावी आणि शरण आणावे असे हे अस्त्र निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. पण, अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष ट्रूमन यांनी ते काही ऐकले नाही. अमेरिकन हवाई दलाला, जपानवर अणुबॉंब फेकायचा आदेश त्यांनी दिला.

जपान हे नक्की झाल्यावर कुठल्या शहरावर अणुबॉम्ब टाकायचा हे हि ठरवायचे होते. इथे तेव्हाच्या अमेरिकेचा अतिशय क्रूरपणा दिसतो. अणुबॉम्बचे नक्की काय आणि किती दुष्परिणाम होतात हे अजून जगाला माहित व्हायचे होते. या परिणामांचा "नीट अभ्यास करण्यासाठी" अशी शहरे हवी होती जिथे साधारण ३ माइल्स म्हणजे ४.८ किमीच्या परिघात नागरी वस्ती दाट आहे. अशा ठिकाणी बॉम्ब टाकल्यावर त्याची विनाशकारी क्षमता नीट अभ्यासता येईल असे त्यांचे म्हणणे होते. अणुबॉम्बचे परिणाम व्यवस्थित अभ्यासता यावे म्हणून या महत्वाच्या शहरांवरचे इतर बॉम्ब हल्ले बंद करण्यात आले. एप्रिल, मे मध्ये आधी हिरोशिमा, क्योतो, योकोहामा, कोकुरा अशी शहरे त्यांनी निवडली. नंतर पुन्हा एकदा चर्चा वगैरे होऊन २५ जुलै रोजी हिरोशिमा, कोकुरा, नीइगाता, आणि नागासाकी अशी चार शहरे नक्की करण्यात आली. कदाचित टोकियोचे नाव नसण्याचे कारण म्हणजे टोकियोमध्ये अमेरिकेचे युद्ध कैदी होते हे असावे. २ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर सगळ्यात आधी बॉम्ब टाकण्यात येण्याचे नक्की केले गेले आणि तशी 'ऑफिशिअल ऑर्डर' निघाली. सकाळी ८:१५ मिनिटांनी "एनोला गे"ने ९४००मी उंचीवरून अणुबॉम्ब 'आइओई'च्या 'टी' ब्रिज वर टाकला.त्याचा स्फोट हिरोशिमा शहराच्या २००० फूट उंचावर झाला. जास्तीत जास्त परिणामांसाठी बॉम्ब तसा हवेतच फुटणे जरुरी होते, त्यामुळे तो तसाच तयार केला गेला होता. काही मायक्रो सेकंदातच न्युक्लीअर चेन रिअक्शन्स चालू झाल्या. फ़ार मोठा स्फ़ोट होवून ४०००० फ़ुटांवर धुराचे लोट उठत राहिले.१७० मैलांपर्यंत त्याचा धडाका जाणवला. (मुंबई ते पुणे अंतर १०० मैल आहे त्यामुळे १७० मैलाचा अंदाज यावा) बॉंब पडला त्या १ मैलाच्या परिघात एकही माणूस जिवंत राहिला नाही. माणसे उभ्या जागेवर विरून गेली. उरल्या त्या त्यांच्या सावल्या. भिंतीवर, दगडावर, आणि चपलांवर उमटलेल्या. लोखंडाचे दरवाजेच्या दरवाजे वाकले. टाईल्स, घरातली क्रोकरी, काचेच्या वस्तू चक्क वितळून एकमेकाला चिकटून गेल्या. या वस्तुंची अशी अवस्था तर माणसांचे काय झाले असेल याची कल्पनाच करवत नाही.अशा प्रकारचे अस्त्र प्रथमच वापरले गेले असल्याने नक्की काय झालेय हे ही कळत नव्हते. "अनेक बॉंब एकाच वेळेस फ़ोडले गेले आहेत" अशी भाबडी समजूत त्यांनी करून घेतली होती. लोकांनी सूर्यापेक्षा प्रखर तेजाचा गोळा फ़ुटून निघावा असा प्रकाश क्षणभर पाहिला. ३ लाख लोकांचे डोळे दिपून गेले.प्रकाश एवढा प्रखर होता की ३ लाख लोकांना त्या प्रकाशाने कायमचे अंधत्व आले.प्रकाशाची लाट सर्वत्र दिसत होती.१०००० सेंटीग्रेडची भयानक उष्णता पुष्कळांचे प्राण घेण्यास समर्थ ठरली.या भीषण लाटेचा दिड-दोनशे फ़ूट उंचीचा एक तप्त कोनच सर्वांचा पाठलाग करीत होता.एका क्षणामध्ये ६०००० लोक एकदम मरण पावले.यानंतर वार्‍याचे प्रचंड झोत सुरू झाले.

या सपाट्यात सुमारे ३ लाख लोक कोलमडून पडले. या महासंहारातून वाचलेले एक लाख लोक तीन दिवसात किरणोत्सर्गाच्या आणि आगीच्या जखमांनी टाचा घासून मेले. जे जगले ते अनंत यातना भोगत मरणाची वाट पहात राहिले. नंतर झालेल्या पावसाच्या थेंबांनी लोकांना बरे वाटले पण तोही भ्रमच ठरला.कारण किरणोत्सारी द्रव्यांनी ते थेंब विषारी झाले होते.स्फ़ोटात होरपळलेल्या लोकांनी हे काळेशार पाणी पिताच त्यांची शरीरे आतून जळाली. अग्निप्रलयापेक्षा हा ५ मिनिटांचा पाऊस अधिक भयानक होता.

मृत्यू :- ७८,१५०

बेपत्ता:- १३,९८३

जखमी:- ३७,४२४

इतर प्रकारची इजा:- २,३५,६५६

एकूण :- ३,६५,२१३

जगात अणुवस्त्र चाचण्या सुरूच:-

हिरोशिमा, नागासाकी शहरांवरील हल्ल्यानंतरही जगात 2 हजारांहून अधिक आण्विक शस्त्रांच्या चाचण्या झाल्या. 
1945 ते 1980 या काळात जगातील 500 हून अधिक ठिकाणी वातावरणातील आण्विक शस्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या. 
चाचणी घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान व उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »