8 August Current Affairs

8 August Current Affairs
8 August Current Affairs

चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्काराचे मानकरी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने २०१५ ते २०१७ या कालावधीतील रखडलेल्या चित्रभूषण व चित्रकर्मी पुरस्कारांची एकत्र घोषणा केली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे या पुरस्कारांची घोषणा नि वितरण गेल्या काही वर्षांपासून रखडले होते.

चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाºया मान्यवरांना देण्यात येणारे ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार बुधवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी याची घोषणा व पुरस्काराची माहिती यावेळी दिली. या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी, १९ आॅगस्टला रवींद्र नाट्य मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता रंगणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येईल.

‘चित्रभूषण’ पुरस्कार:-

•    अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी, तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे. 
•    शाल, श्रीफळ आणि ५१,००० हजार रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

चित्रकर्मी’ पुरस्कार:-
•    रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, अप्पा वढावकर, नरेंद्र पंडित, प्रशांत पाताडे, दीपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मींना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 
•    शाल, श्रीफळ आणि ११ हजार रुपये रोख रक्कम असे देण्यात येणाºया या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमासाठी उदयोन्मुख कलाकारांना या वेळी सादरीकरणाची संधी मंडळातर्फे देण्यात येणार आहे.


चित्रभूषण पुरस्कार (पुरुष विभाग) २०१५-२०१७:-
भालचंद्र कुलकर्णी - अभिनेता
विक्रम गोखले - अभिनेता/दिग्दर्शक
श्रीकांत धोंगडे - कला - प्रसिद्धी
किशोर मिस्कीन - निर्माता


चित्रभूषण पुरस्कार (स्त्री विभाग) २०१५-२०१७:-
लीला गांधी - अभिनेत्री / नृत्यांगना
सुषमा शिरोमणी - अभिनेत्री/ निर्माती

 

चित्रकर्मी पुरस्कार विजेते २०१५-२०१७:-
रमेश साळगांवकर - दिग्दर्शक
संजीव नाईक - संकलक / निर्माता/ दिग्दर्शक
विलास उजवणे - अभिनेता
आप्पा वढावकर - संगीत संयोजक
नरेंद्र पंडित - नृत्य दिग्दर्शक
प्रशांत पाताडे - ध्वनिरेखन
दीपक विरकूड + विलास रानडे - संकलक
विनय मांडके - गायक
जयवंत राऊत - छायाचित्रण
सतीश पुळेकर - अभिनेता
प्रेमाकिरण - अभिनेत्री / निर्माती
सविता मालपेकर - अभिनेत्री
चेतन दळवी - अभिनेता
अच्युत ठाकूर - संगीतकार
वसंत इंगळे - निर्मिती प्रबंधक /अभिनेता
 

राज्य सभेचे यंदाचे अधिवेशन सर्वात फलदायी गेल्या सतरा वर्षांतील एक चांगला आदर्श

•    राज्यसभेत २४९ व्या अधिवेशनात गेल्या सतरा वर्षांतील एक चांगला आदर्श निर्माण झाला असून विक्रमी ३२ विधेयके अल्पावधीत मंजूर झाली आहेत, असे मत राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
•    एकूण ३५ बैठकात ३२ विधेयके राज्यसभेत पावसाळी अधिवेशनात मंजूर झाली आहेत.
•    नायडू म्हणाले, की या अधिवेशनात माझा आशावाद खरा ठरला असून या बदलाची वाट देशातील लोक आतुरतेने पाहात होते. या
•    पूर्वीच्या काळात सभागृहाचे कामकाज सातत्याने विस्कळित केले गेले, त्यामुळे इतकी विधेयके कधी मंजूर झाली नव्हती. 
•    ३५ बैठकात एकूण ३२ विधेयके या अधिवेशनात मंजूर झाली आहेत. राज्यसभेच्या गेल्या ५२ सत्रातील सतरा वर्षांतला हा उच्चांक आहे.
•    राज्यसभेत या वेळी मुस्लीम महिला (विवाह हक्क संरक्षण) विधेयक  व त्यानंतर जम्मू काश्मीर फेररचना विधेयकही मंजूर झाले आहे. ही दोन्ही विधेयके मोठा सामाजिक व आर्थिक परिणाम घडवणारी आहेत.
•    संसदेचे कामकाज सुरळीत चालले तर काय घडू शकते याचा अनुभव आता लोकांनी घेतला आहे. गेल्या ४१ वर्षांतील हे पाचव्या क्रमांकाचे चांगले अधिवेशन ठरले आहे.  
•    गेल्या पाच अधिवेशनात ३३ विधेयके मंजूर झाली होती.
•    आताच्या अधिवेशनात उपलब्ध वेळेचा १०४.९२ टक्के वापर झाला. २०१४ पासूनच्या पाच वर्षांतील हे सर्वात उपयुक्त अधिवेशन ठरले आहे. 
•    गेल्या पाच अधिवेशनात  सभागृहाची कार्यक्षमता ही ७.४४ टक्क्य़ांवरून ६५.६० टक्के झाली आहे. असे असले तरी अडीच दिवस विरोधकांनी  गोंधळ केल्याने  १९ तास व १२ मिनिटे वाया गेली, पण सभागृहाने १९ दिवस जादा काम करून २८ तासांचे काम वाढवले आहे.


राज्यसभा अधिवेशन       मंजूर विधेयके
१९८४                         ३७
२००२                         ३५
२०१९                         ३२
 

8 August Current Affairs
8 August Current Affairs

पाकने वाघा सीमेवर समझौता एक्स्प्रेस थांबवली

•    काश्मीरशी संबंधित राज्यघटनेतील कलम ३७० हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर खवळलेल्या पाकिस्ताने समझौता एक्स्प्रेस वाघा सीमेवरच रोखली आहे. 

•    आज पाकिस्तानमधून समझौता एक्स्प्रेस भारतात येत होती, मात्र वाघा सीमेवर आल्यानंतर ती थांबवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. पाकच्या या निर्णयामुळे अनेक प्रवासी सीमेवरच अडकले आहेत. 
•    'आमचे गार्ड आणि ड्रायव्हर भारताच्या सीमेत प्रवेश करणार नाहीत', अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. भारतानेच आता त्यांचे गार्ड आणि ड्रायव्हर पाठवावेत, असे पाकिस्तानने सांगितले आहे. 
•    दरम्यान, भारताने आपले गार्ड आणि ड्रायव्हर पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.
•    पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर देखील पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस रोखली होती. त्यानंतर ४ मार्चला ती पुन्हा सुरू करण्यात आली. 
•    आता पाकने पुन्हा एकदा ही एक्स्प्रेस थांबण्याचा निर्णय घेतला आहे. पाकने सोमवारी भारताबरोबरचा व्यापारही बंद करण्याचा निर्णय घेतला असून राजनैतिक संबंधांमध्येही कपात केली आहे. 
•    पाककडून आदेश आल्यानंतर समझौता एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरने वाघा सीमेवर गाडी थांबवली आणि सुरक्षेच्या कारणामुळे ही गाडी अटारीला जाणार नाही असे जाहीर केले. 
•    गाडीच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही असे भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाने गाडीच्या ड्रायव्हरला कळवले. मात्र, पाकिस्तानकडून तसे आदेश आल्याखेरीज आपण गाडी पुढे नेणार नाही, अशी भूमिका ड्रायव्हरने घेतली. 
समझौता एक्स्प्रेस:-
•    समझौता एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस दिल्ली आणि अटारी ते पाकिस्तानातील लाहोरपर्यंत धावते. लाहोरहून ती सोमवार आणि गुरुवारी निघते. ही एक्स्प्रेस भारत-पाक दरम्यान झालेल्या शिमला करारानंतर २२ जुलै १९७६ या दिवशी सुरू करण्यात आली होती. पहिली ट्रेन अमृतसरहून निघाली होती. सुमारे ५२ किमीचे अंतर पार केल्यानंतर ती लाहोरला पोहोचली होती. 
 

महात्मा फुले जनआरोग्य योजना रुग्णालयांसाठीचे वैद्यकीय सेवादर वाढणार

•    महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील जवळपास १२०० वैद्यकीय उपचारांचे रुग्णालयांसाठी ठरवून दिलेले दर वाढण्याची शक्यता आहे. 
•    आयुष्मान आणि या योजना एकत्रित राज्यभरात राबविण्यात येणार असल्याने दरांत सुधारणा करण्यासाठी लवकरच राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत निविदा काढण्यात येणार आहेत.


महात्मा फुले जनआरोग्य योजना:-
•    महात्मा फुले जनआरोग्य योजना जुलै २०१२ पासून सुरू झाली. या योजनेअंतर्गत ९७१ वैद्यकीय सेवा दिल्या जातात. त्यावेळी या सेवांसाठी ठरविण्यात आलेले दर गेल्या सात वर्षांमध्ये एकदाही वाढविलेले नाहीत. 
•    त्यामुळे या योजना राबविणे परवडत नसल्याची तक्रार गेल्या काही वर्षांपासून खासगी रुग्णालये करत आहेत. यासाठी जनआरोग्य योजनेमार्फत दोन वेळा दरवाढीसाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र इतक्या कमी विम्याच्या हप्त्यांमध्ये कोणत्याही शासकीय विमा कंपन्या सहभागी होण्यास तयार नसल्याने हे दर वाढू शकलेले नाहीत. 
•    आता आयुष्मान योजनेसोबत जनआरोग्य योजनेचे एकत्रितरित्या राबविण्यात येत आहे. आयुष्मान योजनेतील सुमारे ९९ टक्के लाभार्थी हे जनआरोग्य योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामुळे या दोन्ही योजना एकत्रित राबविल्याने यासाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या निधीचा योजनेसाठी नक्कीच फायदा होत असल्याचे राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
•    महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विस्तारीकरण केले असून यामधील वापरात नसलेले उपचार वगळण्यात आले आहेत. त्याऐवजी रुग्णांसाठी गरजेचे असलेले गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण यासारख्या नव्या उपचारांचा समावेश केला आहे. सध्या या योजनेअंतर्गत जवळपास १२०० उपचार देण्यात येत आहेत. 
•    या योजनांचे दर वाढविण्याची प्रक्रिया सुरू असून विमा कंपन्यांसाठीच्या निविदा लवकरच काढल्या जातील. नव्या धोरणानुसार शासकीय विमा कंपन्यांसोबत आता खासगी विमा कंपन्यांनाही या निविदा भरता येणार आहेत.
•    त्यामुळे सुधारित दरानुसार योग्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. परिणामी रुग्णालयांचे दरही वाढणार असल्याने त्यांनाही या योजना राबविणे सोईस्कर जाईल, असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.
•    सध्या जनआरोग्य योजनेअंतर्गत डायलिसिससाठी ५०० ते ६०० रुपये रुग्णालयांना दिले जातात.
•    यामध्ये जवळपास दुपटीहून अधिक वाढ करत १११० ते १५०० पर्यत सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत.
•    तसेच अस्थिभंगासाठी १५ हजार ऐवजी आता २० हजार रुपये प्रस्तावित केले आहेत.
 

8 August Current Affairs
8 August Current Affairs

समालोचन अनंत सेटलवाड यांचे निधन

•    क्रिकेट हा इंग्रजांनी शोधलेला भारतीय खेळ असल्याचे गमतीने म्हटले जाते. क्रिकेट विश्वावर आज सर्वार्थाने भारताची सत्ता असली, तरी या सत्तास्थानापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यावश्यक असलेली खेळाविषयीची आसक्ती ही आजची नाही. 
•    गोऱ्या अंमलदारांनी या देशात क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून भारतीयांना क्रिकेटविषयी आकर्षण वाटू लागले होते. प्रत्येक दशकागणिक या आकर्षणात भरच पडत गेली. इंग्रज भारतातून निघून गेल्यानंतरही क्रिकेट या देशात राहिले आणि रुजले. 
•    साठ, सत्तर आणि ऐंशीच्या दशकात एकीकडे भारतीय क्रिकेट संघाची वाटचाल धिम्या गतीने होत असताना, रेडिओच्या माध्यमातून हा खेळ घराघरांत पोहोचवण्याचे श्रेय भारतातील जाणकार आणि रसिक समालोचकांनाही दिले पाहिजे. 


समालोचनाचा सुवर्णकाळ:-
•    भारतीय चित्रपट संगीताचा होता तसाच हा समालोचनाचाही सुवर्णकाळ होता. बॉबी तल्यारखान, डिकी रत्नागर, अनंत सेटलवाड, सुरेश सरय्या असे काही समालोचक त्या सुवर्णकाळाचे मानकरी होते. 


अनंत सेटलवाड:-
•    कालांतराने या मंडळींमध्ये विजय र्मचटही दाखल झाले. प्रत्येकाची शैली निराळी होती. यांतील अनंत सेटलवाड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने त्या देदीप्यमान परंपरेतील आणखी एक दुवा निखळला. हल्लीच्या कर्कश दूरचित्रवाणीच्या जमान्यात नेमक्या आणि मोजक्या शब्दांतील समालोचनाची कला जवळपास अस्तंगत झाली आहे. सेटलवाड यांना ती खासच अवगत होती. 
•    विख्यात इंग्रज समालोचक जॉन अरलॉट यांनी रेडिओ समालोचनात नवीन मानदंड निर्माण करताना काही युक्त्या सांगितल्या होत्या. समालोचकाने श्रवणचित्र उभे केले पाहिजे आणि श्रोत्यांना एका नवीन, अनाम विश्वाची सफर घडवली पाहिजे, असे ते सांगत. सेटलवाड यांच्यासाठी ते ब्रह्मवाक्य होते. त्यांच्या समालोचनात नाटय़मय असे काही नव्हते. समोर उलगडत जाणाऱ्या घटनांचे चित्र नेमक्या शब्दांमध्ये उभे करण्याची त्यांची खासियत होती. 
•    इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व आणि शब्दांचा खजिना अफाट. नामवंत वकील कुटुंबात जन्म आणि पब्लिक स्कूलमधील शिक्षणाचा तो एकत्रित परिणाम. अशा शब्दवंतांना कोणत्याही परिस्थितीचे मौखिक वर्णन करतानाही फार सायास पडत नाहीत.
•    सेटलवाड यांचे समालोचन एखाद्या शैलीदार फलंदाजाच्या फलंदाजीसारखे होते. धावा झटपट होत नाहीत किंवा षटकार-चौकारांची बरसातही झडत नाही. पण अशा फलंदाजाचे खेळपट्टीवरील अस्तित्वच सुखावणारे, रमवणारे असते. 
•    गोलंदाज चेंडू कसा टाकतो किंवा विशिष्ट फलंदाजाची उभी राहण्याची पद्धत कशी आहे या बाबी, गोलंदाजाने चेंडू फेकण्यासाठी धाव घेतल्यापासून तो प्रत्यक्ष चेंडू टाकेपर्यंत सेटलवाडांनी सांगितलेल्या असायच्या.
•    त्यांचा आवाज आश्वासक होता. त्या काळात अनेकदा भारतीय संघाचे घरच्या वा दूरच्या मैदानांवर पतन होत असताना, सेटलवाड यांच्या आवाजामुळे क्रिकेट चाहत्यांचा उद्वेग काही प्रमाणात कमी व्हायचा. 
•    एकदा एका सामन्यात वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू वेळकाढूपणा करत राहिले आणि हातातला सामना अनिर्णित राहिला. त्या वेळी सेटलवाड यांच्या सबुरीच्या सल्ल्यामुळेच मैदानातील प्रेक्षक शांत राहिले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली नाही.
 

कलम ३७० तात्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

•    जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. 
•    या याचिकेवर योग्य वेळी सुनावणी होईल, असं न्या. एन. व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितलं.
•    कील मनोहरलाल शर्मा यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. 
•    या याचिकेवर १२ किंवा १३ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. 
•    केंद्राने कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय अवैध आणि असंवैधानिक आहे, असं त्यांनी याचिकेत नमूद केलं होतं. याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. 
•    जम्मू-काश्मीरच्या मुद्द्याशी संबंधित अन्य याचिका काँग्रेस नेते तहसीन पूनावाला यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. जमावबंदी उठवण्यासह फोन, इंटरनेट, वृत्तवाहिन्या बंद करण्यासारखे घेतलेले निर्णय मागे घेण्यात यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. 
•    राज्यातील वास्तवाची माहिती करून घेण्यासाठी एका आयोगाची स्थापना करावी, तसंच ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती या नेत्यांची सुटका करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
 

8 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »