9 Oct Current Affairs

9 Oct Current Affairs
9 Oct Current Affairs

रसायनशास्त्रांतील संशोधनासाठी ३ शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर

 • रसायन विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली.
 • अमेरिकेचे शास्त्रज्ञ जॉन बी. गुडइनफ, ब्रिटनचे स्टॅनली व्हिटिंघम आणि जपानचे शास्त्रज्ञ अकिरा योशिनो या तीन शास्त्रज्ञांना लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 • स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सचे जनरल सेक्रेटरी अॅलान रॉयल यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. सोमवारी तीन अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रात भरीव कामगिरीसाठी नोबेल देण्यात आला आहे.
 • या पुरस्काराची घोषणा करताना रॉयल स्वीडिश अकादमीच ऑफ सायन्स यांनी म्हटले, कमी वजन, रिचार्ज करण्यासाठी पॉवरफुल बॅटरीचा वापर तसेच मोबाइल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी या बॅटरीचा वापर करण्यात येत आहे.
 • फिजिक्ससाठी नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. यावर्षी फिजिक्ससाठी तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे नोबेल पुरस्कार देण्यात आला. जेम्स पीबल्स यांना भौतिक ब्रम्हांड विज्ञानात सिद्धांत शोधण्यासाठी आणि मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोज यांना सौरमंडळावर आणखी एक ग्रह शोधण्यासाठी संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 • नोबेल समितीने या पुरस्काराबाबत म्हटले की, १९७० मधील तेल संकट हे लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनाचे मूळ आहे. तेव्हा व्हायटिंघम यांनी जीवाश्म इंधनमुक्त ऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र विकसित करण्याचे ध्येय ठेवले होते. या बॅटरीने आपल्या जीवनात क्रांती आणली आहे.
 • ९ लाख १८ हजार अमेरिकन डॉलर, एक गोल्ड मेडल असे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे स्वरुप आहे. १० डिसेंबर रोजी नॉर्वेतील स्टॉकहोम आणि ओस्लो येथे हे नोबेल पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

नोबेल पुरस्कारांची घोषणा अशी:-

 • सोमवारी, ७ ऑक्टोबर - वैद्यकशास्त
 • मंगळवार, ८ ऑक्टोबर - भौतिक शास्त्र
 • बुधवार, ९ ऑक्टोबर - रसायनशास्त्र
 • गुरुवार, १० ऑक्टोबर - साहित्य
 • शुक्रवार, ११ ऑक्टोबर - शांतता
 • सोमवार, १४ ऑक्टोबर - अर्थशास्त्र
 • खालील माहिती आपण आधी देखील पाहिली आहे

नोबेल पुरस्कार:-

 • नोबेल पुरस्कार विजेत्याला पदक, प्रशस्ती पत्र व साडे चार कोटी रुपये रोख
 • नोबेल पुरस्कार विजेत्या प्रत्येकाला जवळपास साडे चार कोटी रुपये रोख रुपये दिले जातात. तसेच २३ कॅरेट सोन्याचा २०० ग्रॅमचे पदक आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. पदक म्हणून नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचा फोटो असलेले सोन्याचे पदक दिले जाते. या पदकावर त्यांचा जन्म आणि मृत्यू अशी तारीख असते. तर पदकाच्या दुसऱ्या बाजुला युनानी देवी आयसिसचे चित्र, रॉयल अकादमी ऑफ सायन्स स्टॉकहोम पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीची माहिती दिलेली असते.
 • वैध्यकशास्त्रात आतापर्यंत १२ महिलांसह २१६ जणांना पुरस्कार:-
 • १९०१ ते २०१८ पर्यंत वैद्यकशास्त्रात आतापर्यंत १०९ पुरस्कार देण्यात आले आहे. एकूण २१६ विजेत्यांमध्ये १२ महिलांचा समावेश आहे. यात २००९ मध्ये एकाचवेळी दोन महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. इंसुलिनचा शोध लावणाऱ्या फ्रेडरिक जी. बँटिंग यांनी १९२३ साली अवघ्य ३२ व्या वर्षी हा पुरस्कार पटकावला होता. वैद्यशास्त्रात हा पुरस्कार मिळणारे ते एकमेव तरुण शास्त्रज्ञ आहेत. तर पेटोन राउस (वय ८७) सर्वात जास्त वयस्कर नोबेल पुरस्कार मिळवणारे ठरले आहेत. त्यांना ट्यूमर इंड्यूसिंग व्हायरसच्या शोधासाठी १९६६ साली हा पुरस्कार मिळाला होता.

आर्थिक विषमतेच्या बाबतीत भारत जगात अव्वल स्थानी

 • जगाच्या अर्थिक विषमता अहवालातून उत्पन्नाबाबत जागतिक स्तरावर भारताबाबत एक लाजीरवाणी बाब समोर आली आहे. गेल्या दशकांमध्ये जगातील उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाली त्यामुळे आर्थिक विषमताही निर्माण झाली असून २०१६ मध्ये जगाचे निम्म्यापेक्षा अधिक उत्पन्न हे एकूण लोकसंख्येच्या १० टक्के लोकांकडे गेल्याचे या अहवालातील आकडेवारी सांगते. यामध्ये आर्थिक विषमतेच्याबाबतीत भारत जगात अव्वल स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 • आर्थिक विषमतेच्या या ट्रेन्डनुसार, जगाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न दिसून येते. यामध्ये युरोपात सर्वाधिक आर्थिक समानता पहायला मिळते, कारण इथल्या लोकसंख्येच्या टॉपच्या १० टक्के लोकांकडे ३७ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. तर मध्य आशियात सर्वाधिक आर्थिक विषमता असून इथे लोकसंख्येतील टॉपच्या १० टक्के लोकांकडे ६१ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. फर्स्टपोस्टने याबाबत वृत्त दिले आहे.
 • यामध्ये भारतातील एकूण लोकसंख्येच्या टॉप १० टक्के लोकांकडे ५५ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. देशातील विविध भागातही उत्पन्नामध्ये विषमता दिसून येते. सन १९८० पासून उत्तर अमेरिका, चीन, भारत आणि रशिया या देशांनी वेगाने झालेली आर्थिक विषमता वाढ अनुभवली आहे. या काळात केवळ युरोपमध्येच सातत्याने आर्थिक वाढ झाली होती.
 • १९८० च्या काळात युरोप आणि युनायटेड स्टेट्स-कॅनडा रिजनमध्ये आर्थिक विषमतेची एकच पातळी होती. मात्र, आता यामध्ये बदल झाला आहे. १९८०च्या काळात या भागांमध्ये टॉपच्या १० टक्के लोकांकडे ३० टक्के उत्पन्नाचा वाटा होता. या आकडेवारीच्या तुलनेत २०१६ मध्ये युरोपमध्ये ही वाढ केवळ ३४ टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र, अमेरिकेत ती ४७ टक्क्यांवर जाऊन पोहोचली होती.
 • भारतात १९९१ मध्ये झालेल्या आर्थिक उदारीकरणानंतर देशात उच्च उत्पन्न वाढ दिसून आली होती. त्याचबरोबर आर्थिक विषमतेतही वाढ झाली होती. १९९० पर्यंत १ टक्के लोकांकडेच सर्वाधिक उत्पन्न होते. त्यानंतर २०१६ पर्यंत त्यात सातत्याने वाढ होत गेली.
9 Oct Current Affairs
9 Oct Current Affairs

चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार सीमा प्रश्नावर चर्चेची शक्यता

 • चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्या सीमा प्रश्नावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 • दरम्यान, सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि चीन या दोन्ही देशांनी हा प्रश्न संवादाच्या मार्गानं सोडवावा, असं मत चीनचे राजदूत सून वेईडोंग यांनी व्यक्त केलं. जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 • दरम्यान, जिनपिंग हे 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. या दौऱ्यादरम्यान दिपक्षीय संबंध वाढवण्यासोबतच व्यापाऱ्याच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात येणार आहे.
 • चेन्नईजवळील मामल्लापुरम येथे 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी ही बैठक पार पडणार आहे. तसंच यानंतर जिनपिंग हे 13 ऑक्टोबर रोजी नेपाळ दौऱ्यावर रवाना होणार असल्याचंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
 • यापूर्वीही भारत आणि चीनमध्ये कोणत्याही अजेंड्याशिवाय बैठक पार पडली होती. 27 आणि 28 एप्रिल 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचा दौरा केला होता. त्यावेळीही कोणताही अजेंडा ठरवून तो दौरा आयोजित करण्यात आला नव्हता. त्यावेळी डोकलामवरून भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण होतं.

दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब टाकला पण फुटला 2019 मध्ये

 • आतापर्यंत जागाने दोन महायुद्ध अनुभवली आहेत. 1914 ते 1918 या कालावधीत पहिलं महायुद्ध झालं होतं. तर 1939 ते 1945 या कालावधीत दुसरं महायुद्ध झालं. या महायुद्धाच्या जिवंत खुणा आजही युरोपमध्ये पहायला मिळतात. मंगळवारी अशीच एक घटना उघडकीस आली. दुसऱ्या महायुद्धात टाकण्यात आलेला बॉम्ब फुटला आणि त्यात दोन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
 • पोलंडची राजधानी वर्झावाच्या नजीक असलेल्या कुरनिया रासिबोर्सका येथील जंगलात एक जिवंत बॉम्ब सापडला. दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर पोलंडच्या लष्कराने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॉम्ब निकामी करण्याचं काम सुरू केलं.
 • परंतु त्याच दरम्यान त्या बॉम्बच्या झालेल्या स्फोटात दोन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रूग्णालायत दाखल करण्यात आल्याची माहिती पोलंडचे संरक्षण मंत्री मारिऊस ब्लास्जजाक यांनी दिली. स्थानिक माध्यमांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तो बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीतील असल्याचं म्हटलं जात आहे.
 • ज्या ठिकाणी हा बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती त्या ठिकाणी यापूर्वी काही शस्त्रे आणि बॉम्ब सापडले होतं. त्यानंतर ते एका ठिकाणी निकामी करण्यासाठी नेण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धात अन्य राष्ट्राकडून टाकण्यात आलेले बॉम्ब युरोपियन देशांमध्ये सापडतात.
9 Oct Current Affairs
9 Oct Current Affairs

सीरियातून सैन्य माघारी घेण्याच्या कृतीचे ट्रम्प यांच्याकडून समर्थन

 • सीरियाच्या उत्तरेकडील भागात तुर्कीच्या नियोजित कारवाईपूर्वी त्या भागातून सैन्य मागे घेण्याच्या आपल्या निर्णयाचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले आहे. अमेरिका म्हणजे पोलीस दल नाही आणि अमेरिका निरंतर युद्ध लढणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मात्र ट्रम्प यांचा हा निर्णय कुर्द यांच्याशी प्रतारणा करणारा असल्याची टीका रिपब्लिकनांनी केली आहे.
 • सीरियाच्या उत्तरेकडील सीमेवरून अमेरिकेचे सैन्य मागे घेण्यात येत असल्याची घोषणा व्हाइट हाऊसमधून करण्यात आल्यानंतर ट्रम्प यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा परिणाम कुर्द एकाकी पडण्यावर होणार आहे, कारण आयसिसविरुद्धच्या लढय़ात कुर्द हा अमेरिकेचा मुख्य घटक आहे.
 • सीरियातून अमेरिकेचे सैन्य मागे घेण्याच्या आपल्या निर्णयामुळे अमेरिका रोमांचित झाली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
 • आम्हाला आमचे सैन्य मागे घ्यावयाचे आहे, आता खूप वर्षे झाली आहेत, अनेक दशके लोटली आहेत, त्यामुळे आम्हाला आमचे सैन्य माघारी घ्यावयाचे आहे, या घोषणेवरच आपण निवडून आलो, आपले भाषण तपासून पाहा, आम्हाला या निरंतर युद्धातून सैन्य मागे घ्यावयाचे आहे, असे ट्रम्प यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वन डे दरम्यान मिताली राजचा अनोखा विक्रम

 • भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
 • दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी मिताली मैदानात उतरली.
 • या सामन्यादरम्यान मिताली राजने आपल्या वन-डे क्रिकेट कारकिर्दीची २० वर्ष पूर्ण केली आहेत. २६ जून १९९९ साली मिताली आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यात पदार्पण केलं होतं.
 • वडोदरा येखील मैदानात होणाऱ्या सामन्यात आफ्रिकेच्या महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय महिलांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकन महिलांचा डाव पुरता गडगडला.
9 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »