भारतमाला प्रकल्प

भारतमाला प्रकल्प
भारतमाला प्रकल्प

भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत 2022 सालापर्यंत 35000 किमीचे महामार्ग बांधले जाणार

#भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत 2022 सालापर्यंत 35000 किमीचे महामार्ग बांधले जाणार : राष्ट्रपती:-
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 20 जून 2019 रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांना संबोधित करत असताना त्यांनी अभिभाषणात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारने ठेवलेले उद्दिष्ट स्पष्ट केले.
‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत 2022 सालापर्यंत एकूण 35000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे बांधकाम किंवा त्यात सुधारणा केली जाणार, अशी त्यांनी घोषणा केली.
याव्यतिरिक्त, 'सागरमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत, किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये आणि बंदरांना जोडणार्‍या भागात उत्तम दर्जाचे पक्के रस्ते बांधण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. तसेच ‘उडे देश का आम नागरिक (UDAN)’ योजनेच्या अंतर्गत लहान गावांपर्यंत हवाई संपर्क प्रस्थापित करण्यासाठी योजनेचा विस्तार केला जात आहे.
भारतमाला प्रकल्प:-
भारतमाला प्रकल्प हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे. हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.
मालवाहतुकीच्या कार्यक्षम आणि वेगवान हालचालीसाठी सुलभ वाहतूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकल्पामधून विशेषकरून आर्थिक मार्गिका व वसाहती, सीमेवरील प्रदेश आणि दुर्गम भागांना दळणवळणाची व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »