#Bhavana Kant

#Bhavana Kant
#Bhavana Kant

#भावना कांत लढा मोहिमेसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या प्रथम महिला लष्करी पायलट

अलीकडेच एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भावना कांत ह्या मिग-२१ लढाऊ विमानावर दिवसाच्या मोहिमेसाठी पात्र होणाऱ्या प्रथम भारतीय महिला लष्करी पायलट बनल्या आहेत. त्यांना हि पात्रता मिग -21 बायसन विमानावरील लढाऊ पायलट म्हणून परिचालनात्मक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळाली आहे. 
याचा अर्थ म्हणजे दिवस ऑपरेशनसाठी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. भावना कांत या सध्या राजस्थानमधील नल येथे फ्रंटलाइन एअरबेसमध्ये तैनात आहेत. भावना यांनी बेंगळुरू येथील एमएस महाविद्यालायतून बीई इलेक्ट्रिकलची पदवी घेतली. त्या बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपूरमधील बाऊर गावच्या आहेत.
भावना यांच्याव्यतिरिक्त मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी या देखील फायटर पायलट बनल्या आहेत. भारतीय हवाई दलात सध्या ९४ महिला पायलट आहेत, पण त्या सुखोई, मिराज, जॅग्वॉर आणि मिग यासारखी युद्धविमाने उडवत नाहीत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »