लोकसभा अध्यक्षपदी 'ओम बिर्ला'

लोकसभा अध्यक्षपदी 'ओम बिर्ला'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळीही नेहमीप्रमाणेच एकदम चर्चेत नसलेला चेहरा समोर आणला आहे

17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून राजस्थानमधीलखासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ओम बिर्ला यांच्या पत्नी अमिता बिर्ला यांनी याबद्दल संसदीय कॅबिनेटचे आभारही मानले आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना, ओम बिर्ला यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल आम्ही मंत्रिमंडळाचे मनापासून धन्यवाद मानतो, असे अमिता यांनी म्हटले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळीही नेहमीप्रमाणेच एकदम चर्चेत नसलेला चेहरा समोर आणला आहे. कोटा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार बनलेल्या ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदाचा बहुमान देण्यात आल्याची माहिती आहे. आज दुपारी बिर्ला अधिकृतपणे लोकसभा अध्यक्षपदाची औपचारिकता पूर्ण करणार आहे. नुकतेच, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भेटीसाठी बिर्ला हे त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत. मात्र, बिर्ला यांच्या पत्नी अमिता यांनी ओम बिर्ला यांच्या निवडीबद्दल अभिमान आणि अत्यानंद असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच, त्याबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभारही मानले आहेत. दरम्यान, खासदार बनण्यापूर्वी बिर्ला हे तीनवेळी दक्षिण कोटा मतदारसंघातून आमदार बनले होते. तर, पर्यावरणप्रेमी नेता अशी बिर्ला यांची ओळख आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »