संसदरत्न पुरस्कार 2019:

संसदरत्न पुरस्कार 2019:

संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रत्येक वेळी उपस्थित राहून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या

# संसदरत्न पुरस्कार 2019:-

संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रत्येक वेळी उपस्थित राहून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या, संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात येते. 
यावर्षीदेखील संसदेत विशेष कामगिरी बजावणाऱ्या खासदारांना गौरवण्यात आले. 
पुरस्कारांचे वितरण चेन्नईच्या राजभवनात पार पडले. यावेळी महाराष्ट्राच्या सहा खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चेन्नईमधल्या राजभवनमध्ये संसदरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, राजीव सातव, श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, हीना गावित या लोकसभा खासदारांना आणि राज्यसभा खासदार असलेल्या रजनी पाटील यांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
धनंजय महाडिकांना सलग तिसऱ्या वर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
तामिळनाडूचे राज्यपाल भंवरलाल पुरोहीत पुरस्कार वितरण समारंभात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
पुरोहीत म्हणाले की, संसदेच्या दोन्ही सभागृहात देश आणि समाजहिताचे काम चालावे ही जनतेची अपेक्षा असते.  संसद सुरळीतपणे चालली तर लोकहिताचे अनेक महत्वाचे कायदे मंजूर होतात. त्यासाठी खासदारांनी संसदेत सक्रिय असणे आवश्यक असते. 
संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे लोकशाहीचा पाया आणखी बळकट करणे असा आहे.
संसदरत्न पुरस्करासाठीचे निकष:
संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पी. आर. एस. इंडिया, प्रोसेन्स प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि केंद्रीय संसदरत्न समिती या तीनही संस्था संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यमापन करते.
संसदेत केली जाणारी विविध मुद्द्यांची मांडणी, प्रश्न विचारणे, सभागृहातील चर्चांमधील सहभाग, खासगी विधयेक सादर करणे यांसह काही अधिक निकषांद्वारे संसदरत्न पुरस्कारासाठी खासदारांची नावे निश्चित केली जातात.
धनंजय महाडिकांची हॅटट्रिक:
कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना लागोपाठ तीन वर्षे संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संसदरत्न पुरस्कार मिळवण्याची हॅटट्रिक केल्यामुळे महाडिकांचे विशेष कौतुक करण्यात आले. महडिकांनी हा पुरस्कार कोल्हापूरच्या जनतेला समर्पित करत असल्याचे सांगितले.
नंदूरबारच्या हीना गावितांना चौथ्यांदा संसदरत्न
नंदूरबारच्या खासदार हीना गावित यांना यंदा चौथ्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा संसदरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील त्या एकमेव खासदार आहेत.

या घडामोडीवर खालील प्रमाणे प्रश्न बानू शकतो::

Q. प्रश्न:- महाराष्ट्रातून कोणत्या खासदाराला यंदा पुरस्कार मिळाला ?

संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने ग

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »