आसामात देशातल्या सर्वात दीर्घ 'बोगिबील' पुलाचे उद्घाटन:-

आसामात देशातल्या सर्वात दीर्घ 'बोगिबील' पुलाचे उद्घाटन:-

गुवाहाटी येथे ब्रह्मपुत्रा नदीवर देशामधील सर्वात दीर्घ ‘बोगिबील पूल’ (रेल-रोड ब्रिज) उभारण्यात आला आहे.

#आसामात देशातल्या सर्वात दीर्घ 'बोगिबील' पुलाचे उद्घाटन:-

गुवाहाटी येथे ब्रह्मपुत्रा नदीवर देशामधील सर्वात दीर्घ ‘बोगिबील पूल’ (रेल-रोड ब्रिज) उभारण्यात आला आहे.

बोगिबील पूल एकूण 4.94 किलोमीटर लांबीचा आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर हा पुल बांधण्यात आला आहे.

आशियातील हा दुसरा सर्वात दीर्घ पूल ठरला आहे.

हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडण्याचे काम करणार आहे.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी 1997 साली या बोगिबील पुलाचे भूमिपूजन केले होते.

त्यानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर 2002 साली या पुलाचे काम सुरू झाले.

चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे. युद्धप्रसंगात रणगाडे सुद्धा सहज या पूलावरुन जाऊ शकतात.

पायाभरणीनंतर तब्बल २१ वर्षांनी आज बोगीबील पूलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आसामच्या ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला हा भारतातील सर्वात लांब डबल डेकर पूल आहे. पाच किलोमीटरच्या या पूलावर रस्ते आणि रेल्वे मार्ग आहे.

बोगीबील पूलामुळे आसामचा दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील ढेमजी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. या पूलामुळे चार तासाचा वेळ वाचणार आहे. चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे. युद्धप्रसंगात रणगाडे सुद्धा सहज या पूलावरुन जाऊ शकतात अशी या पूलाची बांधणी करण्यात आली आहे.

१) बोगीबील पूलाची रचना स्वीडन आणि डेन्मार्कमधल्या पूलासारखी आहे. युरोपियन पूलाच्या धर्तीवर बोगीबील पूलाची बांधणी करण्यात आली आहे.

२) रेल्वे आणि रस्ते मार्ग असलेला आशियातील हा दुसरा सर्वात मोठा पूल आहे. १२० वर्ष या पुलाचे आयुष्य असेल.

३) या पूलाच्या लोअर डेकवर दोन लाईनचा रेल्वे ट्रॅक असेल आणि सर्वात वरच्या डेकवर तीन मार्गी रस्ता असेल. या पूलामुळे दिल्ली ते दिब्रुगड ट्रेन प्रवासाची वेळ तीन तासांनी कमी होणार आहे.

४) ४.९ किलोमीटर लांबीच्या या पूलासाठी ५,९०० कोटी रुपये खर्च आला आहे. आधी ४.३१ किलोमीटरच्या या पूलासाठी ३,२०० कोटी रुपयांचे बजेट होते.

५) २२ जानेवारी १९९७ रोजी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते या पूलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २१ एप्रिल २००२ रोजी या पूलाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.

६) चीनच्या सीमेजवळ असलेला हा पूल युद्ध प्रसंगात अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या पूलाची बांधणी इतकी भक्कम आहे की, यावरुन रणगाडे सुद्धा सहज जाऊ शकतात तसेच या पूलाच्या तिन्ही मार्गावर एअर फोर्सची लढाऊ विमाने सुद्धा उतरु शकतात.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »