अॅटवूड एव्हारिस्टो यांना बुकर

अॅटवूड एव्हारिस्टो यांना बुकर
अॅटवूड एव्हारिस्टो यांना बुकर

कॅनेडियन लेखिका मार्गारेट अॅटवूड आणि ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन एव्हारिस्टो या दोघींना २०१९ चे बुकर पारितोषिक जाहीर

 • कॅनेडियन लेखिका मार्गारेट अॅटवूड आणि ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन एव्हारिस्टो या दोघींना २०१९ चे 'बुकर' पारितोषिक जाहीर झाले आहे.
 • 'बुकर' जिंकणाऱ्या एव्हारिस्टो या पहिल्या कृष्णवर्णीय लेखिका आहेत.
 • यंदा पुस्तकांच्या शर्यतीत असलेल्या सहा पुस्तकांच्या अंतिम यादीत ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्या 'किशॉट' या पुस्तकाचाही समावेश होता.
 • याखेरीज नायजेरियन लेखक चिगोझी ओबिओमा, तुर्की कादंबरीकार एलिफ शफाक आणि अँग्लो-अमेरिकी लेखिका ल्यूसी एलमन यांची पुस्तके शर्यतीत होती.
 • 'बुकर' च्या निवड समितीच्या नियमानुसार हा पुरस्कार विभागून दिला जात नाही. मात्र, १९७४ आणि १९९२ नंतर यावर्षी (तीस-यांदा) हे पारितोषिक विभागून देण्यात आले आहे.
 • अॅटवूड यांच्या 'द टेस्टामेंट' आणि एव्हारिस्टो यांच्या 'गर्ल वुमन अदर' या दोन्ही पुस्तकांपैकी कोणत्याही एका पुस्तकाची निवड करणे अशक्य असल्याचे समितीने नमूद करून दोन्ही लेखिकांना विभागून हा पुरस्कार दिला. पुरस्कार मिळाल्यानंतर दोन्ही दिग्गज लेखिकांनी आनंद व्यक्त केला.
 • अॅटवूड म्हणाल्या, 'हा पुरस्कार मला मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. हा पुरस्कार मला एकटीला जाहीर झाला असता, तर थोडा संकोच झाला असता. मात्र, दोघींनाही पुरस्कार मिळतो आहे त्याचा विशेष आनंद आहे.' एव्हारिस्टो म्हणाल्या, 'ब्रिटनमध्ये वास्तव्य करणाऱ्या कृष्णवर्णीय लोकांचे भावविश्व मी कागदावर उतरवले नाही तर कोणीही हे काम करणार नाही. त्यामुळे मी हे काम केले. हा पुरस्कार अॅटवूड यांच्यासह मिळाल्यामुळे मी आनंदित झाली आहे.'

बुकर पुरस्काराचे स्वरूप:-

 • बुकर पुरस्काराची स्थापना ही १९६९ साली इंग्लंडमध्ये मेकॅनाल कंपनी द्वारे केली गेली. यामध्ये विजेत्याला ५०००० डॉलर इतकी रक्कम दिली जाते.

आपल्यासाठी असलेले काही महत्वाचे बुकर:-

 • पहिला बुकर हा १९६९ साली युनायटेड किंगडमचे पी. एच. न्यूबी यांना समथिंग टू रिप्लाय या पुस्तकासाठी दिला गेला होता.
 • अण्णा बर्न्सला तिची तिसरी कादंबरी, मिल्कमनला २०१८ च्या बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ती बक्षीस जिंकणारी पहिली उत्तर आयरिश लेखिका ठरली होती.
 • भारताच्या अरुंधती रॉय यांना १९९७ साली त्यांच्या ‘इंडिया द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स’ या पुस्तकासाठी बुकरने गौरवण्यात आले होते.(भारतीय )
 • २००६ साली किरण देसाई यांना ‘भारत द इनहैरिटैंस ऑफ लॉस’ या पुस्तकासाठी बुकर दिला गेला होता.(भारतीय )
 • २००८ साली अरविन्द अडिग यांना ‘द व्हाइट टाइगर’ या पुस्तकासाठी बुकर दिला गेला होता.(भारतीय)

जाणून घ्या बुकर बद्दल कधीही ना वाचलेली माहिती:-

 • १९६९ पासून इंग्रजी भाषेत सर्वोत्तम कथनसाहित्याला दिला जाणारा हा पुरस्कार लेखकाची हयातभरची सांपत्तिक चिंता मिटवून देतो. पुरस्कार मिळविल्यानंतरच्या काळात लेखकाने फार थोर लिहिले किंवा नाही, तरी उत्पन्नस्रोताचा झरा त्याला विविध मार्गानी उपलब्ध होतो. कॅनडामध्ये ‘गिलर’ आणि नायजेरियामध्ये ‘केन’ हे बुकरसमान पुरस्कार आहेत. अमेरिकेतील ‘नॅशनल बुक अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘पुलित्झर’ या दोन्ही पुरस्कारांचे विजेते जगभरात बुकर विजेत्यांइतकेच लोकप्रिय होतात. मात्र तरीही जगातील वृत्तप्रक्रियेत बुकरची नोंद ठसठशीत घेण्याच्या शिरस्त्यात आजवर बदल झालेला नाही.
 • बुकर पुरस्काराच्या रकमेहून अधिक सट्टेबाजी त्याचा विजेता कोण असेल यावर होत असते. त्यामुळे साहित्यिक आवड असलेला आणि नसलेला युरोपमधील बराच मोठा वर्ग सप्टेंबरमध्ये जाहीर झालेल्या लघुयादीनंतर (शॉर्ट लिस्ट) ढवळून निघतो.
 • पूर्वी ब्रिटन, आर्यलड, झिम्बाब्वे आणि राष्ट्रकुल देशांमधील वर्षभरात प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांना पुरस्कारांसाठी विचारात घेतले जाई. २०१३ सालापासून त्यात अमेरिकी लेखकांचा समावेश झाला आणि आता बऱ्याच अर्थानी हा पुरस्कार जागतिक झाला आहे. कारण इंग्रजी पुस्तकांच्या जागतिक बाजारपेठेवर शतकभरात अमेरिकी प्रभाव आहे. खूपविक्या (बेस्टसेलर) पुस्तक व्यवहाराची यथोचित जाहिरातबाजी करणारी यंत्रणा जगाच्या कानाकोपऱ्यात अमेरिकी पुस्तक पोहोचविते. मायाजालामुळे हा व्यवहार आणखी सुकर झाला.
 • एवढे सारे असतानाही बुकर पुरस्काराच्या लांबोडक्या यादीपासून ब्रिटनचा हा पुरस्कार व्यवहार कथात्म साहित्य अभ्यासकांसाठी महत्त्वाचा असतो.

कसे निवडले जातात बुकर विजेते:-

 • साधारण वाचक १० ते २० वर्षांत जितके कथन साहित्य वाचू शकत नाही, तेवढे (बक्कळ मानधन मिळत असले तरी) केवळ सात ते नऊ महिन्यांत वाचून पाच बुकर सदस्य पुस्तक निवडतात. हे पाच जण गोपनीयरीत्या दरमहा एकत्रित येऊन पुस्तकांचे विच्छेदन करतात. त्यातून कॅनडा, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोप खंडांतील प्रातिनिधिक नव्या-जुन्या लेखकांची नावे याद्यांमध्ये सरकत असतात. यातील निकषांमध्ये ‘वाचनीयता’ असते का, याबाबत अनेक वर्षांमध्ये वाद आहे. हा जसा ऑस्कर मिळविणाऱ्या चित्रपटाच्या आकलनाबाबत सर्वसमावेशकतेचा सापेक्ष मुद्दा असतो, त्याचप्रमाणे इथल्या पुस्तकांबाबतही ठरतो.
 • १८७४ साली जर्मनीचे मेंदूवैज्ञानिक कार्ल वेर्निक यांनी आपल्या मेंदूतील डाव्या कुंभखंडात (लेफ्ट टेम्पोरल लोब) मध्यसीता (सेंट्रल सल्कस) भागाच्या वर बाँका व हेशलस गायरी भागाच्या मागे कोणत्याही व्यक्तीचा ‘वाचनस्नायू’ असतो याचा शोध लावला.[आहे की नाही गंमत]
 • आपल्याला भाषा आणि शब्दाचे बोध या स्नायूद्वारे होत असतो. त्यामुळे हा स्नायू जितका सक्षम तितकी माणसे एकाग्रचित्ताने वाचू शकतात. अर्थातच बुकरच्या परीक्षकांना आपला हा वाचनस्नायू आठ ते नऊ महिने सलग अबाधित ठेवणे अत्यावश्यक असते. ‘फायनान्शियल टाइम्स’च्या फिक्शन एडिटर रोसी ब्लाऊ यांनी २०१० साली बुकर परीक्षक असताना १३८ पुस्तकांच्या वाचनाची गोष्टच एका निबंधातून आपल्या वृत्तपत्रात मांडली आहे. त्यांच्या वडिलांचे आजारपण-मृत्यू आणि मुलीचा जन्म या चक्रामध्ये वाचन व्यवहारातील अडचणींचा डोंगर त्यांनी पार केला. पुस्तकांबाबत सामूहिक निवडीची जटिल प्रक्रियाही त्यांनी नमूद केली आहे.
 • दुसरे एक सदस्य नॅटली हायन्स यांनी एका लेखात पहिल्या तीन महिन्यांत ५० पुस्तके आणि नंतर १०० दिवसांत १०० पुस्तके वाचल्याचे नमूद केले आहे. झोप आणि सारीच सत्रे पुस्तकमय बनल्याने जगण्यातले रोजचे व्यवहार विस्कळीत झाल्याचे अनेक सदस्यांनी जाहीरपणे स्पष्ट केले आहे. १५० पानांपासून ९०० पानांच्या पुस्तकांचा अतिरेकी फडशा पाडण्याच्या अवघड दिनक्रमांतून दरवर्षी जगाच्या अज्ञात प्रदेशातील लेखक  समोर आले आहेत.

बुकर-नकाराची कारणे:-

 • पण या अथक वाचन मेहनतीतून समोर येणारे लेखक आणि जागतिक पुस्तक व्यवहारात वाचकांवर चलती करणारे लेखक यांच्यामध्ये खूप मोठी तफावत पाहायला मिळते. खूपविक्या पुस्तकांचे लेखक हे बहुधा अमेरिकीच असतात आणि बुकरविजेती लंबीचौडी पुस्तके सहज उपलब्ध म्हणून खरेदी करून वाचण्याऐवजी फडताळातील शोभा म्हणून अनेक काळ तशीच राहतात, असा अनेकांचा अनुभव असेल. इथे एक नाव आवर्जून नमूद करावे लागेल ते निक हॉर्नबी या वाचकप्रिय ब्रिटिश लेखकाचे. या लेखकाला कधीही बुकर नामांकन मिळाले नाही, मात्र कोणत्याही बुकरविजेत्या पुस्तकाहून याचे दरएक पुस्तक दुपटी-तिपटीने जास्त विकले जाते. ‘हाय फिडेलिटी’ या त्याच्या पहिल्या कादंबरीवर अमेरिकेत चित्रपट झाला. त्यानंतर त्याच्या येणाऱ्या प्रत्येक कादंबऱ्या बेस्ट सेलर यादीमध्ये सरकत गेल्या. वाचनीयता, रंजकता या निकषांवर या कादंबऱ्या बुकर विजेत्यांहून सरस वाटू शकतील. पण हॉर्नबी आणि त्यासारख्या अनेक वाचकप्रिय लेखकांना खूपविके असल्याच्या गुणधर्मावरून बुकरने बाजूला सारले आहे.
 • मग या पट्टीचे वाचक असणाऱ्या निवड समितीने अथक मेहनतीतून वाचकाभिमुख किंवा ‘रीडर फ्रेण्डली’ असे काय दिले, असा प्रश्न पडू शकेल. १९६९ पासून ऐतिहासिक विषय असलेल्या कादंबऱ्यांचा वरचष्मा दिसतो.
 • मागच्या काही वर्षात जमैकाच्या मार्लन जेम्स याच्या ‘ए ब्रीफ हिस्टरी ऑफ सेव्हन किलिंग’ या कथनात्मक इतिहास असलेल्या पुस्तकाला पारितोषिक मिळाले. त्याआधीही ‘द नॅरो रोड टू डीप नॉर्थ’ या रिचर्ड फ्लॅनेगन या ऑस्ट्रेलियाच्या आणि एलेनॉर कॅटन हिच्या ‘द ल्युमिनिअर्स’ या तब्बल आठशे पानांच्या दीड शतकाचा न्यूझीलंडच्या एका विशिष्ट गोष्टीचा इतिहास मांडणाऱ्या कादंबऱ्यांना पारितोषिक मिळाले. दोन वेळा पारितोषिक मिळविणारी हिलरी मेंटेलदेखील इतिहासाशी खेळणारी लेखिका.
 • यादरम्यान, यान मार्टेलची ‘लाइफ ऑफ पाय’, डीबीसी पीएरची ‘व्हर्नन गॉड लिटिल’, हॉवर्ड जेकब्सनची ‘फिंकलर्स क्वेश्चन’, जुलिअन बार्न्‍सची ‘सेन्स ऑफ एंडिंग’ या तद्दन इतिहासबाहय़ कादंबऱ्या निवडल्या गेल्या.
 • १९९७ साली अरुंधती रॉय यांना ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’साठी पुरस्कार मिळाला. त्यानंतर अनिता देसाई, अरविंद अडीगा यांनी त्यावर नावे कोरली. झुंपा लाहिरी, संजीव सहोटा आणि अजून काही (केवळ) भारतीय नावे बुकर अंतिम यादीत असतात.
 • गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये ही पारितोषिके मिळविणारी किंवा त्यासाठी स्पर्धेत उरणारी पुस्तके भारतात फार आधीपासून उपलब्ध होत आहेत. बुकरविजेती पुस्तके ‘रस्ता पुस्तक बाजार यंत्रणे’त तातडीने हजर होतात. पुस्तकाच्या एकत्रित निवडीनंतर वेगळेपणाबाबत शंका घेता येणार नाही, असे विजेते दरवर्षी निवड समितीकडून निवडले जातात. या पुस्तकांच्या विजेत्यावर सट्टाबाजार चालतो अन् या सट्टेबाजाराचा परिणामही अंतिम क्षणी पुस्तकविजेत्याच्या नाव घोषणेवर ठरतो. उदा. हान्या यांगिहारा या अमेरिकी लेखिकेच्या कादंबरीवर सर्वाधिक सट्टा लागला गेला आणि नायजेरियाच्या ‘द फिशरमन’ या चिगोझी ओबिओमा लिखित पहिल्याच कादंबरीचा प्रचंड बोलबाला होता. अ‍ॅन टेलर आणि टॉम मॅकार्थी हे नामांकनात असलेले दिग्गज लेखक होते.
 • युरोपातील स्थलांतराचा प्रश्न टोकावर असताना संजीव सहोटा याची स्थलांतरावरीलच ‘इयर ऑफ द रनअवेज’ ही कादंबरी पारितोषिक मिळवेल असा कयास मांडला जात होता. पण प्रत्यक्षात निवड समितीने मार्लन जेम्स याच्या जराही चर्चेत नसलेल्या पुस्तकाला विजेते घोषित करून चकवा दिला.

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »