ब्राझिलला जाण्यासाठी आता व्हिसाची गरज नाही

ब्राझिलला जाण्यासाठी आता व्हिसाची गरज नाही
ब्राझिलला जाण्यासाठी आता व्हिसाची गरज नाही

ब्रिक्स मधील महत्त्वाचा देश महत्त्वाची बातमी

 • ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर जायर बोल्सोनारो यांनी भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.
 • ब्राझीलमधील पर्यटन वाढीसाठी ब्राझील सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
 • भारत आणि चीनच्या नागरिकांना ब्राझीलला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. दोन्ही देशांच्या दरम्यान पर्यटक आणि व्यापार संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
 • ब्राझीलने काही दिवसापूर्वीच अमेरिका, कॅनडा, जपान आणि ऑस्ट्रेलियातील नागरिकांना व्हिसाची गरज नसल्याचे जाहीर केले होते.
 • ब्राझीलमध्ये यावर्षी निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत जायर बोल्सोनारो हे राष्ट्रपती म्हणून निवडून आले होते.
 • निवडून आल्यानंतर त्यांनी आपले धोरण आधीच जाहीर केले होते. त्यांचे सरकार हे विकसनशील देशांतील नागरिकांसाठी व्हिसाची गरज नाही, असे ब्राझीलने स्पष्ट केले आहे.
 • दरम्यान, बोल्सानारो यांचा लवकरच बिझींग दौरा होणार असून या दौऱ्याआधी त्यांनी भारत-चीन मधील नागरिकांसाठी मोठी न्यूज दिली आहे.
 • ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका या देशांची ब्रीक्स परिषद ही ब्राझीलची राजधानी ब्रासीलिया या ठिकाणी १३ ते १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
 • या बैठकीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या बैठकीत मोदी आणि बोल्सोनारो यांच्यात अनेक मुद्द्यांवर समझौता करार होणार आहेत.
 • याआधी या दोन्ही नेत्यांत जूनमध्ये झालेल्या जी-२० च्या बैठकीत चर्चा झाली होती.

ब्राझील:-

 • ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात ३रा मोठा देश आहे.
 • ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
 • अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे.
 • जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.
 • भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीन व भारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.
 • ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील 'या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे.
 • ब्राझीलिया ही ब्राझील देशाची राजधानी आहे.

 

एक सोपा प्रश्न ब्राझील या देशातून कोणते वृत्त जाते? आपली भूगोलाची उजळणी.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »