देशात कर्करोगाचे रुग्ण तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले

देशात कर्करोगाचे रुग्ण तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले
देशात कर्करोगाचे रुग्ण तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले

राष्ट्रीय आरोग्य २०१९ अहवाल

 • जगभरात कर्करोगाच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दर वर्षी जवळपास दोन कोटी लोकांना कर्करोगाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
 • २०१७ ते २०१८ या एका वर्षात कर्करोगाचे रुग्ण ३०० टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वसामान्य कर्करोगासह तोंडाचा कर्करोग, छातीचा कर्करोग या कर्करोगाचा यात समावेश आहे.
 • भारतात कर्करोगाच्या रुग्णात वेगाने वाढ होत आहे.
 • याबाबतची आकडेवारी 'राष्ट्रीय आरोग्य २०१९' च्या अहवालावरून समोर आली आहे.
 • भारतात ३०० टक्क्यांनी वाढ झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांच्या माहितीची राज्यातील एनसीडी (नॉन कम्युनिकेबल डिसीज) क्लिनिक्समध्ये नोंद करण्यात आलेली आहे.
 • २०१८ मध्ये ६.५ कोटी पेशंट या क्लिनिकमध्ये पोहोचले होते. यातील १.६ लाख लोकांना कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तर २०१७ मध्ये या केसमध्ये ३९ हजार ६३५ केसची नोंद करण्यात आली होती.
 • दरम्यान, एनसीडी क्लिनिकमध्ये २०१७ ते २०१८ पर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या डबल झाली आहे. पूर्वी ही संख्या ३.५ कोटी इतकी होती. ती आता ६.६ कोटींपर्यंत पोहोचली आहे.

काय आहेत कारणे?:-

 • बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्यापिण्यासंबंधीच्या सवयी, तंबाखू आणि दारू यांचे सेवन करणे या कारणांमुळे कर्करोग असल्याचे समोर आले आहे.
 • २०१८ मध्ये सर्वांत जास्त कर्करोगाचे रुग्ण गुजरातमध्ये आढळले होते. त्यानंतर कर्नाटक व तिसऱ्या नंबरवर महाराष्ट्र होता.
 • यानंतर तेलंगण व पश्चिम बंगालचा नंबर आहे. 'अॅक्शन कॅन्सर हॉस्पिटल'चे वरिष्ठ डॉक्टर हरप्रीत सिंह यांनी सांगितले, 'तोंडाचा कॅन्सर हा तंबाखूचे सेवन अधिक केल्याने होतो.
 • मद्यसेवन (दारू) केल्याने हा धोका अधिक वाढतो. बसून असलेले काम, बदलती लाइफस्टाइल आणि वाढणारे वजन यामुळे कॅन्सरला बळ मिळत आहे.

कर्करोगाबद्दल सर्व माहिती व्हिजन स्टडीवर उपलब्ध आहे त्यासाठी DOWNLOAD>SCIENCE>कर्करोग वर क्लिक करा.

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »