चांद्रयान-२: 'या' फोटोत आणखी विवरांचं दर्शन

चांद्रयान-२: 'या' फोटोत आणखी विवरांचं दर्शन
चांद्रयान-२: 'या' फोटोत आणखी विवरांचं दर्शन

४ हजार ३७५ किलोमीटर अंतरावरून टिपले चांद्रयानाने चंद्राचे फोटो

 • महत्त्वाकांक्षी चांद्रमोहिमेवर निघालेलं भारताचं 'चांद्रयान-२' वेगाने चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत असून आता चंद्राच्या पृष्ठभागापासून ४ हजार ३७५ किलोमीटर अंतरावरून चांद्रयानाने चंद्राचे फोटो टिपले आहेत.
 • या फोटोमध्ये चंद्रावरील विविध विवरं स्पष्टपणे दिसत आहेत.
 • २३ ऑगस्ट रोजी हे फोटो टिपण्यात आले आहेत.
 • चांद्रयानाने टिपलेल्या ताज्या फोटोंमध्ये जॅक्सन, माच, मित्रा आणि कोरोलेव्ह ही विवरं दिसत आहेत.
 • यातील मित्रा या विवराचं नाव प्राध्यापक शिशीरकुमार मित्रा यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं.
 • जॅक्सन या विवराचा झूम करून काढलेला फोटोही प्रसिद्ध करण्यात आला असून या विवराचा व्यास ७१.३ किलोमीटर इतका असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
 • चांद्रयानाने २१ ऑगस्ट रोजी सर्वप्रथम चंद्राचा फोटो टिपला होता. या फोटोत अपोलो विवर दर्शविण्यात आले होते. त्याआधी ४ ऑगस्ट रोजी चांद्रयानाने पृथ्वीचा मनमोहक फोटो पाठवला होता.

विवर म्हणजे काय?

 • विवर म्हणजे खगोलीय वस्तू (उदा. पृथ्वी, इतर ग्रह व उपग्रह) चा पृष्ठभाग धसल्याने तयार झालेला खड्डा.
 • विवरांचा आकार बहुदा वर्तुळाकार असतो.

विवर निर्माण होण्यास खालील नैसर्गिक किंवा मानव निर्मित प्रक्रिया कारणीभूत असतात:-

 • उल्कापात - विश्वातील बहुतांश विवर हे उल्कापातामुळे तयार झाले आहेत. ह्यांना आघाती विवर म्हणतात.
 • ज्वालामुखी - पृथ्वीखेरीज चंद्र, शुक्र व मंगळावर या प्रकारचे विवर दिसून येतात.
 • भूगर्भात केलेले अणुस्फोट

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »