चेनानी नाशरी बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देणार

चेनानी नाशरी बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देणार
चेनानी नाशरी बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देणार

आशियातील सर्वात लांब बोगदा

  • केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चेनानी-नाशरी’ बोगद्यास जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. यावेळी गडकरी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग-४४ वर तयार करण्यात आलेला या बोगद्याला आता श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव दिले जाणार आहे.
  • ज्यांनी देशासाठी ‘एक निशान, एक विधान व एक प्रधान’ हा मंत्र दिला होता. (हे लक्षात ठेवा)
  • जम्मू – श्रीनगर महामार्गावरील रामबन जवळ असलेल्या चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २०१७ मध्ये झाले होते.
  • तर, या बोगद्याच्या निर्मिती कार्याची सुरूवात, २३ मे २०११ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती.
  • २०१७ मध्ये याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा राष्ट्राला अर्पण करण्यात आला होता.
  • तब्बल १ हजार २०० मीटर उंचीवर व साधारण ९.०२ किलोमीटर लांब असलेल्या या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर ४० किलोमीटरने कमी झाले आहे. म्हणजेच प्रवासाचा वेळ साधारण दोन तासांनी वाचत आहे.
  • दोन लेनचा हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जातो. हा बोगदा बांधण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागला.
  • खराब हवामान असताना जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद केला जातो. हा बोगदा मात्र कधीही बंद करावा लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
  • उधमपूर जिल्ह्यातील चेनानी येथे सुरू होऊन हा बोगदा रामबन जिल्ह्यातील नाशरी येथे बाहेर पडतो. या बोगद्याच्या निर्मितीसाठी एकूण १ हजार ५०० अभियंते, भूगर्भतज्ज्ञ आणि कामगारांनी मेहनत घेतली आहे.
  • तर, यासाठी एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये इतका खर्च आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बोगद्याची निर्मिती केली आहे.
  • बोगद्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सुमारे १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास कंट्रोल रूमकडून तत्काळ वाहतूक पोलिसांना त्यांची माहिती मिळते.
  • दोन लेनवर २९ क्रॉस पॅसेज देण्यात आले आहेत. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर एक पॅसेज आहे. याचबरोबर बोगद्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणूनही योग्य ती खबरदारी देखील घेण्यात आली आहे.
  • एवढेच नाहीतर आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास बोगद्यात वाहनतळाची देखील व्यवस्थाही करण्यात आली आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी:-

  • श्यामाप्रसाद मुखर्जी (जुलै ६, १९०१ - जून २३, १९५३) हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते.
  • ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात.
  • श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »