ख्रिस गेलचा विश्वचषकाला अलविदा

ख्रिस गेलचा विश्वचषकाला अलविदा
ख्रिस गेलचा विश्वचषकाला अलविदा

गेलचा विश्वचषकातील अखेरचा सामना

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाजल ख्रिस गेलचा विश्वचषकातील अखेरचा सामना होता. विश्वचषकातील आपला अखेरचा सामना जिंकण्याचे भाग्य गेलच्या नशिबी होते. सामना संपल्यावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी गेलला मिठी मारली. त्याचबरोबर विजयानंतर सामन्यातील चेंडू गेलला भेट देण्यात आला.
वेस्ट इंडिजने आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवत विश्वचषकाचा शेवट गोड केला. दुसरीकडे अफगाणिस्तानला मात्र गुणांचा भोपळा फोडता आला नाही. कारण अफगाणिस्तानला विश्वचषकात एकही विजय मिळवता आला नाही.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथण फलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या इव्हिन लुईस (58), शे होप (77) आणि निकोलस पुरन (58) यांनी अर्धशतक झळकावल्यामुळे त्यांना तिनशे धावांचा टप्पा गाठता आला. जेसन होल्डरने जलदगतीने 45 धावांची खेळी साकारल्यामुळे वेस्ट इंडिजला अफगाणिस्तानपुढे 312 धावांचे आव्हान ठेवता आले.
(या विश्वचषकाचे वैशिष्ठ्ये म्हणजे बरेच दिग्गज या वेळेस आपली शेवटची इनिंग खेळले आहेत. जसे की, रसित मलिंगा, शोएब मलिक इ. लक्षात असावे.)
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »