आकाशगंगेतील २८ नवीन ताऱ्यांचा शोध

आकाशगंगेतील २८ नवीन ताऱ्यांचा शोध
आकाशगंगेतील २८ नवीन ताऱ्यांचा शोध

अनिल पांडे यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले

आपल्या आकाशगंगेतील २८ नवे तारे येथील आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. या संस्थेचे संचालक वहाब उद्दीन यांनी सांगितले की, हे या ताऱ्यांची प्रकाशमानता सतत बदलत असते, हे संशोधन ही दुर्मिळ कामगिरी आहे. ग्लोब्युलर क्लस्टर एनजीसी ४१४७ मध्ये हे तारे सापडले असून कोमा बेरनायसेस तारकासमूहात ते आहेत.

संस्थेचे माजी संचालक अनिल पांडे यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले असून त्यांनी सांगितले की, ग्लोब्युलर क्लस्टरची रचना यातून उलगडणार आहे. नवीन ताऱ्यांशिवाय एनजीसी ४१४७ या क्लस्टरची रचनाही त्यात समजणार आहे. यात डॉ. स्नेहलता, डॉ. ए.के.पांडे यांनी एनजीसी ४१४७  ग्लोब्युलर क्लस्टरची फोटोमेट्रिक निरीक्षणे घेतली. त्यासाठी ३.६ मीटरच्या देवस्थळ प्रकाशीय दुर्बीणाचा वापर केला आहे.

ही दुर्बीण नैनीताल येथे २०१६ मध्ये बसवण्यात आली होती. अस्थिर तारे याचा अर्थ त्यांची प्रकाशमानता सतत बदलताना दिसते. यात ताऱ्याला ग्रहणाचा स्पर्ष किंवा ताऱ्यांचे आकुंचन प्रसरण यामुळे त्याची प्रकाशमानता कमी जास्त होते.  एनजीसी ४१४७ चा शोध ब्रिटिश खगोलवैज्ञानिक विल्यम हर्शेल यांनी १७८४ मध्ये लावला होता. हे क्लस्टर मोठे, प्रकाशमान आहे. आकाशगंगेतील एकूण क्लस्टर्सपैकी प्रकाशमानतेत ते ११२ व्या क्रमांकावर आहे, असे पांडे यांनी सांगितले.

ग्लोब्युलर क्लस्टर हा ताऱ्यांचा गोलाकृती संच असून तो आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे. ग्लोब्युलर क्लस्टर हे गुरुत्वाकर्षणाने बद्ध असतात. त्यामुळे त्यांना गोलाकार प्राप्त होतो. त्यांची तारकीय घनता जास्त असते. ही क्लस्टर्स आकाशगंगेच्या प्रभामंडळात असतात व त्यात जुने तारे असतात, पण त्यांचा आकाशगंगेच्या उत्क्रांतीतील भाग स्पष्ट झालेला नाही. हे संशोधन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये ऑगस्ट महिन्यात प्रकाशित होणार आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »