इंडिया अँड द नेदरलँड्स इन द एज ऑफ रीम्ब्रांत प्रदर्शनाचे उद्घाटन

इंडिया अँड द नेदरलँड्स इन द एज ऑफ रीम्ब्रांत प्रदर्शनाचे उद्घाटन
इंडिया अँड द नेदरलँड्स इन द एज ऑफ रीम्ब्रांत प्रदर्शनाचे उद्घाटन

भारतभेटीतील एक भाग

 • नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत, भारतभेटीतील एक भाग म्हणून, ‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ या प्रदर्शनाचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई इथे उद्घाटन करण्यात आले.
 • शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई व रिज्क्स म्युझियम, ॲमस्टरडॅम यांच्यातील हा एक संयुक्त उपक्रम आहे. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, प्रदर्शन दालनात दि. १७ ऑक्टोबर २०१९ ते १६ डिसेंबर २०१९ या कालावधीत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे.
 • शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक श्री. सब्यासाची मुखर्जी, माध्यम व विकास रिज्क्स म्युझियमचे संचालक, हेन्द्रीज क्रीबोल्दर व नेदरलँड्चे भारतीय राजदूत गिडो टीलमन यावेळी उपस्थित होते.
 • नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. त्यांच्या पाच दिवसीय भारत भेटीतील हा एक भाग होता.
 • भारत व नेदरलँड यांच्यातील भूतकालीन, वर्तमान व भविष्यकालीन मैत्रीचे प्रतीक म्हणून गेट वे ऑफ इंडियाला डच राष्ट्रीय रंग असलेल्या भगव्या दिव्यांनी प्रज्वलित करण्यात आले.
 • त्याचबरोबर डच राष्ट्रीय फूल- ट्युलिपने या परिसरात सजावट करण्यात आली. स्थानिक इतिहासकार सिमीन पटेल यांनी शाही दांपत्याला स्मारकाची माहिती दिली.

नेदरलँड्स:-

 • नेदरलँड्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. अ‍ॅमस्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.
 • नेदरलँड्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नॆदरलँड्समध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दोन प्रांतांत आहेत.
 • नेदरलँड्सच्या उत्तरेस व पश्चिमेस उत्तर समुद्र, दक्षिणेस बेल्जियम हा देश, व पूर्वेस जर्मनी हा देश आहे.  

मोठी शहरे:-

 • अ‍ॅम्स्टरडॅम:- अ‍ॅमस्टरडॅम (डच: Amsterdam; Nl-Amsterdam.ogg उच्चार ) ही नेदरलँड्स देशाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर हॉलंड ह्या प्रांतात वसलेले अ‍ॅमस्टरडॅम शहर उत्तर समुद्राशी एका २५ किमी लांबीच्या कृत्रिम कालव्याद्वारे जोडले गेले आहे.
 • रॉटरडॅम
 • हेग
 • उट्रेख्त
 • आइंडहोवन

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »