हा विक्रम करणारी एलिस पेरी पहिली क्रिकेटपटू

हा विक्रम करणारी एलिस पेरी पहिली क्रिकेटपटू
हा विक्रम करणारी एलिस पेरी पहिली क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी हिने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद केली आहे. तिने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार धावा आणि १०० विकेट घेण्याची किमया केली आहे.

अशी कामगिरी करणारी एलिस ही पुरुष आणि महिला क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच खेळाडू ठरली आहे.

रविवारी इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तिने विक्रमाला गवसणी घातली.

सध्या इंग्लंड आणि ऑस्टेलिया महिला क्रिकेट संघांदरम्यान तीन सामन्यांची टी-२० क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियात रंगली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० ने आघाडी घेतली आहे. रविवारी झालेल्या मालिकेतील दुस-या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरी हिने अनोख्या विक्रमाची नोंद केली.

तिने या सामन्यात ४७ धावांची विजयी खेळी करून टी-२० क्रिकेट प्रकारात १ हजार धावा पूर्ण केल्या. या कामगीरीबरोबरच तिने टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार धावा व १०० विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. असा विक्रम करणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

पेरी हिने नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड टी-२० च्या अंतिम फेरीत साइवर हिला बाद करून १०० विकेट्सचा टप्पा ओलांडला होता. तर, रविवारी इंग्लंड विरुद्ध ४७ धावांची खेळी करताना तिने १ हजार धावा पूर्ण केल्या. वनडे क्रिकेटबरोबरच आता टी-२० क्रिकेटमध्येही पेरीच्या खेळाचा आलेख उंचावत आहे. 

पुरुष क्रिकेटपटूंनाही टी-२० मध्ये १ हजार धाव व १०० विकेट्स अशी दुहेरी कामगीरी करता आलेली नाही.

पेरीच्या मागे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आहे. त्याने टी-२० प्रकारात १ हजार ४१६ धावा व ९८ विकेट्स घेतल्या आहेत.

तर तिस-या स्थानी बांगलादेशचा अष्टपैलू शाकीब हसन आहे. त्याने टी-२० प्रकारात १ हजार ४७१ धावा व ८८ विकेट्स मिळविल्या आहेत. 
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »