माजी कायदामंत्री ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन

माजी कायदामंत्री ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन
माजी कायदामंत्री ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन

वयाच्या १८ व्या वर्षी बनले वकील

 • माजी कायदामंत्री,ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. 
 • गेल्या दोन आठवड्यापासून ते आजारी होते. देशातील सर्वोत्कृष्ट विधीज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे. जेठमलानी यांनी 'बार काउंसिल ऑफ इंडिया'चे अध्यक्षपदही भूषविले होते.
 • राम जेठमलानी यांच्या मागे पुत्र आणि प्रसिद्ध वकील महेश जेठमलानी, आणि अमेरिकेत राहणारी मुलगी असा परिवार आहे. त्यांची दुसरी कन्या राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे.
 • जेठमलानी यांची तब्येत खालावल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

वयाच्या १८ व्या वर्षी बनले वकील:-

 • जेठमलानी यांचा ब्रिटिश राजवटीतील सिंध प्रांतातील शिकारपूर येथे १४ सप्टेंबर १९२३ या दिवशी जन्म झाला. ते वयाच्या १८ व्या वर्षी वकील बनले. 
 • शाळेत शिकत असताना बढती मिळवत वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण केले. त्या काळात सर्वसाधारणपणे लोक वयाच्या २१ व्या वर्षी वकील बनत असत. मात्र जेठमलानी यांनी ही कमाल १८ व्या वर्षीच करून दाखवली. ही माहिती स्वत: जेठमलानी यांनी सन २००२ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली होती.
 • जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या बॉम्बे प्रातांतील सिंध विभागात १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता. वयाच्या १७व्या वर्षी जेठमलानी यांनी एलएल.बीची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली.
 • फाळणी होईपर्यंत जेठमलानी यांनी गावातच वकिली केली. फाळणीनंतर त्यांनी मुंबईत वकिलीला सुरूवात केली.

अफझल गुरूच्या फाशीचा केला बचाव:-

 • जेठमलानी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्ये प्रकरणी बचाव पक्षाचे वकील या नात्याने मद्रास हायकोर्टात सन २०११ मध्ये लढवले होते. 
 • तसेच त्यांनी शेअर बाजार घोटाळाप्रकरणी हर्षद मेहता याची बाजू लढवली होती. 
 • संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरुच्या फाशीच्या प्रकरणातही हे बचाव करत होते. 
 • बहुचर्चित जेसिकालाल हत्याकांड प्रकरणातही त्यांनी मनु शर्माची बाजू लढवली होती.

वाजपेयींविरुद्ध लढवली होती निवडणूक:-

 • सन २०१० मध्ये जेठमलानी यांनी सुप्रिम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती. 
 • सहाव्या आणि सातव्या लोकसभेत ते भाजपच्या तिकिटावर मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय कायदामंत्री आणि नगरविकास विभागाचे मंत्रिपद भूषविले होते. 
 • सन २००४ मध्ये त्यांनी लखनऊमधून अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
 • राम जेठमलानी यांनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी ते चारा घोटाळा प्रकरणातील आरोपी लालूप्रसाद यादव यांच्या खटले लढवले होते. 
 • याबरोबरच त्यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफझल गुरू, तसेच सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी अमित शहा यांचे खटलेही लढवले आहेत.

त्यांच्या चरित्राचे नाव : दि रिबेल हे आहे. हे चरित्र सुसान अ‍ॅडेलमन यांनी लिहिली आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »