मराठमोळे सतीश खंदारे लडाखचे पहिले पोलीस प्रमुख

मराठमोळे सतीश खंदारे लडाखचे पहिले पोलीस प्रमुख
मराठमोळे सतीश खंदारे लडाखचे पहिले पोलीस प्रमुख

११९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी

 • केंद्रशासित प्रदेश म्हणून ३१ ऑक्टोबर पासून अस्तित्वात आलेल्या लडाखच्या पोलीस प्रमुखपदी सतीश खंदारे यांची नियुक्ती झाली आहे.
 • अमरावतीच्या धामणगावचे सूपुत्र असलेले खंदारे हे या नियुक्तीमुळे लडाखचे पहिले पोलीस प्रमुख ठरले आहेत.
 • ते ११९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
 • लडाखच्या पोलीस प्रमुखपदी पहिली मराठी व्यक्ती नियुक्त झाल्याने महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 • केंद्रशासनाने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण केले.
 • ३१ ऑक्टोबर पासून हे दोन्ही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे खंदारे यांची लडाखच्या पोलीस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठमोळे सतीश खंदारे:-

 • सन १९९५ मध्ये भारतातून ४२५ वी रँक घेऊन आयपीएस झालेले सतीश श्रीराम खंदारे यांनी धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयातून इयत्ता दहावीची परीक्षा सन १९८६ मध्ये ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली.
 • त्यानंतर धामणगाव शहरातील सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून ते बारावी उत्तीर्ण झाले.
 • पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन ते १९९२ मध्ये बीई झाले. त्यानंतर १९९५ मध्ये ते आयपीएस बनले.
 • आयपीएस अधिकारी खंदारे हे प्रथम जम्मू काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला.
 • २००५ मध्ये हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक, २००७ मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, नवी मुंबई भागातील खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या विभागात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून सेवा दिली.
 • त्यानंतर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये दाखल होऊन दोन वर्षे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला.

लडाख:-

 • लडाख हा ३१ ऑक्टोबर भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. लडाखच्या पूर्वेस तिबेट,दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस काश्मीर, जम्मू व बलुचिस्तान प्रदेश आणि उत्तरेस काराकोरम खिंड आहे.
 • हे काराकोरममधील सियाचीन ग्लेशियरपासून दक्षिणेस मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरलेले आहे.
 • पूर्वी लडाखला अतिशय महत्त्वपूर्ण व्यापार मार्गांच्या हमरस्त्यावर जागेचे प्राप्त झाले होते. परंतु चिनी अधिका-यांनी 1960 च्या दशकात तिबेट आणि मध्य आशियासह सीमा बंद केल्यामुळे पर्यटन वगळता आंतरराष्ट्रीय व्यापार कमी झाला.
 • 1974 पासून, भारत सरकारने लडाखमधील पर्यटनास यशस्वीरित्या प्रोत्साहित केले.
 • अक्साई चीन हा चीन आणि भारत यांच्यातील विवादित सीमा क्षेत्रांपैकी एक आहे.
 • लडाखमधील सर्वात मोठे शहर लेह हे असून त्यानंतर कारगिल आहे.
 • सध्या लडाख मध्ये लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे आहेत.
 • या प्रदेशातील मुख्य धार्मिक गट म्हणजे मुस्लिम (मुख्यत: शिया) (46%), तिबेट बौद्ध (40%), हिंदू (१२%) आणि शीख (२%). लडाख हा भारतातील विखुरलेल्या प्रदेशांपैकी एक आहे आणि त्याची संस्कृती आणि इतिहास तिबेटशी संबंधित आहे.
 • लडाख हे पर्वतीय सौंदर्य आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »