गगनयान मध्ये महिला अंतराळवीर नाही

गगनयान मध्ये महिला अंतराळवीर नाही
गगनयान मध्ये महिला अंतराळवीर नाही

चांद्रयान २ तिसऱ्या कक्षेत

  • गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळमोहिमेत महिला अंतराळवीराचा समावेश नसेल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी स्पष्ट केले.
  • या मोहिमेसाठी इस्रो लष्करातील वैमानिकांना प्रशिक्षण देणार आहे आणि सध्यातरी कोणत्याही दलामध्ये त्या श्रेणीतील महिला वैमानिक नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले. 
  • या मोहिमेसाठी संभाव्य अंतराळवीरांची निवड प्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण होईल.
  • निवड झालेल्या वैमानिकांना नोव्हेंबरमध्ये रशियात प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल.
  • गगनयान मोहिमेसाठी भारताने रशियाबरोबरच फ्रान्सशीही सहकार्याचा करार केला आहे. 
  • सन २०२२मध्ये गगनयानाचे पहिले उड्डाण होणार असून, तीन अंतराळवीर या यानात असतील.
  • पहिल्या उड्डाणात महिला अंतराळवीर नसली तरी भविष्यातील उड्डाणांमध्ये सामन्य लोकांचा समावेश केला जाणार असून, त्यांच्यात महिलाही असतील, असे इस्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

चांद्रयान-२ तिसऱ्या कक्षेत:-

  • 'चांद्रयान-२'ने बुधवारी आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला.
  • या यानाने चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला असून, नियोजित वेळेनुसार सकाळी ९ वाजून ०४ मिनिटांनी यान या कक्षेत पोहोचले. श्रीहरिकोटातून २२ जुलैला हे यान अवकाशात झेपावले होते.
  • ७ सप्टेंबर रोजी सकाळी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »