भारताच्या विकासदराचा अंदाज खालावला

भारताच्या विकासदराचा अंदाज खालावला
भारताच्या विकासदराचा अंदाज खालावला

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ०.३ टक्क्य़ांची कपात

भारताचा आर्थिक विकासदराचा २०१९ व २०२० या वर्षांतील अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ०.३ टक्क्य़ांनी कमी केला आहे. आता दोन्ही वर्षांचा आर्थिक विकासदर अनुक्रमे ७ व ७.२ टक्के राहील, असा सुधारित अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सुधारित अंदाजाचा विचार केला तरी भारत ही वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार असून ती चीनच्या पुढे राहील, असे सांगण्यात आले आहे.

भारतासोबत चीनच्या आर्थिक विकासदराबाबतही नाणेनिधीने भाष्य केले आहे. चीनला अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा फटका बसणार असून त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आधीच ताण आलेला आहे. त्यामुळे रचनात्मक सुधारणांना खीळ बसली असून कर्जावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांना नियंत्रणांची गरज आहे. बाहेरच्या धक्क्य़ातून सावरण्यासाठी काही धोरणात्मक उपाययोजना चीनने केल्या असल्या तरी चीनचा आर्थिक वाढीचा दर २०१९ मध्ये ६.२ टक्के आणि २०२० मध्ये ६ टक्के राहील. चीनचा विकास दराचा अंदाज ०.१ टक्क्य़ांनी कमी करण्यात आला आहे.

चिलीची राजधानी सँटियागो येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले, की नाणेनिधीने जागतिक आर्थिक वाढीचा अंदाजही कमी केला असून जागतिक आर्थिक विकास दर २०१९ मध्ये ३.२ टक्के, तर २०२० मध्ये ३.५ टक्के राहणार आहे. यात ०.१ टक्के कपात करण्यात आली आहे,याआधी एप्रिलमध्ये नाणेनिधीने अंदाज दिले होते. अमेरिका- चीन यांच्यातील व्यापार युद्धाने जागतिक आर्थिक विकास दर २०२० मध्ये ०.५ टक्क्य़ांनी कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कारण काय?

आर्थिक विकासदराबाबत नाणेनिधीने आधी व्यक्त केलेल्या अंदाजात ०.३ टक्के कपात  केली आहे . भारताचा आर्थिक विकास दर २०१९ मध्ये ७ टक्के राहील, तर २०२० मध्ये तो ७.२ टक्के असेल. देशांतर्गत मागणी कमी असल्याने आर्थिक विकास दर कमी दाखवण्यात आला आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »