रशिया भारत १५ करार

रशिया भारत १५ करार
रशिया भारत १५ करार

ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम अधिवेशनासाठी पंतप्रधान रशिया येथे

 • भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षणविषयक सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकीत रशियाच्या संरक्षण सामग्रीसाठी भारतीय बनावटीचे सुटे भाग वापरण्याचा निर्णय बुधवारी दोन्ही देशांनी घेतला; तसेच रशिया या उत्पादनांसाठीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यातील चर्चेवेळी हा निर्णय घेण्यात आला. 
 • पौर्वात्य आर्थिक मंचाच्या (ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम) अधिवेशनासाठी पंतप्रधान येथे आले आहेत. हे अधिवेशन VLADIVOSTOK येथे पार पडले.

 

 • 'संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याविषयी दोन्ही देशांनी कटिबद्धता व्यक्त केली. त्याचाच भाग म्हणून संयुक्तपणे लष्करी साधनसामग्रीचे उत्पादन करणे, सुटे भाग आणि घटकांचे उत्पादन करणे आणि विक्री पश्चात यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निश्चित करण्यात आले. 
 • सध्याही या प्रकारची भागीदारी सुरू आहे. मात्र तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत रशियन बनावटीची शस्त्रास्त्रे आणि संरक्षणविषयक इतर सामग्रीचे तंत्रज्ञान हस्तांतरही भारताला केले जाणार आहे,' असे दोन्ही देशांनी काढलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
 • संरक्षण क्षेत्रात रशिया गेली पन्नास वर्षे भारताचा विश्वासू भागीदार राहिला आहे, असे गौरवोद्गार पुतीन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत काढले. 
 • पुढील वर्षीच्या व्हिक्टरी डे सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मॉस्कोला भेट देण्याचे निमंत्रणही पुतीन यांनी मोदींना दिले. 
 • भारताने रशियाकडे १४.५ अब्ज डॉलरच्या शस्त्रास्त्रे आणि संरक्षणविषयक इतर सामग्रीची मागणी नोंदवली आहे. 
 • गेल्या वर्षी रशियाची एस-४०० क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेने भारतावर मोठा दबाव आणला होता. तरीही तो व्यवहार पार पडला. 
 • तसेच, काही छोट्या युद्धनौका (फ्रिगेट), दारूगोळा, तसेच इग्ला-एस ही चल हवाई यंत्रणा भारत रशियाकडून खरेदी करणार आहे, अशी माहिती रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी टेक्निकल को ऑपरेशनचे प्रमुख दिमित्री शुग्यायेव्ह यांनी दिली.

काश्मीरप्रश्नी भारताची भूमिका समजावली:-

 • 'काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याबाबत भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष पुतीन यांना समजावून सांगितली. 
 • उभय नेत्यांतील चर्चेदरम्यान मोदी यांनी स्वत: पुढाकार घेत काश्मीरचा विषय उपस्थित केला. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशियाने भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पुतीन यांचे आभारही मानले.
 • पाकिस्तान भारताविरोधात सातत्याने खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार करीत असल्याचेही मोदी यांनी पुतीन यांना सांगितले. 

'एके-२०३मुळे नवी उंची':-

 • एके-२०३ रायफलींचे उत्पादन भारतात संयुक्तपणे करण्यामुळे दोन्ही देशांतील संबंध नवी उंची गाठतील, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. 
 • भारत हा रशियाचा महत्त्वाचा सहकारी देश आहे, अशा शब्दांत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी द्विपक्षीय भागीदारीचा गौरव केला. 
 • उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील कोरवा येथे इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने एके-२०३ रायफलींचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. 
 • भारतीय दारूगोळा कारखाना मंडळ (ओएफबी) आणि रोसनबर्न एक्स्पोर्ट्स आणि कन्सर्न कलाश्निकोव्ह यांचा हा संयुक्त भागीदारीतील प्रकल्प आहे. याबाबतचा करार फेब्रुवारीत करण्यात आला होता.

दोन्ही देशांत १५ करार:-

 • दोन्ही देशांत १५ करार करण्यात आले. त्यात लष्करी साह्य, दळणवळण, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, सागरी वाहतूक आदी क्षेत्रांचा समावेश
 • सन २०२५ पर्यंत द्विपक्षीय व्यापार ११ अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट
 • कुडनकुलम येथील उर्वरित चार अणुभट्ट्या उभारणीला गती देणार
 • गगनयान मोहिमेतील भारतीय अंतराळवीरांना रशिया प्रशिक्षण देणार
 • दहशतवादाबाबत दुटप्पी भूमिका अमान्य करणे
 • अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य राहावे, यासाठी पाठिंबा देणे

रशिया:-

 • रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. 
 • क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. 
 • पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. 
 • मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. 
 • रूबल हे रशियाचे चलन आहे. 
 • ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. 
 • दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.

गृहपाठ : रशियाच्या नकाशात VLADIVOSTOK शोधा.

 

प्रश्न:- रशियाबरोबर भूसीमा शेअर करणारे योग्य देश ओळखा.
१ उत्तर कोरिया, चीन , नॉर्वे, फिनलंड, स्वीडन, कझाकिस्तान, मंगोलिया
२ फिनलंड, चीन , नॉर्वे, तुर्की,  मंगोलिया, बेलारूस, उत्तर कोरिया
३ नॉर्वे, मंगोलिया, बेलारूस,  उत्तर कोरिया, उझबेगिस्तान, दक्षिण कोरिया 
४ उत्तर कोरिया, चीन, नॉर्वे, फिनलंड, कझाकिस्तान, मंगोलिया, बेलारूस  

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »