भारत 2022 साली इंटरपोल महासभेचे आयोजन करणार

भारत 2022 साली इंटरपोल महासभेचे आयोजन करणार
भारत 2022 साली इंटरपोल महासभेचे आयोजन करणार

91 व्या महासभेचा आयोजक म्हणून भारताची निवड

 • सन 2022 मध्ये ‘इंटरपोल’ या संस्थेच्या 91 व्या महासभेचा आयोजक म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
 • भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक ऋषी कुमार शुक्ला यांनी भारताकडून याबाबत प्रस्ताव मांडला होता आणि प्रचंड बहुमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
 • १९९७ नंतर जवळपास २५ वर्षानंतर भारताला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटनेच्या (इंटरपोल) जनरल असेंब्लीचे आयोजन करण्याची संधी एनडीआयला मिळणार आहे.

इंटरपोल बाबत:-

 • आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL) ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस सहयोग संघटना आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे कार्य इंटरपोल करते. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्सच्या ल्योन या शहरात असून इतर 187 कार्यालये जगभरात आहेत.
 • इंटरपोल ही 194 सदस्य-देश असलेली आंतरराष्ट्रीय संस्था असून पोलीस क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याचा संस्थेला 100 वर्षांचा अनुभव आहे.
 • उद्देश:- जागतिक पातळीवरील गुन्हे नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिसांमध्ये समन्वय साधणे.
 • १९२३ मध्ये झाली सुरुवात ही संघटना प्रामुख्याने सुरक्षा, दहशतवाद, संगठीत गुन्हेगारी, मानवता-विरोधी गुन्हे, पर्यावरण-विषयक गुन्हे, युद्ध-विषयक गुन्हे, शस्त्रास्त्र तस्करी, मानव तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, संगणक-विषयक गुन्हे यावर काम करते.

'इंटरपोल' एका दृष्टिक्षेपात:-

 • १९४ सदस्य देश
 • १६० भारतीय मोस्ट वाँटेड
 • ६५० इंटरपोलच्या यादीत भारतीयायंचा समावेश
 • ९४२ कोटी रुपये वार्षिक बजेट
 • १९४९ भारताने घेतले सदस्यत्व

[व्हिजन स्टडीवर इंटरपोल संदर्भात सर्व महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे]

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »