राज्यातील ११ पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक

राज्यातील ११ पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक
राज्यातील ११ पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक

देशातील ९६ तपास अधिकाऱ्यांचा गौरव

उत्कृष्ट तपास व शोधकार्यासाठी देण्यात येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री पदकाने देशातील ९६ तपास अधिकाऱ्यांचा गौरव झाला असून त्यात महाराष्ट्रातील ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गुन्हे तपासातील कौशल्याचा सन्मान व्हावा व तपासाचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्यावर्षीपासून या पदकांची सुरुवात करण्यात आली आहे. 

केंद्रीय गृहमंत्री पदकविजेत्यांमध्ये सीबीआयचे १५ तपास अधिकारी, महाराष्ट्र पोलीस दलातील ११ अधिकारी, उत्तर प्रदेश पोलीस दलातील १० अधिकारी, केरळ पोलीस दलातील ९ अधिकारी, मध्य प्रदेश पोलीस दलातील ८ अधिकारी, दिल्ली व कर्नाटक पोलीस दलातील ६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात १३ महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही बाजी मारली आहे. 

महाराष्ट्रातील पदकविजेते अधिकारी

१. अविनाश लक्ष्मीकांत आघाव (पोलीस निरीक्षक) 
२. श्रद्धा अशोक वायदंडे (सहायक पोलीस निरीक्षक) 
३. सुरेश नानाभाऊ रोकडे (पोलीस निरीक्षक) 
४. प्रदीप विजय भानुशाली (पोलीस निरीक्षक) 
५. प्रशांत श्रीराम अमृतकर (पोलीस उपअधीक्षक) 
६. हेमंत सुभाष पाटील (पोलीस निरीक्षक) 
७. प्रियांका महेश शेळके (सहायक पोलीस निरीक्षक) 
८. सागर जगन्नाथ शिवलकर (पोलीस निरीक्षक) 
९. संजय देवराम निकुंबे (पोलीस निरीक्षक) 
१०. सुधाकर दत्तू देशमुख (पोलीस निरीक्षक) 
११. सचिन सदाशिव माने (सहायक पोलीस निरीक्षक) 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »