महिला आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती सहा आठवडय़ांत करा-HC

महिला आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती सहा आठवडय़ांत करा-HC
महिला आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती सहा आठवडय़ांत करा-HC

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले

राज्य महिला आयोगातील गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून रिक्त असलेली सदस्यांच्या पदावर अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्याबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या पदांवर सहा आठवडय़ांत नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानंतरही या पदांवर नियुक्ती करण्यात आली नाही, तर आयोगाच्या अध्यक्षांना नावे सादर करण्यास सांगून त्यांचीच मदस्यपदी नियुक्ती करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

आयोगाचे अध्यक्षपद आणि सदस्यांची पदे रिक्त असल्याप्रकरणी विहार दुर्वे यांनी जनहित याचिका केली होती. त्यानंतर अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु फेब्रुवारीमध्ये या सगळ्यांचा कार्यकाळ संपला. आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर यांना मुदतवाढ देण्यात आली. मात्र सदस्यपदांवर नियुक्ती करण्यात आली नाही. या पदांचा कार्यकाळ संपण्याआधी नवी नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. ही बाब  दुर्वे यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

त्याची मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदररजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली. अशा महत्त्वाच्या यंत्रणांतील पदांवर नियुक्ती करण्यात आली नाही तर याचिकांचा ढीग लागेल, असे न्यायालयाने सरकारला सुनावले. तसेच या पदांवर सहा आठवडय़ांत नियुक्ती करावी, असे आदेश राज्य सरकारला दिले.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »