पंतप्रधान नरेंद्र मोदींची बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफर

पंतप्रधान नरेंद्र मोदींची बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफर

मॅन व्हर्सेस वाईल्ड

जगातील कुठल्याही भागातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतून मार्ग काढून सुखरूपपणे बाहेर पडणाऱ्या बेअर ग्रिल्सचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा शो अनेकांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय आहे.
प्रसिद्ध  सर्व्हायव्हल इंस्ट्रक्टर असलेल्या बेअर ग्रिल्सचा अंगावर शहारे आणणारा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा डिस्कवरी चॅनेलवरचा शो तुम्हाला माहित असेलच. जगातील कुठल्याही भागातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतून मार्ग काढून सुखरूपपणे बाहेर पडणाऱ्या बेअर ग्रिल्सचा हा शो अनेकांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय आहे. दरम्यान, बेअर ग्रिल्सच्या या शोमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजंगल सफारी करताना दिणार आहेत. खुद्द बेअर ग्रिल्स यानेच ट्विट करून ही माहिती दिली आहे. मॅन व्हर्सेस वाईल्डचा हा विशेष भाग 12 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

या कार्यक्रमाचा टिझर बेअर ग्रिल्स याने प्रसारित केला असून, त्यात तो म्हणतो. 180 देशातील लोकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची कधी समोर न आलेली बाजू पाहण्याची संधी मिळणार आहे. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी नरेंद्र मोदी हे भारतातील जंगलांमध्ये सफारी करताना दिसणार आहेत. डिस्कव्हरी चॅनेलवर हा विशेष कार्यक्रम पाहा. 12 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता. 

 दरम्यान, बेअर ग्रिल्सच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या कार्यक्रमात आतापर्यंत जगभरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. बेअर ग्रिल्स आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला होता. 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »