मेरीचे आठवे जागतिक पदक

मेरीचे आठवे जागतिक पदक
मेरीचे आठवे जागतिक पदक

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा

सर्वाधिक जागतिक पदके पटकावणारी पहिली बॉक्सर; मंजू, जमुना, लव्हलिना यांचाही उपांत्य फेरीत प्रवेश
सहा वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरणारी एम. सी. मेरी कोम (५१ किलो) हिने गुरुवारी आपल्या शिरपेचात मानाचा आणखी तुरा रोवला. महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी बॉक्सर म्हणून मेरी कोमने नावलौकिक मिळवला आहे. उपांत्य फेरीत धडक मारत मेरी कोमने आपले आठवे पदक निश्चित केले.
मेरी कोमसह सहावी मानांकित मंजू राणी (४८ किलो), जमुना बोरो (५४ किलो) आणि गेल्या वेळची कांस्यपदक विजेती तिसरी मानांकित लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांनीही उपांत्य फेरी गाठत भारताचे किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.
तिसऱ्या मानांकित मेरी कोमने उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या व्हॅलेंसिया विक्टोरिया हिचा ५-० असा एकतर्फी लढतीत धुव्वा उडवून अंतिम चार जणांमध्ये स्थान मिळवले. जागतिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या मंजू राणीने गेल्या वेळच्या कांस्यपदक विजेत्या आणि अव्वल मानांकित दक्षिण कोरियाच्या किम यांग मि हिला ४-१ असा पराभवाचा धक्का दिला. जमुना बोरो हिने जर्मनीच्या उरसुला गोट्टलेब हिच्यावर ४-१ अशी सरशी साधली. लव्हलिनाने पोलंडच्या सहाव्या मानांकित कॅरोलिना कोझेवस्का हिच्यावर ४-१ अशी विजयश्री खेचून आणली. दोन वेळा कांस्यपदक पटकावणाऱ्या कविता चहल (८१ किलोवरील) हिला मात्र बेलारूसच्या कॅटसिरायना कावालेव्हा हिच्याकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागला.
शनिवारी रंगणाऱ्या उपांत्य फेरीत मेरी कोमला तुर्कीच्या दुसऱ्या मानांकित बुसेनाझ कॅकीरोग्लू हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. कॅकीरोग्लू ही युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेची विजेती तसेच युरोपियन क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती असल्यामुळे या सामन्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कॅकीरोग्लूने चीनच्या काय झोंगजू हिला पराभूत केले. राणीला थायलंडच्या चुथामाट रक्षत हिच्याशी लढत द्यावी लागेल. जमुना बोरोचा सामना माजी आशियाई कांस्यपदक विजेती हुआंग सिआओ-वेन हिच्याशी होईल. लव्हलिनाला चीनच्या यांग लिऊ हिच्याशी दोन हात करावे लागतील.
पदकांची लयलूटच:-
मणिपूरच्या मेरीने जागतिक स्पर्धेत आतापर्यंत सहा सुवर्ण आणि एक रौप्य आपल्या नावावर केले असून आता आठवे पदक तिच्या खात्यात जमा होईल. ५१ किलो गटातील हे पहिले जागतिक पदक ठरणार आहे. त्याचबरोबर मेरीने ऑलिम्पिक कांस्यपदक (२०१२, लंडन), पाच आशियाई विजेतेपदे, आशियाई तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अनेक पदके पटकावली आहेत. या वर्षी तिने इंडिया खुली आणि प्रेसिडेंट चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
पदक निश्चित केल्याने आनंदी असले तरी शनिवारी अंतिम फेरी गाठण्याचा माझा प्रयत्न असेल. ही लढत माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण होती. गेल्या सामन्यापेक्षा माझ्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. आता उपांत्य फेरीतही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. – मेरी कोम

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »