पाच गावे संस्कृत भाषा शिकवण्यासाठी दत्तक

पाच गावे संस्कृत भाषा शिकवण्यासाठी दत्तक
पाच गावे संस्कृत भाषा शिकवण्यासाठी दत्तक

राष्ट्रीय संस्कृत संस्था संस्कृत भाषा शिकविणार

राष्ट्रीय संस्कृत संस्था देशातली पाच गावे संस्कृत भाषा शिकवण्यासाठी दत्तक घेणार आहे. या गावातल्या लोकांना संस्कृतमध्ये संभाषण करता यावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
राष्ट्रीय संस्कृत संस्थेनी जुबार्ता (त्रिपुरा), मासोत (हिमाचल प्रदेश), चिट्टेबळी (कर्नाटक), अदात (केरळ) आणि बराई (मध्यप्रदेश) ही पाच गावे दत्तक घेतली आहेत.
राष्ट्रीय संस्कृत संस्था (RKS), लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (दिल्ली) तसेच राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती) या तीन केंद्रीय संस्था देशात संस्कृतच्या प्रचाराचे काम पाहतात. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संस्थांना संस्कृत शिकवण्यासाठी प्रत्येकी किमान दोन गावे दत्तक घेण्याचे निर्देश दिले होते. 3,500 वर्षांहून जुनी संस्कृत ही बोलीभाषा होण्यास चालना मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »