अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर

अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर
अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर

भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

  • भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी एस्थर डफलो यांचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’ च्या माध्यमातून प्रयत्न केल्याबद्दल बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.  हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. अभिजित यांच्याबरोबरच त्यांची पत्नी इस्थर डफलो आणि सहकारी मायकल क्रेमर या या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • या तीन अर्थशास्त्रज्ञांना वैश्विक गरीबी समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावर त्यांनी केलेल्या संशोधनासाठी हा सन्मान बहाल करण्यात येणार आहे.
  • अभिजीत बॅनर्जी हे सध्या मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते आणि त्यांची पत्नी डफलो 'अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अॅक्शन लॅब' चे को-फाउंडर आहेत.
  • बॅनर्जी यांनी १९८१ मध्ये कोलकाता युनिव्हर्सिटीमधून विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्यानंतर १९८३ मध्ये जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतून एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. १९८८ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली.

संशोधनातून गरीबी नष्ट होण्यास मदत:-

  • नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की या अर्थशास्त्रज्ञांच्या संशोधनातून गरीबीचं उच्चाटन करण्यात मदत मिळत आहे.
  • गेल्या दोन दशकांमध्ये त्यांच्या प्रयोगावर आधारित प्रयत्नांतून विकासात्मक अर्थशास्त्रात मोठे बदल घडून आले आहेत. यामुळे रिसर्चच्या क्षेत्रात नवी प्रगती झाली आहे.

अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक:-

  • १९६८ पासून , सेवेरिजस रिक्सबँक (स्वीडनची मध्यवर्ती बँक) यांनी नोबेल पुरस्काराचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ मध्ये अर्थसास्त्रामधील पुरस्कार स्थापित केला.
  • बँकेच्या ३०० व्या वर्धापन दिनानिमित्त १९६८ मध्ये सवेरीज रिक्सबँक कडून नोबेल फाऊंडेशनला मिळालेल्या देणगीवर हा नोबेल पारितोषिक आधारित आहे.
  • अर्थशास्त्राच्या  नोबेल पारितोषिकांची सुरुवात आल्फ्रेड नोबेलने यांनी केली नव्हती, त्यांच्या स्मरणार्थ स्वीडनची मध्यवर्ती बँक १९६९ पासून अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार देत असते अर्थशास्त्रामध्ये मौल्यवान योगदान देणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना हे पारितोषिक देण्यात येते.

अर्थशास्त्रातील पहिले नोबेल:-
राग्नर फ्रिश (नॉर्वे) आणि यान टिंबर्गन ( नेदरलँड्स)


अर्थशास्त्राचं नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी आहेत तरी कोण, जाणून घ्या:-

  • अमर्त्य सेन(1998) यांच्यानंतर अर्थशास्त्रातला नोबेल मिळवणारे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज् [अमर्त्य सेन (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३ - हयात) हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. गरिबी,आरोग्य,शिक्षण, मानवी विकास आणि एकूणच मानवी कल्याण त्यांच्या विचाराचा गाभा आहे. भारतीय केंद्रशासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी इ.स. २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे हे अध्यक्ष आहेत एकूण ४० वर्षात, ३० हून अधिक भाषांत अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. ते 'ऑक्सब्रिज कॉलेज' चे पहिले आशियाई प्रमुख आहेत.]

  • अभिजित बॅनर्जी यांचा जन्म २१ फेब्रवारी १९६१ रोजी कोलकात्यामध्ये झाला.
  • कोलकत्ता येथील सेंटर फऑर स्टडीज इन सोशल सायन्समध्ये अभिजित यांची आई निर्माला या प्राध्यापक होत्या. तर वडील दिपक हे कोलकात्यामधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयामधील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.
  • सध्या ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) फोर्ड फाऊण्डेशन इंटरनॅशनलचे प्राध्यापक म्हणून काम करतात.
  • अभिजित हे ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’चे संस्थापक आहेत. इस्थर डफलो आणि सेंडील मुल्लीनाथन यांच्या सोबतीने बॅनर्जी यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. गरिबीवर मात करण्यासाठी काय करता येईल यासंदर्भातील संसोधन ही संस्था करते.
  • अभिजित यांनी १९८१ साली आपली अर्थशास्त्रमधील बीएस पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनातर त्यांनी १९८३ साली जवाहरलाल नेहरु विद्यापिठामधून एमएची पदवी घेतली. त्यानंतर १९८८ साली ते पीएचडी करण्यासाठी हार्वर्ड विद्यापिठात गेले.
  • हार्वर्ड विद्यापीठ आणि प्रिन्सटॉन विद्यापिठामध्ये प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर आता ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात.
  • विकासावादी अर्थव्यवस्था हा अभिजित यांचा कोअर सबजेक्ट आहे. अर्थव्यवस्थेशी आधारित विविध घटकांचा तिच्यावर कसा परिणाम होतो याचा त्यांनी अभ्यास केला आहे.
  • २००४ साली त्यांना अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सची फेलोशीप मिळाली.
  • आर्थिक क्षेत्रातील संसोधनासाठी २००९ साली त्यांना इन्फोसेस पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • २०१२ मध्ये अभिजित यांना ‘पूअर इकनॉमिक्स’ या पुस्तकासाठी सह-लेखक एस्तेर ड्यूफलो यांच्यासमवेत ‘जेरल्ड लोब अवॉर्ड’ सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळाला.
  • २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्राचा सरचिटणीस बान की-मून यांनी २०१५ नंतरची विकास उद्दिष्टांसंदर्भात काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीमध्ये अभिजित यांनी नियुक्ती केली होती.
  • २०१९ मध्ये त्यांनी एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ इंडियामार्फत आयोजित एका कार्यक्रमात सामाजिक धोरणांची पुन:बांधणी या विषयावर एक लेक्चर दिले होते.
  • अभिजित यांनी एमएयटीमध्ये प्राध्यापिका असणाऱ्या डॉ. अरुंधती बॅनर्जी यांच्याबरोबर लग्न केले. हे दोघेही बालपणापासून मित्र होते. या दोघांना २० फेब्रुवारी १९९१ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. मात्र नंतर अभिजित आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाला. २०१६ साली त्यांचा एकुलता एक मुलगा कबीर याचा आकस्मिक मृत्यू झाला.
  • अभिजित यांनी त्यांची सहकारी एस्थर डफलो यांच्यासोबत २०१५ साली लग्न केले. मात्र त्याआधीपासूनच ते एकत्र राहत होते. २०१२ साली त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर तीन वर्षांनी ते लग्न बंधनात अडकले.

अभिजित यांनी लिहिलेली पुस्तके:-
१)Volatility And Growth
२)Understanding Poverty
३)Making Aid Work. Cambridge: MIT Press
४)Poor Economics: A Radical Rethinking of the Way to Fight Global Poverty
५)Handbook of Field Experiments, Volume 1
६)Handbook of Field Experiments, Volume 2
७)A Short History of Poverty Measurements

अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब:-
अभिजित यांना अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅबसाठी मिळालेली संस्था करते काय??

  • अभिजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांने स्थापन केलेली ही संस्था म्हणजे एक संसोधन केंद्र आहे. येथे जगातील गरिबीवर मात करण्यासाठी काय करता येईल याबद्दल विज्ञानाचा आधार घेऊन संशोधन केले जाते.
  • ही संस्था देशभरातील अनेक सरकार, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक आणि वेगवेगळ्या संस्थांच्या सोबतीने गरिबी हटवण्यासंदर्भात काय काय करता येईल याबद्दलचे काम करते. २०१८ पर्यंत ४०० दशलक्ष लोकांनी या संस्थेशी संबंधित कामाचा फायदा झाला आहे.

.

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »