इथियोपियाच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल

इथियोपियाच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल
इथियोपियाच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल

इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना २०१९ च्या शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर

 • इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना २०१९ च्या शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
 • शत्रू देश असलेल्या इरिट्रिया यांच्यासोबत शांतता प्रस्तापित केल्याने अबी अहमद यांना शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आल्याची माहिती पारितोषिक निवड समितीने दिली आहे.
 • २०१८ साली पंतप्रधान बनल्यानंतर अबी अहमद यांनी इथियोपियामध्ये मोठ्या प्रमाणात उदारीकरणाला सुरुवात केली आहे. त्यांनी हजारो विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची कारागृहातून मुक्तता करण्याचे आदेश दिले.
 • तसेच निर्वासित असलेल्या असंतुष्टांना देशात परत येण्याची परवानगी दिली. त्यामुळेच अबी अहमद यांना शांततेचा नोबेल जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात आधी त्यांनी आपले कट्टर शत्रू राष्ट्र एरिट्रियासोबत यशस्वीरित्या शांतता करार केला.
 • नुकतेच घेतलेल्या त्यांच्या या निर्णयाचे आणि सीमाप्रश्न सोडवण्याच्या शांततापूर्वक प्रक्रियेचे जगभरात कौतुक करण्यात आले. शांततेचा नोबेल मिळवण्यासाठी जगभरातून एकूणच ३०१ उमेदवारांचे अर्ज आले होते. या अर्जामध्ये २२३ व्यक्ती आणि ७८ संघटनांचा समावेश होता. परंतु, निवड समितीने अबी अहमद यांच्या नावाला पसंती देत त्यांना २०१९ चा शांततेचा नोबेल दिला आहे.

नोबेल पुरस्कार विजेत्याला पदक, प्रशस्ती पत्र व साडे चार कोटी रुपये रोख:-

 • नोबेल पुरस्कार विजेत्या प्रत्येकाला जवळपास साडे चार कोटी रुपये रोख रुपये दिले जातात. तसेच २३ कॅरेट सोन्याचा २०० ग्रॅमचे पदक आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. पदक म्हणून नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचा फोटो असलेले सोन्याचे पदक दिले जाते. या पदकावर त्यांचा जन्म आणि मृत्यू अशी तारीख असते. तर पदकाच्या दुसऱ्या बाजुला युनानी देवी आयसिसचे चित्र, रॉयल अकादमी ऑफ सायन्स स्टॉकहोम पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीची माहिती दिलेली असते.

नोबेल याच्या मृत्युपत्रातील तरतुदी:-

 • आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर इ.स. १८९७ साली त्याचे मृत्युपत्र उघडून पाहण्यात आले व चार वर्षांनंतर ते कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. या मृत्युपत्रानुसार त्याने कमावलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा (३.१ कोटी स्वीडिश क्रोनार) नोबेल निधीसाठी ठेवलेला होता. हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के रकमेचे पाच सारखे भाग करून प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी देण्याचे आल्फ्रेडने आपल्या मृत्युपत्रात सुचविले होते.
 • या मृ्त्युपत्रामध्ये कोणकोणत्या कार्यक्षेत्रात व कोणकोणत्या निकषांवर पारखून पारितोषिके द्यावीत याचेही त्याने विवेचन करून ठेवले होते. त्यासाठी आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे मृत्युपत्राचे विश्वस्त, पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व नोबेल यांचे कुटुंबीय यांनी चर्चा करून तयार केले व स्वीडनच्या राजाने याला इ.स. १९०० साली मान्यता दिली.

आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रान्वये:-

 • भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे,
 • वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे,
 • साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश ॲकॅडमी आणि
 • शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी या चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.

नोबेल पुरस्कार नाकारणाऱ्या व्यक्ती:-

 • त्यांच्या सरकारतर्फे हा पुरस्कार नाकारण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे चार व्यक्तींनी हा पुरस्कार नाकारला. यापैकी तीन जर्मन (हिटलरमुळे), तर चौथी व्यक्ती रशियन लेखक बोरीस पास्तेर्नाक (साहित्यातील नोबेल) याने सरकार सूड उगवेल या भीतीपोटी हा पुरस्कार नाकारला.
 • उत्तर व्हियेतनामच्या लु डक थो याने (शांततेचे नोबेल) शांतता प्रस्थापित न झाल्यामुळे नाकारले.

शांततेचे नोबेल मानकरी नॉर्वेची समितीच का निवडते?:-

 • शांततेचे नोबेल पारितोषिक नॉर्वेची ऑस्लो येथील समिती का देते, स्वीडनच्या राजधानीत ते का प्रदान केले जात नाही, या प्रश्नाचे उत्तर अजून कुणाला माहिती नसले तरी, ही पारितोषिके सुरू करणाऱ्या आल्फ्रेड नोबेल या वैज्ञानिकाने देऊन ठेवले आहे.
 • १९०१ पासून शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवात झाली व ते नॉर्वे संसदेने नेमलेल्या समितीच्या निवडीनुसार दिले जात आहे; पण हे सगळे आल्फ्रेड नोबेल याने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार होत आहे. त्याने शांततेचे नोबेल पारितोषिक स्वीडिश समितीकडून का दिले जात नाही हे मात्र कधीच सांगितलेले नाही. तरीही काही तर्काधिष्ठित कारणे त्यात काढली जातात. नॉर्वेचा राष्ट्रभक्त व ख्यातनाम लेखक बिजोर्नस्टेम जोर्नसन याच्या मते आंतरराष्ट्रीय शांतता चळवळीला असा पुरस्कार देण्यास मान्यता देणारे नॉर्वेचे विधिमंडळ हे पहिले होते.
 • काहींच्या मते नोबेल पारितोषिक वितरणाचे काम नोबेल याने स्वीडिश व नॉर्वेच्या संस्थांना वाटून दिले, कारण शांततेचे पारितोषिक हे राजकीय वादात अडकू शकते व ते राजकारणाचे साधन म्हणून वापरले जाऊ शकते. त्यामुळे शांततेसाठी या पुरस्काराचा वापर होण्याऐवजी राजकारणासाठी होईल.
 • नोबेलने त्याच्या इच्छापत्रात म्हटले आहे की, पारितोषिक दिले जाताना उमेदवाराचे राष्ट्रीयत्व बघितले जाऊ नये, मग ती व्यक्ती स्कँडेनेव्हियन असो किंवा नसो.
 • विसाव्या शतकात आठ स्कॅंडेनिव्हियनांना शांततेचे पारितोषिक मिळाले; त्यातील पाच स्वीडिश होते व दोन नॉर्वेचे होते. नामांकन व निवड प्रक्रियेत नॉर्वेची नोबेल समिती १९०४ मध्ये स्थापन झाली, तेव्हापासून सचिवाच्या मदतीने काम बघू लागली. ही व्यक्ती संस्थेची संचालकही असे. १९०१ पासून नॉर्वेच्या नोबेल समितीवरही टीका झाली आहे.
 • ओस्लो येथे भारतीय कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफजई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. १७ वर्षीय मलाला पुरस्कार जिंकणारी सर्वात लहान व्यक्ती ठरली होती.

 

 

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »