अखेर ओडिसाच्या रसगुल्ल्याला भौगोलिक मानांकन

अखेर ओडिसाच्या रसगुल्ल्याला भौगोलिक मानांकन
अखेर ओडिसाच्या रसगुल्ल्याला भौगोलिक मानांकन

ओडिशाच्या रसगुल्ल्यांना जीआय टॅग

मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर ओडिशातील रसगुल्ल्यांना भौगोलिक संकेतांक (जीओग्राफिकल इंडिकेशन टॅग) मिळाला आहे. चेन्नई येथील भौगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयाने 'ओडिशा रसगुल्ला' या जीआय टॅगवर मोहर उठवली असून तसं प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे. या प्रमाणपत्राची वैधता २२ फेब्रुवारी २०२८ पर्यंत असणार आहे. 

एखाद्या भागातील वस्तू वा पदार्थ हे त्या भागाचं वैशिष्ट्य असल्यास त्यास जीआय टॅग देण्यात येतो. असं असताना २०१५ सालापासून ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 'रसगुल्ला' या मिठाईच्या भौगोलिक हक्कावरून वाद सुरू आहे. ही दोन्ही राज्ये रसगुल्ला आमचाच, असे म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील रसगुल्ल्याला २०१७ मध्ये जीआय टॅग मिळाला. त्यानंतर ओडिशानेही रसगुल्ल्याला जीआय टॅग मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू केला. ओडिशा लघुउद्योग निगम लिमिटेडने मिठाई दुकानदारांच्या समितीच्या साह्याने चेन्नई येथील जीआय कार्यालयाकडे रितसर अर्ज केला. त्यासोबतच रसगुल्ल्याचे मूळ ओडिशाच असल्याचे अनेक दाखले दिले. ओडिशात रसगुल्ला दिन साजरा होतो. जगन्नाथ यात्रेदरम्यान रसगुल्ला प्रसाद म्हणून दिला जातो, असेही या अर्जात नमूद करण्यात आले. या अर्जानुसार पडताळणी करून अखेर ओडिशाच्या रसगुल्ल्यालाही जीआय टॅग देण्यात आला आहे. 

'रसगुल्ला' हा येथील परंपरेचा भाग असून याचा उल्लेख १५व्या शतकातील ओडिशी काव्य दांडी रामायणातही आढळतो. - ओडिशाचे विरोधी पक्षनेते प्रदीप्त नायक

याआधी ओडिशाच्या कंधामल हळदीला देखील जीआय टॅग देण्यात आला आहे 

2004 मध्ये दार्जीलिंग चहा या उत्पादनातला देशातला पहिला जीआय टॅग मिळाला. 

जीआय मानांकन:- विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक निर्देशन’ मानांकनातून मिळते. आजवर जगातील 160 देशांनी जीआयला मान्यता दिली आहे. हे संकेतक मिळाल्यानंतर त्या त्या परिसरातील पिकांच्या गुणवैशिष्ट्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.

भौगोलिक निर्देशन (जीआय) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता, दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादने, तसेच तयार वस्तू यांना विविध पातळींवर उत्पादनाचा दर्जा आणि अन्य बाबींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. मात्र भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचे क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्‍वासार्हता निर्माण होते. जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळते. जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनाच्या नोंदणीकृत उत्पादकांशिवाय होणार्या जी. आय. मानांकनाच्या अनाधिकृत वापरावर पायबंद घालता येतो. जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनांच्या निर्यातीला कायदेशीर संरक्षणाखाली चालना मिळते. उत्पादकांच्या आर्थिक समृद्धीला चालना मिळते. ‘जागतिक व्यापार संघटने’च्या इतर सदस्य देशांमध्ये कायदेशीर संरक्षण मिळवण्यास यामुळे मदत होते.

जी. आय. मानांकनासंदर्भात उत्पादक कोण असतो?

उत्पादक हे तीन प्रकारचा माल हाताळणार्या व्यक्ती असतात. शेतमाल (या मालाचे उत्पादन करणारे, त्यावर प्रक्रिया करणारे, त्याचा व्यापार किंवा व्यवहार करणारे)

• नैसर्गिक वस्तू (उपभोग घेणारे, व्यापार किंवा व्यवहार करणारे)

• हस्तकौशल्यावर आधारित किंवा औद्योगिक माल (अशा वस्तू तयार वा उत्पादित करणारे, त्यांचा व्यापार आणि त्यांची हाताळणी करणारे)

ट्रेडमार्क (व्यापारचिन्ह) हे व्यापारासंदर्भात वापरले जाणारे चिन्ह आहे. हे चिन्हांकन एका उद्योगाचा माल किंवा त्याची सेवा यांना इतर उद्योगांपासून वेगळे बनवते. मात्र जी. आय.चा वापर विशिष्ट भौगोलिक परिसरातील खास गुणधर्म असलेला माल ओळखण्यासाठी केला जातो.

प्रश्न :- महाराष्ट्रातील एकूण जीआय मानांकन मिळालेले पदार्थ/वस्तू किती व कोणत्या आणि सर्वप्रथम महाराष्ट्राच्या कोणत्या पदार्थास/वस्तूस जीआय मानांकन मिळाले होते ??

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »