युनो मध्येही पाकिस्तानला अपयश

युनो मध्येही पाकिस्तानला अपयश
युनो मध्येही पाकिस्तानला अपयश

सुरक्षा परिषदेने कोणत्याही एकांगी कारवाईस नकार देत पाकिस्तानला दिला धक्का

 • भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या मागणीवरून व चीनच्या अनुमोदनानुसार शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) सुरक्षा परिषदेत काश्मीर मुद्द्यावर चर्चा घडली.
 • या वेळी पाकचे मित्रराष्ट्र चीनने काश्मीर प्रश्नावर चिंता व्यक्त केली.
 • रशियाने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय करारांचे स्मरण करून देत द्विराष्ट्रीय मार्गाचाच अवलंब करण्याचे मत व्यक्त केले.
 • सुरक्षा परिषदेनेही या अनौपचारिक बैठकीनंतर कोणत्याही एकांगी कारवाईस नकार देत पाकिस्तानला धक्का दिला. 
 • सुरक्षा परिषदेने शुक्रवारी 'भारत-पाकिस्तान प्रश्न' या अजेंड्यावरील विषयावर काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली.
 • भारत व पाकिस्तानच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत सुरक्षा परिषदेचे पाच कायमस्वरूपी सदस्य देश व दहा अस्थायी सदस्य देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बंद दरवाजाआड ही बैठक झाली.
 • या वेळी चीनने पाकची बाजू उचलून धरली. 'या भागातील परिस्थिती धोकादायक आहे,' असे नमूद करतानाच, भारत व पाकिस्तानने तणाव न वाढवता शांततेनेच या प्रश्नावर मार्ग काढावा,' असे आवाहन केले,
 • रशियाने सन १९७२चा सिमला करार, सन १९९९चा लाहोर जाहीरनामा व युनो सनदेचा हवाला देत या चौकटीतच काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीचा प्रयत्न करावा, असा सूर लावला. 
 • या चर्चेनंतर यूनोचे सहाय्यक सरचिटणीस ऑस्कर तारान्को यांनी भारत-पाकसमोर परिषदेतर्फे सूचना मांडल्या.
 • भारतीय उपखंडातील तणाव रोखण्यासाठी दोन्ही देशांनी कोणताही टोकाची कृती करू नये, असे सांगतानाच, नियंत्रण रेषेजवळ तणाव वाढू न देण्याची काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली.
 • शांतीपूर्ण मार्गाने व 'युनो'च्या सनदेनुसार झालेल्या द्विराष्ट्रीय करारांच्या अधीन राहून थेट द्विपक्षीय चर्चेद्वारे या प्रश्न धसास लावावा, असा सल्लाही सुरक्षा परिषदेने या प्रश्नावर दोन्ही देशांना दिला व त्यास उपस्थित सदस्य देशांनी पाठिंबा दर्शवला. 
 • काश्मीरशी संबंधित कोणताही मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. दहशतवाद्यांनी आमच्या नागरिकांचे रक्त सांडू नये यासाठीच कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतला आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगलेच. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या आर्थिक आणि सर्वांगिण विकासासाठीच हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने दहशतवाद थांबवून चर्चेला यावे- सैद अकबरुद्दीन, राजदूत, राष्ट्रसंघ (India's permanent representative at the United Nations since January 2016)

प्रश्न:-

संयुक्त राष्ट्रसंघाविषयी अयोग्य नसलेले पर्याय ओळखा.

अ संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ रोजी झाली.
ब संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे.
क  संयुक्त राष्ट्रसंघाचे ५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य असतात.
ड संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्याचे म्हणजे २०१९ - ऑगस्ट चे अध्यक्षपद हे पोलंडकडे आहे. 

१ फक्त अ आणि क योग्य 
२ फक्त अ, ब आणि क योग्य
३ फक्त अ, क आणि ड योग्य
४ सर्व पर्याय अयोग्य 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »