मोदींना स्वच्छ भारत अभियानासाठी पुरस्कार

मोदींना स्वच्छ भारत अभियानासाठी पुरस्कार
मोदींना स्वच्छ भारत अभियानासाठी पुरस्कार

बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून पुरस्कार जाहीर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारत अभियान राबविल्याबद्दल बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • महिनाअखेरीस मोदी अमेरिकेला जाणार असून त्यावेळी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • मोदींनी घेतलेले परिश्रम आणि त्यांनी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम जगभरात नावाजले गेले आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालायाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी दिली. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले परिश्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम जगभरात दखल घेतली असून त्यांना मिळणारा हा जागतिक स्तरावरील दुसरा पुरस्कार आहे.
  • बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचा हा पुरस्कार त्यांना अमेरिका भेटीदरम्यान प्रदान करण्यात येणार आहे.
  • भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, असे जितेंद्र सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

स्वच्छ भारत अभियान:-

  • २०१४ साली स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाली होती.
  • या अभियानांतर्गत घराघरात शौचालय बांधणी, सार्वजनिक शौचालय आणि घनकचरा व्यवस्थापन या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »